आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) हे सध्या फारच व्यस्त आहे, असं म्हणता येईल. मुंबईत राहणाऱ्या उच्चभ्रू घरातील मुलांनी सध्या एनसीबीचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘उडता पंजाब’ नावाचा सिनेमा आपण काही वर्षांपूर्वी बघितला होता. “आपला महाराष्ट्र असा नाहीये” हा विचार करून आपण तेव्हा समाधानी होतो. पण, जसजशी नवीन नावं या ‘ड्रग रॅकेट’मध्ये समोर येत आहेत तसं नशेची सवय ही कोणत्या प्रांतापुरती मर्यादित नसून ही चटक बेफिकीर तरुणाईला लागली आहे हे मान्य करावं लागेल.
सेलिब्रिटीच्या मुलामुलींची नावं समोर आली, की एनसीबीचं काम प्रकाशात येतं. पण, मध्यंतरी या प्रकरणात एनसीबीने ‘मुच्छड पानवाला’ या मुंबईतील मलबार हिलमधील पान टपरी चालवणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अवैध ड्रग्जचा साठा जवळ बाळण्यासाठी अटक केली होती.
या अटकेनंतर अमली पदार्थ हे केवळ मोठ्या हॉटेल पार्टी मधूनच नाही तर टपरीवरसुद्धा उपलब्ध होऊ शकतात हे धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
रामकुमार तिवारी हे ‘मुच्छड पानवाला’च्या मालकाचं नाव आहे ज्याला एनसीबीने अटक केली होती. बॉलीवूड सेलेब्रिटींना ड्रग्जचा पुरवठा करण्यात ‘मुच्छड पानवाला’ या टपरीचं मोठं योगदान आहे, असं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे.
एनसीबीने त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार, ‘रामकुमार तिवारीला एनडीपीएसच्या सेक्शन ८ आणि सेक्शन २० मधील नियमानुसार अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचा साठा, खरेदी-विक्री, हाताळणी हे अवैध आहे असं नमूद केलं आहे.’
कोण आहे हा ‘मुच्छड पानवाला’?
रामकुमार तिवारीचे वडील पंडितश्री श्यामचरण तिवारी यांनी मुच्छड पानवाला या नावाने ४० वर्षांपूर्वी हे दुकान सुरू केलं होतं. आज ‘मुच्छड पानवाला’ हे मुंबईतील प्रमुख पान टपरीपैकी एक आहे.
मलबार हिल सारख्या देशातील महागड्या ठिकाणी सुरू असलेली ही टपरी आज तिवारी यांची ४ मुलं चालवतात. रामकुमार तिवारी यांचाही यात समावेश होतो. मलबार हिल्सच्या ‘केम्प्स कॉर्नर’ला असलेली ही टपरी बॉलीवूड सेलिब्रिटी आणि तिवारी यांच्या कानापर्यंत असलेल्या मिशा यामुळे खूप लोकप्रिय आहे.
–
- फाजील आत्मविश्वास नडला: १८०० जणांमध्ये NCB ने आर्यनलाच पकडलं कारण…
- NCB चे काम काय असते? रेड टाकण्याची नेमकी पद्धत काय आहे? जाणून घ्या
–
मुच्छड पानवाला हा काही राजकारणी, व्यावसायिक यांच्या सुद्धा आवडीचा आहे. पान खाण्याची आवड असणारी ही खास मंडळी सुद्धा त्याच्याकडे पण खातात. २०१६ पासून ‘मुच्छड पानवाला’ने आपल्या पानांची ऑनलाईन विक्री करण्यासही सुरुवात केली आहे.
जानेवारी २०२१ मध्ये हे दुकान चर्चेत आलं जेव्हा त्या दुकानात अर्धा किलो ‘मरिजुआना’चा साठा आहे अशी पक्की बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रामकुमार तिवारी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. रामकुमार तिवारी यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. रामकुमार तिवारी हे पानांमध्ये ड्रग्ज लावून त्यांची विक्री करायचे असा एनसीबीचा दावा आहे.
मुंबईत रहाणाऱ्या करण संजनानी याच्या घरी सापडलेले २०० किलो ड्रग्ज सुद्धा याच प्रकारातील होते असंही म्हटलं जातंय. मुच्छड पानवालाच्या दुकानात ड्रग्जचा साठा आहे हे एनसीबीला करण संजनानी यानेच सांगितलं होतं.
रामकुमार तिवारी सोबतच जयशंकर तिवारी यांना सुद्धा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. दिवसभर केलेल्या प्रश्नोत्तरानंतर रामकुमार तिवारी यांना पोलीस कोठडी सूनवण्यात आली होती.
मर्सिडीज कारमध्ये फिरणाऱ्या रामकुमार तिवारी यांची चौकशी करतांना अशी माहिती समोर आली आहे, की या रॅकेटमध्ये बांद्रा येथे रहाणाऱ्या दोन महिला सुद्धा सामील आहेत, ज्या परदेशातून गांजाची तस्करी करून मुंबईत त्याची सर्रास विक्री करत असतात. जून २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या ‘राहिल फर्निचरवाला’ला सुद्धा एनसीबीने अटक केली होती.
‘मुच्छड पानवाला’ चालवणाऱ्या रामकुमार तिवारीची मुंबई न्यायालयाने १५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे.
मायानगरीत अजून असे किती लोक ड्रग्जची अवैध विक्री करत आहेत हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. अतिरिक्त पैसे असलेल्या पालकांनी मुलांना भारतातील गरिबी दाखवून त्यांना पैश्यांचं, आपल्या आरोग्याचं महत्त्व पटवून दिलं तर कदाचित ते धोपट मार्ग सोडणार नाहीत अशी अपेक्षा ठेवता येईल.
===
- बॉलिवूडच्या ‘धुंद’ पार्ट्यांशी ‘बटाटा’ ग्रुपचं नेमकं कनेक्शन आहे तरी काय?
- सलमान, संजू, रिया, आर्यन खान: बॉलिवूडकरांचा तारणहार मराठी स्टार वकील!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.