आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक – सोहम गोडबोले
===
आपला देश हा खरं तर सण उत्सवांचा देश, एक सण झाला की दुसरा सण येतोच, मकर संक्रातीने सुरवात झालेल्या सणांची समाप्ती दिवाळीने होते. तर अशा या आपल्या सणांच्या देशात आणखीन एक सण मोठ्या उत्सहात साजरा करतात तो म्हणजे निवडणूका, मात्र या सणात सर्वात उत्साही असतात ते कार्यकर्ते आणि त्यांचे नेते, कारण या निवडणुकीवर सर्वांचे भविष्य अवलंबून असते.
नुकतीच काही महिन्यांपूर्वी बंगालची निवडणूक होऊन गेली, जिथे भाजपच्या ३,४ जागा यायच्या तिथे भाजपने ८० जागा निवडून आल्या, बंगालमध्ये आधीपासूनच कम्युनिस्ट पक्षांचा प्रभाव आहे, ममता दीदींच्या तृणमूल पक्षाने गेल्या काही वर्षात बाजी मारली आहे. बंगाल निवडणुकांमध्ये देखील तृणमुल पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले होते.
तृणमुल पक्षाच्या विजयामागे एका व्यक्तीचा हात आहे तो म्हणजे प्रशांत किशोर, याच व्यक्तीने २०१४ साली नरेंद्र मोदींना निवडून दिले होते. मात्र नंतर त्यांच्यात झालेल्या मतभेदांमुळे प्रशांत किशोर वेगळे झाले आणि त्यांनी नरेंद्र मोदींना हरवणायचा जणू विडाच उचलेला दिसून येत आहे.
बंगाल निवडणुका तर संपल्या मात्र देशातील इतर राज्यांच्या निवडणूक तोंडावर आहेत, पंजाब, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यावर लक्ष न करता ममता दीदी आणि तिचे चाणक्य प्रशांत किशोर यांनी गोवा हे राज्य निवडले आहे.
गोव्याच्या निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. म्हणूनच आता ममता दीदी आणि प्रशांत किशोर तिकडे मोर्चेबांधणी करत आहेत…इतर राज्य सोडून नेमके हे राज्य पकडण्यामागे नेमके काय विचार असू शकतात चला तर मग जाणून घेऊयात..
–
- गरिबांची काळजी दाखवणारे डावे इकॉनॉमिस्ट्स स्वतः देशाचे पैसे “असे” उधळतात
- देशाच्या राजकारणातला खरा चाणक्य कोण? : इतिहासात डोकावून केलेला धांडोळा
–
गोवा हे राज्य अगदी भौगोलिक दृष्ट्या बघितले तर महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्याएवढे आहे. गोवा विधानसभेची निवडणूक केवळ ४० जागांसाठी लढवली जाते. त्यामुळे कोणत्याही पक्षासाठी हे फार मोठे काम नाही, मात्र तरीही शिवसेनेला मागच्या निवडणुकीत देखील यश मिळाले नव्हते. यंदाच्या निवडणुकीत देखील ते आपले उमेदवार लढवणार आहेत.
ममता दीदी आणि प्रशांत किशोर यांनी त्रिपुरा नंतर गोवा निवडण्यामागे अनेक कारणं आहेत त्यातले सर्वात महत्वाचे कारण म्हणजे गोव्यातील विचारसरणी ही सेक्युलर आहे. हिंदू विचारसरणी असलेली राज्य न घेता जिथे सेक्युलर विचारसरणीचा प्रभाव आहे ती राज्य निवडावी.
गोव्यात मोठया प्रमाणावर अल्पसंख्याकांचा गट आहे, आधीपासून गोवा ही काँग्रेसची व्होटबँक आहे तसेच अभ्यासकांच्या मते ममता दीदींना २०२४ लोकसभा निवडणुका जिंकायच्या आहेत त्यामुळे त्या विविध प्रयोग करत आहेत.
गोव्यात बहुमत जरी मिळाले नाही तरी थोड्या जागा मिळाल्या तरी त्यांच्या पक्षाचे गोव्यात स्थान निर्माण होईल, आज जरी गोव्यात भाजपची सत्ता आली असली तरी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. नव्वदच्या दशकांत सुरु केलेल्या संघर्षांला नंतर कुठे यश येऊ लागले.
आज गोवा निवडणूक जिंकण्यासाठी प्रशांत किशोर यांनी हालचाली करण्यास सुरवात देखील केली आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री फलेरिओ यांनी काँग्रेस सोडून तृणमुल पक्षात गेले आहेत. फलेरिओ गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या व्यक्तींपैकी होते.
फलेरिओ यांना राजकारणात घेण्यामागे आणखीन एक गोष्ट ती म्हणजे फलेरिओ हे ख्रिस्ती धर्माचे प्रचारक म्हणून ओळखले जातात, आज गोव्यात ख्रिस्ती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे साहजिकच ख्रिस्ती धर्माची व्होट बँक पूर्णपणे तृणमुल पक्षाकडे असणार..
–
- भाजपला टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जी आणताहेत माओवाद्यांची फौज
- ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालचं नाव बदलायचंय, मोदी सरकार म्हणतं “चालणार नाही”
–
तृणमुल पक्षाने याआधी देखील २० जागांवर निवडणूक लढवल्या होत्या मात्र त्यांना फारसे यश आले नाही म्हणून यावेळी पक्षाने कंबर कसली आहे. प्रशांत किशोर यांच्या टीमने गोव्यातील अनके राजकीय पक्षांच्या लोकांना भेटून गोव्यातील राजकारणाचा अभ्यास केला आहे.
या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष पैसे देखील खर्च करत आहे असे बोललं जातंय.बंगाल प्रमाणे भाजपला चारीमुंड्या चीत करण्याचा डाव बहुदा तृणमुलचा असावा.
चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकांमध्ये कोण जिंकणार कोण हरणार हे तर कळेलच मात्र जो पक्ष जिंकेल त्या पक्षाचं स्थान येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नक्कीच बळकट होणार.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.