आर्यन खानसोबत सेल्फी; कोण आहे हा, खासगी गुप्तहेर की तरुणांना लुबाडणारा तोतया?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आर्यन खानच्या मुलाला अटक होऊन आता काही दिवस उलटून जरी गेले असले तरी या बातमीची हवा काही कमी होत नाहीये, प्रत्येकाच्या सोशल मीडिया न्यूज फिडमध्ये यासंबंधीत काही ना काहीतरी अपडेट मिळतच आहेत.
न्यूज चॅनल्सनी आर्यनने कोठडीत भात खाल्ला का बर्गर खाल्लं? इथवर या बातमीचा चोथा केला आहे, पण जेव्हा आर्यनला अटक झाली आणि त्याला NCB कार्यालयात आणलं, तेव्हा त्याचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
या सगळ्या फोटोंमध्ये आर्यन सोबत एका माणसाने घेतलेल्या सेल्फीची मात्र खूपच चर्चा झाली, त्यावर बरेच उलटसुलट वाद झाले तो सेल्फी घेणारा आणि अपलोड करणारा माणूस हा NCB अधिकारी असल्याच्याही वावड्या उठल्या होत्या.
NCB कडून याबाबत अधिकृत स्टेटमेंटसुद्धा आलेलं की ”हा माणूस ऑफिसर नसून त्याचा या रेडशी किंवा आर्यन खानशी थेट काहीच संबंध नाही”, तरीही या सेल्फीने प्रचंड धुमाकूळ घातला होता.
–
- बॉलिवूडच्या ‘धुंद’ पार्ट्यांशी ‘बटाटा’ ग्रुपचं नेमकं कनेक्शन आहे तरी काय?
- बाप तसा पोरगा : खुद्द शाहरुखलासुद्धा एकदा पोलिस स्टेशनची हवा खावी लागली होती!
–
अखेर या व्यक्तीची खरी ओळख आपल्यासमोर आलेली आहे. ही व्यक्ति ऑफिसर नाही तर मग आहे तरी कोण? आर्यन खान सोबत सेल्फी घेऊन तो अपलोड करणाऱ्या या माणसाला कोण ओळखतं ते आता हळूहळू स्पष्ट होत आहे.
के.पी. गोसावी आहे तरी कोण?
आर्यनसोबत सेल्फी घेऊन व्हायरल होणारे के.पी.गोसावी हे कोणतेही ऑफिसर नसून, ड्रीम्ज रीक्रूटमेंट एजन्सिची मालक असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगतीये. गोसावी यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई आणि नवी मुंबईत असून भारतीय तरुणांना परदेशात रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायचं काम ही कंपनी करते.
याखेरीज मोठ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कातील खासगी गुप्तहेर अशीसुद्धा गोसावी यांची ओळख आहे, याबाबत ठोस पुरावा अद्याप नाही, पण ते एक प्रायव्हेट डिटेक्टिव आहेत असं म्हंटलं जातंय.
गोसावी हे त्यांच्या गाडीवर पोलिसांची पाटी लावून फिरतात, अशी पोलिसांच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. शिवाय राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नवाब मलिक यांनीसुद्धा गोसावी यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उभं केलं असून गोसावी यांचा NCB च्या झोनल डायरेक्टरशी काय संबंध असा सवालही मीडियाशी संपर्क साधताना केला आहे.
काही लोकांच्या माहितीनुसार गोसावी यांच्या या कंपनीविरोधातसुद्धा बऱ्याच तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. पुण्याच्या एका तरुणाला मलेशियात एका मोठ्या हॉटेलात नोकरीचे आमिष दाखवून ३ लाख रुपये गोसावी यांनी उकळले असून या तरुणाने या कंपनीविरोधात तक्रारसुद्धा केली आहे.
आर्यन खान आणि ड्रग रेडच्या प्रकरणात NCB ने गोसावी यांना साक्षीदार म्हणून पुढे केल्याचं म्हंटलं जातंय.
या समोर आलेल्या माहितीमुळे सोशल मीडियामधून पुन्हा NCB वर टीका होताना आपल्याला दिसत आहे, ज्या माणसावर फसवेगीरी करण्याचा आरोप आहे अशा माणसाला तपास यंत्रणा एवढ्या मोठ्या प्रकरणात साक्षीदार म्हणून कसं उभं करू शकते असा सवाल केला जात आहे.
शिवाय जर खरंच गोसावी हे प्रायवेट डिटेक्टिव असतील तर मग आर्यन खानच्या अटकेमागे त्यांचा काही हात आहे का? आणि जर ही रेड मारण्यात त्यांचा काही संबंध असेल तर ते स्वतः आर्यन खानसोबत फोटो शेअर का करतील?
अशा बऱ्याच प्रश्नांना आता तोंड फुटलं आहे. तपास यंत्रणा तसेच न्यायालय यांनी या प्रकरणात आणखीन तपास करून या माहितीची शहानिशा करून योग्य तो निर्णय घ्यायला हवाच.
कारण या सेल्फीमुळे आणि तो सेल्फी काढणाऱ्य माणसाच्या ओळखीमुळे तपास यंत्रणा आणि आपली न्यायव्यवस्थेवरच लोकं संशय घेऊ लागली तर हे प्रकरण नक्कीच हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे!
===
- NCB चे काम काय असते? रेड टाकण्याची नेमकी पद्धत काय आहे? जाणून घ्या
- आर्यन खान आणि क्रूझ : सोशल मीडियावर आली विनोदांची त्सुनामी!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.