आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सार्वजनिक नवरात्रोत्वस ही खरंतर बंगाली परंपरा. महाराष्ट्रात हा उत्सव सार्वजनिक झाला याचं कारण होतं, गणोशोत्सवावर असणारं ब्राह्मणी वर्चस्व. टिळकांच्या गणेत्सवात असणारी ब्राह्मणांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे, समाजसुधारक रावबहाद्दूर सीताराम केशव बोले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बंड पुकारत सार्वजनिक नवरात्रोत्सव चालू केला.
ब्राह्मणी पगडा…
महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेत्सोवाचं श्रेय जातं लोकमान्यांकडे. इंग्रजांविरुध्द समाजाची एकजूट व्हावी, अठरापगड जाती धर्मातले लोक यानिमित्तानं सार्वजनिक ठिकाणी एकत्र यावेत, यानिमित्तानं आयोजित मेळ्यांमधून समाज प्रबोधन आणि राष्ट्रभावना जागृत व्हावी या विचारातून हा घरगुती उत्सव सार्वजनिक करण्यात आला.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही हा उत्सव चालूच राहिला. मुळात गणेश ही देवता पेशव्यांनी आपल्यासोबत सर्वत्र नेली. गजानन हे पेशव्याचं दैवत त्यामुळे त्याच्या पूजा अर्चनेवर ब्राह्मणी संस्कारांचा पगडा असणं स्वाभाविक होतं. पूजा अर्चना ब्राह्मणांची मक्तेदारी असल्यानं इतर कोणी त्यात दखल देत नसण्याचा तो काळ होता.
१९२६ साली प्रबोधनकार, समाजसुधाराक रावबहादूर सीताराम केशव बोले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात पूजेमधे गैर ब्राह्मणांनाही सहभागी करून घ्यावे अशी मागणी केली.
धर्माचे लोकशाहीकरण करण्याचा प्रयत्न म्हणून या सार्वजनिक नवरात्रोत्सवाकडे पाहिले गेले.
प्रबोधनकार ठाकरे हे ब्राह्मणद्वेष्टे आणि बहुजन हिंदूत्वाचे समर्थक होते असे सर्वश्रुतच आहे. उच्च जातीच्या वर्चस्वाला त्यांचा विरोध होता. असं म्हणतात, की पूर्वीही नवरात्रोत्सव साजरा व्हायचा मात्र पेशवेंच्या काळात गणेशोत्सव साजरा होऊ लागला, गणेशाची आराधना मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आणि देवीची अर्चना मागे पडली. या प्रथेचं पुनरूज्जीवन करण्याचा आणि गणेशोत्सवावातील ब्राह्मणी वर्चस्वाविरूध्द बंड करण्याचा यशस्वी प्रयत्न या त्रयीनं महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं केला.
मंबईतील दादर परिसरात (अर्थात सर्वत्रच ही प्रथा होती आणि आहे) सर्व जातीपातीच्या लोकांकडून गणेशोत्सव काळात वर्गणी गोळा केली जात असे. मात्र आयोजन समितीवर ब्राह्मणांचे वर्चस्व असल्याने पूजा आणि इतर धार्मिक गोष्टींपासून इतर धर्मिय, जातींना दूर ठेवलं जात असे.
—
- “ब्राह्मणवाद मुळासकट उखडून काढला पाहिजे” – NRI अभिनेत्याच्या विधानामागील सत्य!
- ख्रिस्ती धर्मात गेलेल्या ब्राम्हण कुटुंबातील मुलगी, अशी बनली पाकिस्तानी पंतप्रधानाची पत्नी
—
या दरम्यान कीर्तन, गायनसेवा केली जात असे त्यातही प्रामुख्यानं ब्राह्मण समाजातील लोक असत. १९२६ च्या गणेशोत्सवात गणेश चतुर्थीच्या दिवशी डॉ. आंबेडकर, समाजसुधारक बोले अणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दादरमधील टिळक पुलाजवळ पूजेच्या परवानगीची मागणी करण्यासाठी जमाव गोळा करण्यात आला आणि आयोजन समितीवा दबाव आणला गेला.
प्रबोधनकारांनी त्यांच्या शैलीत धमकीही दिली, की त्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत देवतेची पूजा करण्याची परवानगी मिळाली नाही तर ते सरळ गजाननाची मूर्ती फोडतील.
यानंतर असा मध्यम मार्ग काढण्यात आला की आंबेडकारांचे निकटवर्तीय सहकारी माडके बुआ म्हणजेच गणपत महादेव जाधव हे आंघोळ करुन शुचिर्भूत होऊन देवतेला अर्पण करण्याची फुलं आयोजन समितीच्या पुजार्यांकडे सुपूर्द करतील. स्पृश्यास्पृश्यतेच्या त्या काळात आयोजन समितीतील अनेक ब्राह्मण नाराज झाले आणि ते या सोहळ्यास उपस्थित राहिले नाहीत.
समाजात जातीची दुही माजू नये आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी म्हणून त्या नंतरच्या काळात दादरमधे गणेशोत्सव साजरा होणार नाही असं आयोजन समितीनं जाहिर केलं. तर दुसर्या बाजुला गणेशोत्सवाला शह म्हणून दादरमधे महाराष्ट्राची देवता असणार्या मायभवानीचा सर्वसमावेशक असा नवरात्रोत्सव सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रबोधनकार, बोले यांनी लोकहितवादी संघाची स्थापना करुन १९२६ साली दादरमधे शिवभवानी नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव चालू केला. प्रबोधनकार १९२९ पर्यंत या उत्सवात सहभागी होत असत यातूनच सेनेची दसरा मेळावा भाषणाची परंपराही चालू झाली.
त्यानंतर प्रबोधनकार कर्जतला रहायला गेले मात्र त्यांनी सुरू केलेली ही परंपरा खांडके इमारतीत चालूच राहिली. आजही या उत्सवात प्रबोधनकार ठाकरेंचे वंशज आवर्जून उपस्थिती लावतात.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.