Site icon InMarathi

Pandora पेपर्स प्रकरण नक्की आहे तरी काय? गैरव्यवहारात समोर आलेली नावे…

pandora inmarathi final

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारतातून कंगाल होऊन अथवा लोकांची फसवणूक करून पोबारा केलेल्या उद्योगपतींची संख्या कमी नाही. तसेच आपल्या देशातील काही अतिश्रीमंत लोकांनी कर चुकवून इतरत्र देशात केलेली गुंतवणूक यामुळे देशाच्या करप्रणालीत कमालीचा तोटा सहन करावा लागत आहे. अर्थव्यस्थेवर असलेला मोठा भार आणि कर चुकवणाऱ्या लोकांमुळे देशाचे नुकसान होत आहे.

 

परदेशातला काळा पैसा भारतात आणू या मुद्दयावरून मोदींनी २०१४ ची निवडणूक लढवली होती. मोदींनी निवडणूक तर या मुद्यांवरून जिंकली खरी मात्र काळा पैसा किती भारतात आला हे अजून स्पष्ट केले नाही. यावरून विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले, मोदींनी नंतर या प्रकारावरून घुमजाव केले.

 

 

मध्यंतरी पनामा पेपर प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजले होते आणि आता पुन्हा एकदा पँडोरा पेपर प्रकरण गाजत आहे. भारतातील बड्या मंडळींचा या पेपरमध्ये समावेश आहे, नक्की काय आहे प्रकरण आणि कोणत्या व्यक्तींचा यात समावेश आहे जा णून घेऊयात…

पँडोरा पेपर म्हणजे काय?

पँडोरा पेपर हे पत्रकारितेशी संलग्न असलेले जगातील सर्वात मोठी माहिती देणारी संस्था आहे. ज्यात एकूण ११७ देशातील ६५० पत्रकार १५०हुन अधिक मीडिया हाउसेस समाविष्ट आहेत.

 

 

पँडोरा पेपर तपास प्रकरणात एकूण १४ कंपन्यांच्या १२ बिलियन फाईल लीक झाल्या आहेत. ज्यामध्ये त्या कंपन्यानी ऑफशोअर नावाचा कर बुडवला आहे अथवा कमी प्रमाणात तो भरला गेला आहे.

नेमकं काय उघडकीस आले आहे?

आर्थिक दस्तऐवज उघडकीस आल्याचा हा जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. पनामा पेपर प्रकरणानंतर अनेकजण गुंतवणुकीचा पर्याय शोधात होते. ज्यात जगातील अनेक  राजकरणी नामवंत खेळाडू, सेलिब्रेटी, ड्रग्स माफिया आदी व्यक्तींनी आपल्या मालकीच्या असलेल्या ऑफशोअर कंपन्या, लपवलेल्या गेलेल्या वेगवगळ्या प्रकारच्या गुंतवणूका, मालमत्ता यातून समोर आल्या आहेत.

 

 

सध्याच्या या प्रकरणात बिर्टीश आयलंड, हाँगकाँग, अमेरिका, फ्लोरिडा येथे रजिस्टर असलेल्या अकाउंटचा डेटा लीक झाला आहे. आर्थिक गुन्ह्यांखाली असलेले, फसवणूक केलेलं असे अनेक आरोप ज्यांनी अशा देशांमध्ये गुंतवणूक करून आपले नेटवर्क तयार केले आहे. या तपासात अनेक भारतीयांची नावे देखील आहेत.

भारतीय बँकावर हजारो कोटींचे कर्ज असणाऱ्यांनी आपल्या मालमत्तेमधील मोठा भाग या ऑफशोअर कंपन्यांत गुंतवला आहे. तसेच भारतातील माजी अधिकारी, सेवा अधिकारी, लष्करी अधिकारी यांच्या ऑफशोअर कंपन्यांचा समावेश आहे.

 

टॅक्स हेवन म्हणजे काय?

टॅक्स हेवन देश म्हणजे जिथे इतर देशांपेक्षा कर कमी प्रमाणात असतो म्हणून मोठेमोठे व्यावसायीक आपली गुंतवणूक टॅक्स हेवन असलेल्या देशात करतात जेणेकरून मालमत्ता अथवा कंपनीवरील टॅक्स कमी द्यावा लागेल.

 

 

भारतीयांचा समावेश?

पँडोरा पेपरमध्ये सचिन तेंडुलकर पासून अनेकांची नावे आपल्यासमोर आली होती. या प्रकरणात अनिल अंबानी,  एक महिन्यापूर्वी देश सोडून गेलेली निरव मोदींची बहीण जिने एक ट्रस्ट चालू केला होता. किरण मुजुमदार यांचे पती जे बायकॉनचे प्रवर्तक आहेत,जी संस्था ट्रेडिंगचे काम करते.

आतापर्यंत या तपासात ३००हुन अधिक भारतीयांची नावे पुढे आली आहेत,ज्यात प्रमुख ६० व्यक्ती आणि त्यांच्या ऑफशोअर कंपन्या यांची तपासणी करण्यात आली आहे. काही दिवसात आणखीन नवी माहिती आपल्यासमोर येईल. आपल्या कडच्या टॅक्स प्रकारामध्ये ऑफशोअर टॅक्ससाठी एक पुसट रेषा आहे. पण जर तुम्ही भारताचे नागरिक असाल तर तुम्हाला परदेशातील गुतंवणूकीची माहिती द्यावी लागते.

आज सामान्य माणसाने कर भरण्यास थोडा उशीर केला तरी त्याला मोठ्या प्रक्रियेला सामोरे जावे लागते तेच देशातील धनदांडगे मात्र कर चुकवण्यासाठी या अशा गोष्टींचा वापर करतात. आधीच जीएसटी करप्रणालीमुळे छोटे व्यावसायिक सरकारवर नाराज आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version