Site icon InMarathi

कॅप्टन अमेरिका च्या शिल्ड वर वूल्वरीन ओरखडा ओढू शकतो का? उत्तर वाचा!

caption-america-vs-wolverine-marathiizza00

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कॅप्टन अमेरिका आणि वूल्वरीन ही दोन अतिशय भिन्न पात्र, पण ‘कॅप्टन अमेरिका च्या शिल्ड वर वूल्वरीन ओरखडा ओढू शकतो का?’ हा प्रश्न मात्र एकदम गमतीशीर आणि काहीसा विचार करायला लावणारा देखील आहे. कॅप्टन अमेरिका आणि वूल्वरीनच्या कोण्या कट्टर चाहत्याने क्वोरा वर हा प्रश्न विचारला होता आणि या प्रश्नाची इतर चाहत्यांनी दिलेली उत्तरं खरंच जाणून घेण्यासारखी आहेत.

scifi.stackexchange.com

Thaddeus Howze  हा मनुष्य म्हणतो की,

कॅप्टन अमेरिका च्या शिल्डवर वुल्वरीनने आपल्या धारदार पंजांनी वार केला तर काहीही होणार नाही, कारण वूल्वरीनचे पंजे इतके शक्तिशाली नाहीत की ते कॅप्टन अमेरिकाच्या अभेद्य शिल्डवर ओरखडा काढू शकतील.

Thaddeus Howze याने दिलेलं हे उत्तर पोकळ नसून त्याने ते सिद्ध देखील करून दाखवले आहे. तो म्हणतो,

वूल्वरीनचे अॅमेमॅन्टियम (वूल्वरीनचे पंजे ज्यापासून तयार केले गेले ते खनिज) नॉर्मल व्हायब्रॅनियम (कॅप्टन अमेरिकाचे शिल्ड ज्यापासून तयार केले गेले ते खनिज) कापू शकतो. पण चाहत्यांच्या मनात तेव्हा गोंधळ निर्माण होतो जेव्हा चाहते मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील कॅप्टन अमेरिकाच्या शिल्डची तुलना कॅनन कॉमिक युनिव्हर्समधील कॅप्टन अमेरिकाच्या शिल्डशी करतात. ही दोन्ही शिल्डस पूर्णत: वेगळे आहेत.

मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स, Earth-199999 मधील कॅप्टन अमेरिकाचे शिल्ड हे व्हायब्रॅनियम आणि इतर मिश्रधातूंपासून बनलेले आहे, जे अधिक टिकाऊ आणि अधिक उर्जेचा (energy) प्रतिकार करणारे आहे. परंतु ते कॅप्टन अमेरिकाच्या  Earth-616 व्हर्जनसारखे अविनाशी नाही, ते सहज नष्ट करता येऊ शकते.

thehannibalectersociety.blogspot.in

कॅनन मार्व्हल युनिव्हर्स, Earth-616 मधील कॅप्टन अमेरिकाचे शिल्ड मात्र आजवरच्या सर्वोकृष्ट अॅमेमॅन्टियम आणि व्हायब्रॅनियम या दोन्ही खनिजांच्या मिश्रणापासून तयार झाले आहे, आणि हे शिल्ड जगातील कोणत्याही गोष्टीने नष्ट करता शकत नाही हे विशेष! असे युनिक शस्त्र कोणत्याही आजवरच्या सुपरहिरोकडे नाही.

म्हणजेच आता आपण कॅप्टन अमेरिकाचे जे शिल्ड पाहतोय ते अॅमेमॅन्टियम आणि व्हायब्रॅनियम या दोन्ही खनिजांच्या मिश्रणान अवतरले आहे, त्यामुळे ते कोणताही वार झेलू शकते, त्यावर साधा ओरखडाही पडणार नाही, पण दुसरीकडे वूल्वरीनचे पंजे केवळ अॅमेमॅन्टियम पासून तयार झालेले आहेत, त्यामुळे ते कॅप्टन अमेरिकच्या शिल्ड पुढे फिके आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अॅमेमॅन्टियम बनवलेले वूल्वरीनचे पंजे कोणत्याही इतर शक्तिशाली खनिजापुढे टिकू शकत नाहीत, ते सरळ कापले जाऊ शकतात.

wallpapersonthe.net

Thaddeus Howze याचं हे समर्पक स्पष्टीकरण पाहून निष्कर्ष असा निघतो की, कॅप्टन अमेरिकाचे शिल्ड हे वूल्वरीनच्या धारदार पंजापेक्षा कितीतरी पट सरस आहेत आणि वूल्वरीनचे पंजे त्याचं काहीही वाकडं करू शकत नाहीत.

टीप: अॅमेमॅन्टियम आणि व्हायब्रॅनियम ही दोन्ही खनिजे केवळ कॉमिक्स मध्ये सापडतात, खऱ्या जगात अशी कोणतीही खनिजे अस्तित्वात नाहीत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version