Site icon InMarathi

पैसा वसूल अॅक्शन दाखवणाऱ्या या ७ खऱ्या हिरोंना एकदा तरी कडक सेल्युट द्याच!

stars inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारतात सिनेप्रेमींची अजिबात कमतरता नाही. भारतातली माणसं जितकी सिनेमावर मनापासून प्रेम करतात तितकेच प्रेम ते अभिनेत्यांवर आणि अभिनेत्रींवर करतात. अगदी त्यांची देवळं बांधण्यापासून तर ते आजारी पडल्यास त्यांच्यासाठी पूजापोथ्या, उपासतापास, होमहवन करतात. त्यांचे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो बघतात.

सिनेमात हिरो उंच इमारतीवरून सहज उड्या मारतात, गाड्या अगदी वेगात पळवतात आणि दहा दहा गुंडांना एकहाती धोपटून संकटात सापडलेल्या नायिकेची सुटका करतात.

त्यांचे हे स्टंट बघून आपण त्यांचे कौतुक करतो. जीवावर उदार होऊन आपल्या मनोरंजनासाठी हिरो हे स्टंट करतात असे आपल्याला वाटते.

 

 

काही अभिनेते स्वतःचे अॅक्शन सीन्स स्वतः करतात पण बहुतांश वेळेला हे धोकादायक सीन्स अभिनेते व अभिनेत्रींचे स्टंट डबल करतात. ते जीव धोक्यात घालून हे सीन्स शूट करतात आणि नाव मात्र अभिनेत्यांचे होते.

हे स्टंट डबल्स कधीच प्रसिद्धीच्या प्रकाशात येत नाहीत.स्टंट डबल म्हणून काम करणे हा खरं तर एक थॅंकलेस जॉब आहे. पण आज आपण बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या काही स्टंट डबल्स बद्दल जाणून घेणार आहोत.

१. परवेझ काझी :

 

 

बऱ्याच लोकांना सलमान खानचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट खूप आवडला असेल आणि त्यातील सलमानचे ऍक्शन सीन्ससुद्धा अनेकांच्या लक्षात असतील. पण हे ऍक्शन सीन्स सलमानवर चित्रित झाले नसून परवेझ काझी या त्याच्या स्टंट डबलने हे धोकादायक सीन्स केले आहेत.

२. चॅड गरेरो :

 

 

सलमान खानचा ‘सुलतान’ हा चित्रपट त्यातील मिक्स मार्शल आर्टस् आणि कुस्तीसाठी प्रसिद्ध झाला. या चित्रपटासाठी सलमान खानने खास मेहनत घेऊन बॉडी बनवली होती. पण या चित्रपटात सलमान खानचे फायटिंगचे सीन्स चॅड गरेरो या अमेरिकन स्टंट डबलने केले होते.

चॅडने सुलतानसह अनेक इंग्रजी चित्रपटांत देखील स्टंट डबल म्हणून काम केले आहे. त्याने सुलतानसह सलमानसाठी ‘राधे’ ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांच्या काही सीन्समध्ये स्टंट डबल म्हणून काम केले आहे.

३. समीर अली खान :

 

 

हृतिक रोशनचा ‘क्रिश’ हा चित्रपट अॅक्शन सीन्ससाठी प्रसिद्ध झाला. यातले थरारक सीन्स बघून लहान पोरांना क्रिशसारखे सुपरहिरो होण्याची इच्छा झाली. यातले धोकादायक सीन्स मात्र हृतिकने स्वतः केले नाहीत.

त्याच्यासाठी समीर अली खानने स्टंट डबल म्हणून काम केले. चित्रपटात अनेक धोकादायक स्टंट होते जे बघून अंगावर काटा येतो.

४. सीयंग ओ :

 

 

‘फॅन’ हा चित्रपट शाहरुख खानचे एक स्वप्न होते. या चित्रपटासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. या चित्रपटातील धोकादायक स्टंट सीयंग ओ या प्रसिद्ध कोरियन स्टंट कोऑर्डिनेटरने केले होते. त्यांनी फॅन चित्रपटानंतर वॉर, जंगली, भारत, झिरो या भारतीय चित्रपटांत देखील स्टंट केले आहेत.

