पहिल्यांदाच या आधुनिक ‘दुर्गा’, सार्वजनिक देवीची पूजा करणार आहेत!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आपल्या देशाला अनेक वर्षांचा इतिहास आहे, आपल्या देशात अनेक धर्म रुजले, वेगवेगळ्या संस्कृती उदयास आल्या. माणसांनी एकत्र यावे यासाठी अनेक सण उत्सव साजरे करायला सुरवात केली.अनेक शतकं उलटली तरी आपण आपली प्रथा ,परंपरा, सण उत्सव तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरे करत आहोत.
काळ बदलत गेला तसे सणांचे स्वरूप पण बदलत गेले, सनातनी विचारांना पूर्णपणे विरोध न करता त्याला आधुनिक विचारांची जोड देत सण समारंभामध्ये चालीरीतींमध्ये बदल केले गेले.
अंत्यविधी सारखे विधी जिथे फक्त पुरुषांनी करायचे असतात असे विधी आज महिला देखील करत आहेत. पौरोहित्य करणाऱ्या पुरुषांच्या बरोबरीला आता महिला ही येत आहेत. अशाच एका काही महिलांबद्दल जाणून घेऊयात...
–
- या महिलांनी दाखवलाय बुरख्यापलिकडचा कर्तव्यदक्ष चेहरा!! वाचा
- हिंदू संस्कृतीत महिलांना नारळ का फोडू देत नाहीत? ही कारणं जाणून घ्या…
–
कोलकाता शहराला मुंबईपेक्षा जुना इतिहास आहे. इंग्रजांनी कोलकात्यापासून आपले साम्रज्यवाढवायला सुरवात केली. अनेक विचारतवंतांचं, कलाकारांचं हे शहरं संस्कृतीनेदेखील नटलेले आहे. बंगाली संस्कृतीचा वारस जपणाऱ्या हा शहरात सर्वात मोठा उत्सव असतो तो दुर्गपुजेचा,मुंबईत जस गणेशोत्सव मोठ्या प्रमाणवर साजरा करतात त्याच पद्धतीने कोलकाता शहरात दुर्गा पूजा साजरी करतात.
यंदाच्या दुर्गपूजेमध्ये एक मोठा बदल घडून आलेला आहे. सार्वजनिक पद्धतीने साजरा करणाऱ्या या उत्सवाहात या वर्षी चार महिला पुजारी दुर्गेची पुजा करणार आहेत. विशेष म्हणजे खुंटी पूजेपासून (मंडप उभारायच्या आधीची पूजा ) ते दसऱ्यापर्यंत केवळ महिलाच देवीची पूजा करणार आहेत.
साऊथ कोलकाता क्लबने हे पाऊल उचलले आहे. पूजेच्या बरोबरीने संगीताचे आणि गीतांचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. देवीची पूजा मातांकडून, अशी थीम या क्लबने ठेवली आहे.
कोण आहेत त्या महिला?
डॉ. नंदिनी भौमिक, सेमांती बॅनर्जी, रूम रॉय आणि पौलोमी चक्रवर्ती अशी त्या महिलांची नावे आहेत. गेल्या एक दशकापासून त्या शहरातील विविध विधी करत आहेत जसे की लग्न, गृहप्रवेश इत्यादी मात्र मूर्तिपूजेची ही पहिलीच वेळ आहे.
आज आपल्याकडे देखील महिला पुढे येऊन पौरोहित्य करताना दिसत आहेत. काही घरात तरआवर्जून शुभ कार्य असो किंवा अशुभ कार्य महिला पुरोहितांनाच बोलवले जाते. गणेशोत्सवात दरवर्षी पुण्यात महिला एकत्र येऊन अथर्वशिष्याचे पठण करतात.
गेल्या वर्षी आलेल्या कोरोनामुळे आपल्यावर अनेक निर्बंध आले, गणेशोत्सव, नवरात्री यासारख्या सार्वजनिक सणांवर मोठ्या प्रमाणवर निर्बंध लागले गेले, यावर्षी देखील तेच नियम होते. पण आपल्या लोकांचं उत्साह बघता काही ठिकाणी निर्बंध पायाशी तुडवले तर काही ठिकाणी कडक पाळले गेलेत.
–
- अख्खा इस्लाम धर्म विरुद्ध एकटी मुस्लिम महिला : एक थरारक युद्ध!
- एक सामान्य मुलगी ते भारताची पहिली महिला फोटोजर्नलिस्ट – प्रवास जाणून घ्या!
–
आज जरी सणांवर समारंभावर मर्यादा असली तरी सण उत्सव हे साजरे करायचे थांबले नाहीत. कोरोनसारखे संकट असून सुद्धा लोक भक्तिभावाने आपापली काळजी घेत सण समारंभ आहे त्या परिस्थितीत साजरे करताना दिसून येत आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.