Site icon InMarathi

‘सामान्य मुलावरच्या प्रेमाखातर या राजकन्येने आपली संपत्ती सरकाराला दान केली’!!

japan final image inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं’ असा डायलॉग आपण हमखास अनेक सिनेमांमध्ये ऐकला असेल, जगात निसर्गानंतर सर्वात कोणती सुंदर गोष्ट असेल तर ती म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुझं आणि माझं सेम असत या आणि अशा अनेक प्रेमावरच्या कविता आपण ऐकल्याचं असतील. बॉलीवूडकरांनी तर प्रेमाचे गोडवे गाणारे हजारो सिनेमे काढलेत. प्रेमाच्या सगळ्या छटा दाखवणारे हे सिनेमे प्रेक्षकांनी सुद्धा डोक्यावर घेतले.

 

 

आपल्याकडे जशा प्रेमाच्या कविता त्यावरचे सिनेमे हिट आहेत तसे अनेकवर्ष हिट ठरलेल्या प्रेमकथा सुद्धा आहेत. हिर रांझा, रोमिओ जुलियेट ज्यात प्रेमवीरांनी आपल्या प्रेमासाठी काय वाट्टेल ते केलं इतकं की त्यांनी एकमेकांच्या जीवाची देखील पर्वा केली नाही. अशाच एका प्रेमी युगलांच्या प्रेमाच्या विजयाची कथा जाणून घेणार आहोत…

 

 

प्रेमाला वय,जात, धर्म याकशाचं बंधन नसत, मग ते प्रेम अगदी सर्व सामान्य घरातील मुलीचं असो किंवा राजघराण्यातील मुलीचे, अशाच एका राजघराण्यातील मुलीने चक्क एका सामान्य मुलाशी लग्न केले आहे.

काही दिवसांपूर्वी जपानने घटता जन्मदर आणि वाढती वृद्धांची संख्या यावर उपाय म्हणून सरकारने लग्न करणाऱ्या जोडप्याना काही रक्कम बक्षीस देण्याचे घोषित केले आहे. त्याच देशातील राजाच्या भाचीने आपल्या लग्नाची घोषणा केली.

राजघराण्यातील मुलीचा विवाह एखाद्या राजघराण्यातील राजपुत्राशीच होणार असे सर्वसामान्य लोकांना वाटले मात्र तिने आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे जो तिचाच वर्गातला एका सामान्य घरातून आलेला आहे.

 

 

कोण आहे ती राज्यकन्या? 

माको असं त्या राजकन्यचे नाव असून तिच्या होणाऱ्या जोडीदाराचं नाव आहे केई कुमुरो, लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक होण्याचा त्यांचा मानस आहे. टोकियोतील एका रेस्टोरंटमध्ये परदेशातील अभ्यास या कार्यक्रमात त्यांची ओळख झाली असे बोलले जात आहे.

२०१७ मध्ये त्यांनी साखरपुडा केला, मात्र नंतर त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. त्या अडचणींवर मात करून ते एकदाचे यावर्षीच्या अखे पर्यंत लग्न करणार आहेत.

 

संपत्तीवर पाणी सोडावे लागणार?

प्रेमासाठी काहीपण, माणूस एकदा प्रेमात पडला की त्याला सगळ्याचाच विसर पडत जातो. आपण आणि आपला जोडीदार हेच त्यांचं विश्व् बनून जात. जपानी कायद्यानुसार राजघराण्यातील स्त्रियांनी जर सामान्य व्यक्तीशी लग्न केले तर त्यांना आपले घराणे ,अधिकार आणि संपत्ती सोडवावी लागते. तसेच स्त्रियांच्या नावावरील जेवढी संपत्ती असेल ती सरकारकडे जमा कारवी लागते.

 

Newsweek

 

आज आपल्याकडे लग्न सोहळे हा चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय असतो. काही वर्षांपूर्वी अंबानी पिरामल यांच्या शाही विवाहाच्या चर्चा अनेक दिवस रंगल्या होत्या. लग्न ठरायच्या आधी मुलाच्या आणि मुलीच्याच नव्हे तर त्यांच्या त्यांच्या कुटुंबाच्या कुंडल्या देखील काढल्या जातात. मात्र हाच प्रेमविवाह असेल तर बाकीची नसती उठाठेव कोणाच करत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version