त्यांनी अनेक प्रसिद्ध इंग्रजी व विदेशी चित्रपटांसाठी स्टंटमॅन तसेच स्टंट कोऑर्डिनेटर म्हणून काम केले आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘अव्हेंजर्स -एज ऑफ अल्ट्रॉन’ हा प्रसिद्ध चित्रपट होय.

५. सनोबर पारडीवाला :

 

 

भारतात हिंदी चित्रपटात पहिली स्टंटवुमन रेशमा पठाण होत्या हे तर आपल्याला ठाऊकच आहे. त्यांनी आगळीवेगळ्या करियरची सुरुवात केल्याने पुढे अनेक मुलींना स्टंटवुमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. बॉलिवूडमधील काही मोजक्या स्टंटवूमनमध्ये सनोबर पारडीवाला यांचे नाव घेतले जाते.

त्यांनी प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, ऐश्वर्या राय आणि करीना कपूर अशा अभिनेत्रींसाठी अनेक चित्रपटांत स्टंटवूमन म्हणून काम केले आहे. त्यांनी बँग बँग, धूम, रावण अश्या २०० चित्रपटांत अनेक धोकादायक थरारक ऍक्शन सीन्समध्ये काम केले आहे.

सुपर बाईक्स चालवणे, समुद्रात डीप डायविंग, जिऊ-जित्सू फायटिंग, विविध प्रकारची शस्त्र चालवणे , शस्त्रांशिवाय फायटिंग करणे असे अनेक धोकादायक स्टंट सनोबरने केले आहेत.

वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी सनोबरला लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला आहे तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्टंट पुरस्कारांसाठी देखील अनेकदा नामांकने मिळाली आहेत.

सनोबरने या क्षेत्रात प्रवेश करण्याआधी त्या फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत असत तसेच त्या व्यवसायाने क्लिनिकल हिप्नोथेरपीस्ट आहेत. त्यांनी कराटेचे सगळे प्रकार तसेच जिऊ-जित्सू या मार्शल आर्टसच्या प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवले आहे.

६. असिफ मेहता :

 

 

बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे स्टंटमॅन म्हणून काम करणाऱ्या असिफ मेहताने इम्रान हाश्मी आणि मनोज बाजपेयी या अभिनेत्यांसाठी स्टंट डबल म्हणून काम आलेले आहे. त्याचे वडील रशीद खान हे देखील स्टंट मॅन होते. या क्षेत्रात येण्यापूर्वी असिफने ऑस्ट्रेलियामधून ग्राफिक डिझायनिंगचे शिक्षण घेतले होते.

त्याला मोटर रेसिंगची प्रचंड आवड होती. परंतु एका अपघातामुळे त्याने हे क्षेत्र सोडले आणि वडिलांच्या सल्ल्यावरून बॉलिवूडमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

७. एमएस बलराम :

 

 

अभिषेक बच्चनचा ‘रावण’ चित्रपट बहुतेक सगळ्यांना आठवत असेलच. त्यात अभिषेक बच्चनचे अनेक धोकादायक थरारक स्टंट दाखवले आहेत. हे सगळे सीन्स एमएस बलराम या बंगलोरच्या डायव्हिंग चॅम्पियनने केले आहेत.

चित्रपटात उंच कड्यावरून खाली नदीत उडी मारणारा अभिषेक बच्चन नव्हता तर एमएस बलराम हा होता. तेव्हा अभिषेकने हा स्टंट स्वतःच केल्याचे सांगितले होते. पण खरं तर हा स्टंट बलरामने जीव धोक्यात घालून केला होता.

बंगलोरमध्ये स्विमिंग कोच म्हणून काम करणाऱ्या बलरामला अचानक एका मित्राच्या ओळखीने मणीरत्नम ह्यांच्या ‘रावण’ या चित्रपटात स्टंटडबल म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.

असे हे सगळे धोकादायक स्टंट करणाऱ्या या खऱ्या हिरोजसाठी एक कडक सॅल्यूट तर व्हायलाच हवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version