Site icon InMarathi

गौरीशी लग्न करण्यासाठी जेव्हा शाहरुख नाव आणि ‘धर्म’ ही बदलायला तयार झाला होता!!

srk final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रेम ही अशी संकल्पना आहे जिच्या फक्त नावामुळे आनंदाचे वातावरण पसरते. तरुण वयात प्रत्येकाला प्रेमात पडायची ईच्छा होते.आपली मैत्रीण  मित्र असावा ही भावना सतत जाणवत असते. कॉलेजवयात अनेकांची प्रेमप्रकरणं होतात काहींची तर अगदी शाळेपासून सुरु होतात, त्यातील काहीजण आयुष्यभराचे साथीदार होऊन जातात तर काहीजण आपापल्या वाटेला निघून जातात.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बॉलीवूडने तर प्रत्येक वयोगटातील माणसाला प्रेमात पडायला भाग पाडले, भारतीया प्रेक्षकांची अचूक नस पकडण्यात अनेक दिग्दर्शक यशस्वी झाले आणि त्यांनी आपापल्या प्रेमकहाण्या पडद्यावर आणल्या, आणि सुपरहिट देखील झाल्या. सिनेमातील जोड्या जशा हिट ठरल्या तशा त्यातील कलाकाराच्य स्वतःच्या आयुष्यातील जोड्या सुद्धा हिट ठरल्या, त्यातीलच एक जोडी म्हणजे शाहरुख आणि गौरी खान..

 

 

सध्या हे दोघे चर्चेत आले आहेत ते त्यांच्या मुलाने केलेल्या कृत्यांमुळे, पण या दोघांची लव्ह स्टोरी देखील एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही. कारण अगदी कोवळ्या वयात ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघेही मूळचे दिल्लीकर..

गौरीच खानदान आर्मी बॅकग्राऊंडचे होते तर शाहरुखचे वडील एक कॅन्टीन चालवायचे. एका पार्टीत त्यांची भेट झाली आणि त्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या. कॉलेजमध्ये दोघे दाखल झाल्यानंतर गौरीने इतिहासात पदवी मिळवली तर शाहरुखला कॉलेजात अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्याने आपले करियर अभिनयात करायचे ठरवले.

 

 

दिल्लीच्या वादग्रस्त अशा जेएनयु कॅम्पमध्ये दोघांनी एकत्र वेळ घालवला, आणि असा क्षण आला जिथे दोघांना असे वाटले की आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही आणि आता यावर उपाय म्हणजे लग्न करणे. लग्न जरी दोघांनी ठरवले असले तरी घरच्यांचा अजून हस्तक्षेप झाला नव्हता.

शाहरुखच्या आईची त्याच्या लग्नाला परवानगी होती मात्र गौरीच्या घरचे नाराज होते, त्यातले सर्वात महत्वाचे कारण म्हणजे धर्म. गौरी धर्माने हिंदू तर शाहरुख मुस्लिम होता. घरच्यांना पटवण्यात काहीसा वेळ गेला आणि नेमका कहानी मै ट्विस्ट आया, शाहरुखने आपले अभिनयातले नशीब आजमवण्यासाठी थेट मुंबई गाठली.

 

 

स्ट्रगल करत छोट्या मोठ्या भूमिका करत त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, त्याचा पहिला सिनेमा होता दिवाना. याचदरम्यान पुन्हा एकदा दोघांची भेट झाली आणि शाहरुखने गौरीच्या घरच्यांना दोघांच्या लग्नासाठी पटवण्याचा  घाट घातला. शाहरुखने गौरीच्या घरातील अशा व्यक्तीला निवडले जी सहज पटू शकते ती होती गौरीची काकू निरू आंटी.

शाहरुखने आपल्या स्टाईलमध्ये तिला समजावले, ‘मी हिंदू बनेन, आणि माझा नाव बदलून जितेंद्र कुमार असे ठेवन’ या एका वाक्याने काकू इतकी खुश झाली की तिने शाहरुखला आपल्या घरी पार्टीसाठी बोलावले.

 

पुढे सिनेमा हिट झाला शाहरुखने गौरीशी लग्न केले मात्र लग्नाआधी गौरीने काही अटी ठेवल्या होत्या त्या म्हणजे एक तर लग्न हिंदू पद्धतीने होणार आणि लग्नांनंतर मी माझा धर्म बदलणार नाही. एका मुलाखतीत तिने या अटी सांगितल्या होत्या. गौरीने लग्नानंतर घरात हिंदू सण साजरे केले आणि आजवर करत आहे.

शाहरुख गौरीचे लग्न झाले त्यांनतर शाहरुखचे नशीबच बदलले, दिल्लीतला एका मुलगा मुंबईत येऊन सुपरस्टार होतो, अर्थातच यामागे त्याची मेहनत, कष्ट आणि गौरीची साथ आहे. गौरीने देखील आपले करियर इंटीरियर डिजाइनमध्ये केले आहे. आज ती मोठमोठाल्या उद्योगपतींच्या घराचे इंटेरियरचे काम करते आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version