आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शांत झोप ही चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. झोपणे म्हणजे आपल्या मेंदूला थोड्या वेळासाठी शांत ठेवणे, विश्रांती देणे. झोपेची गरज ही प्रत्येक शरीराची वेगळी असते. काहींना ८ तास झोप तर काहींना ७ तास इतकी झोप सुद्धा पुरेशी होत असते.
रात्रीची झोप ही सर्वात महत्वाची असली तरी पुणे, राजकोट सारख्या काही शहरात दुपारची वामकुक्षी ही सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते. दुपारी झोप झाल्यावर रात्री झोप येत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. पण, कझाकिस्तान देशात एक असं गाव आहे जिथे लोक दिवसातून कितीही वेळ आणि महिन्यातील कितीही दिवस झोपू शकतात.
कोणतं आहे हे गाव?
कलाची या गावाला जगातील ‘झोपाळू’ गाव म्हणून ओळखलं जातं. कुंभकर्ण लंकेत होऊन गेला, पण त्याची झोपण्याची पद्धत कझाकिस्तान पर्यंत कशी पोहोचली? ही एक आश्चर्याची गोष्ट आहे.
कलाची मधील लोक इतके महिने कसे झोपू शकतात? यावर सध्या बरीच संशोधनं सुरू आहेत.
डॉक्टर, शास्त्रज्ञांचं हे म्हणणं आहे की, शरीरासाठी जशी अपूर्ण झोप चांगली नाही तशीच अतिरिक्त झोप सुद्धा चांगली नाहीये. जास्त झोप येणं हे एक तर आहारामुळे होतं किंवा तुम्ही राहता त्या भागातील भौगोलिक परिस्थितीमुळे होत असतं.
कलाची गावातील लोकांचं अतिरिक्त झोपेचं काय कारण आहे? जाणून घेऊयात.
कझाकिस्तान मध्ये युरेनियनची खाण आहे. युरेनियन गॅस हा या खाणीतून हवेत नेहमीच पसरत असतो. भारतात आणि जगातील इतर देशात कार्यरत असलेलं ‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’ कलाची गावाने कधी बघितलंच नाही.
वर्षानुवर्षे इथे युरेनियन गॅस हवेत पसरत असल्याने तिथलं हवा, पाणी प्रदूषित होत आहे. लोक दिवस-दिवस गाढ झोपेत असतात.
शास्त्रज्ञांनी कलाचीच्या पाण्याचा अभ्यास करून हा अहवाल सादर केला आहे की, “कलाचीच्या पाण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड आहे. यामुळेच लोकांना नेहमीच सुस्ती चढत असते.”
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – ऐकावं ते नवलंच : या गावात नवरदेवाला हुंडा म्हणून चक्क २१ विषारी साप दिले जातात
–
गावाचं होणारं नुकसान :
६०० लोकसंख्या असलेल्या या गावात लोकांना झोपायच्या आधी कोणाशी काय बोलणं झालं होतं? कोणता सौदा ठरला होता? हे काहीच लक्षात राहत नाही.
गावातील अर्ध्याहून अधिक लोकांना झोपेच्या आजाराने ग्रासलं आहे. एका व्यक्तीला त्याचं बोलणं आठवून देण्यासाठी इथे गोष्टी एक तर लिहून ठेवल्या जातात किंवा प्रत्येक वेळी दोन व्यक्तींच्या संभाषणात एक तिसरी व्यक्ती ‘साक्ष’ म्हणून बोलावली जाते.
काही लोकांना झोपेतच बोलायची, झोपेत जे दिसलं तेच समोर असावं अशी इच्छा व्यक्त करण्याचे विचित्र आजार सध्या या गावातील लोकांना होत आहेत. कलाची गाव च्या शेजारील गाव क्रस्नोगोर्स मधील लोकांना सुद्धा अशीच लक्षणं दिसत आहेत.
ऐकायला मजेशीर वाटणारी अजून एक गोष्ट म्हणजे कलाची गावातील लोकांना ‘आपल्याला झोप येत आहे’ हीच जाणीवच होत नाही. तशी जाणीव होईपर्यंत त्यांना झोप लागलेली असते.
कलाची गावातील लोक चालतांना, खातांना, अंघोळ करतांना त्यांच्या नकळत झोप लागत असते.
कलाची या गावाला “स्लिपी हॉलो” या नावाने सुद्धा ओळखलं जातं. गावातील १४% लोक म्हणजेच १४० लोक हे झोपेच्या आजाराने त्रस्त आहेत आणि त्यासाठी ते उपचार घेत आहेत.
या लोकांचा आजार इतका गंभीर आहे की, ते काही वेळेस रस्त्यावर सुद्धा झोपतात. जाग आल्यावर त्यांना “मी इथे कसा आणि कधी आलो?” असे काही प्रश्नच पडत नाहीत.
सुरुवात कधी झाली ?
२०१० मध्ये सर्वप्रथम या आजाराचं निदान करण्यात आलं होतं. एका शाळेतील मुलं जेव्हा शाळा सुटल्यावर तिथेच झोपली आणि किती तरी दिवस तशीच झोपून राहिली.
या घटनेनंतर इतर लोकांपर्यंत सुद्धा हा आजार पसरला आणि हा आजार ११ वर्षांनंतर आजही कलाचीच्या लोकांमध्ये बघायला मिळत आहे.
नवल म्हणजे २०१० मध्ये सर्वात पहिलं लक्षण सापडलेल्या या रोगाचं निदान लागण्यासाठी स्थानिक लोकांना ५ वर्ष वाट बघावी लागली होती.
२०१५ मध्ये जेव्हा सर्व शक्यता पडताळून युरेनियन गॅस हा सतत झोप येण्यासाठी कारणीभूत आहे हे सिद्ध झालं. तोपर्यंत गावातील कित्येक लोकांमध्ये इतकी झोपायची सवय आणि हा आजार लोकांपर्यंत पोहोचला होता. ज्या लोकांना शक्य होतं त्यांनी तत्काळ गाव सोडून दुसरीकडे जाण्याचा निर्णय तेव्हा घेतला होता.
–
हे ही वाचा – औषधांविना शांत झोप लागावी असं वाटत असेल तर हे ५ पदार्थ तुम्हाला हमखास मदत करतील
–
उपाय
कलाची गावात एक युरेनियन गॅसची खाण होती, ज्यामुळे युरेनियन गॅस गावात पसरत होता अशी माहिती स्थानिकांनी इथलं संशोधन करणाऱ्या लोकांना दिली आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या निर्देशानुसार ही खाण आता बंद करण्यात आली आहे.
पाण्यात कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढलं तर त्यामुळे शरीर जड पडतं, मेंदू सुस्तावू लागतो आणि काहीही काम करण्याची इच्छा राहत नाही. कलाचीच्या लोकांच्या इतक्या झोपण्यामागे हेच प्रमुख कारण आहे हे २०२० च्या एका अभ्यासात सिद्ध झालं आहे.
कझाकिस्तान देशाने आणि स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन लोकांना या आजारातून मुक्त होण्यासाठी मदत करावी अशीच इच्छा या बाबतीत माहिती मिळालेल्या प्रत्येक देशाची आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – एका देशात जेवायचं आणि दुसऱ्या देशात झोपायचं… अजब गावाची गजब गोष्ट…!
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.