आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
९० च्या दशकातील प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण आज फिटनेस जगतातील एक नावाजलेले नाव आहे.
हे देखील वाचा : मिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे?!
आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅन सारखी भूषणे कमावलेले मिलिंद सोमण आज देशभरात लोकाना सुदृढ व निरोगी कसे राहावे याचे धडे देतात, पण मिलिंद त्यांच्या परिवारातील एकमात्र असे मनुष्य नाहीत जे स्वतच्या फिटनेसकडे लक्ष देतात.
त्यांची आई सुद्धा स्वतःच्या फिटनेस कडे खूप लक्ष देते…इतकं की मिलिंद च्या रनिंग मध्ये त्याच्या बरोबर असते…! काय ऐकून आश्चर्य वाटलं ना?!
७८ वर्षांच्या त्यांच्या आईचा फिटनेस असा आहे की भल्या भल्या तरुण सुदृढ लोकांना पण लाज वाटेल. नुकत्याच झालेल्या मदर्स डे च्या मुहूर्तावर मिलिंद सोमणच्या आई उषा सोमण यांनी एक प्लँक चे आव्हान घेतले. (प्लँक हा एक व्यायामाचाच प्रकार आहे.)
एवढ्या उतारवयातही उषा यांनी न डगमगता पूर्ण १ मिनिट २० सेकंद पर्यंत प्लँकचा व्यायाम केला.
त्याचा एक व्हिडियो मिलिंद सोमण यांनी आपल्या इंस्टाग्राम वर शेयर केला होता, जो अजूनही त्यांच्या चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.
A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on
हा व्हिडियो हजारो लोकांनी पाहिला असून कमेंट्समध्ये सर्वानीच त्यांच्या आईच्या जिद्दीचे कौतुक केले आहे आणि त्यांच्यापासून आपणही प्रेरणा घेत असल्याचे सांगितले. मिलिंद यांची आई जीवशास्त्रज्ञ असून आणि त्या शिक्षिका होत्या.
हे काही पहिल्यांदा झालेले नाही कि त्यांनी त्यांच्या फिटनेसने सर्वाना चकित केले आहे.
दोन वर्षापूर्वी ही त्यांनी मिलिंद सोमण यांच्या बरोबर मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता, आणि सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. विशेष म्हणजे मिलींद यांसारख्याच त्याही चप्पल न घालता पळताना दिसल्या होत्या.
Mumbai Oxfam Trailwalker साठी त्यांनी ४८ तासात १०० किलोमीटर पार केले होते, त्यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारची मेडीकल मदत घेतली नव्हती हे दुर्लक्षित करून चालणार नाही.
तो व्हिडियो देखील त्याकाळी बराच व्हायरल झाला होता. तो व्हिडियो येथे पाहू शकता.
याला काय म्हणावं, जैसा बेटा तैसी आई की जैसी आई तैसा बेटा??…काहीही असो पण या माता-पुत्राने नव्या पिढीसमोर जो फिटनेसचा आदर्श ठेवला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.