' फिल्म इंडस्ट्रीमधील ‘बाप’ लोकांनी दिले सुपरहिट सिनेमे, त्यांची ‘मुलं’ मात्र सुपरफ्लॉप!! – InMarathi

फिल्म इंडस्ट्रीमधील ‘बाप’ लोकांनी दिले सुपरहिट सिनेमे, त्यांची ‘मुलं’ मात्र सुपरफ्लॉप!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या वर्षीपासून आपल्या रोजच्या जगण्यात काही नवे शब्द येऊ लागले ते म्हणजे quarantine, nepotism,antibody  इत्यादी शब्द आता नवे राहिले नाही. सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर तर बऱ्याच उलट सुलट चर्चा सुरु झाल्या. बॉलीवूडमधली घराणेशाही ते अगदी बॉलीवूडमधील ड्रग्स प्रकरणं बाहेर येऊ लागली. एनएसबीने गेल्या वर्षीपासून बॉलीवूडच्या लोकांची धरपकड करायला सुरवात केली ती आजपर्यंत सुरु आहे.

 

bollywood inmarathi

 

बॉलीवूड म्हणजे अनेक होतकरू कलाकारांचं स्वप्न असत. बॉलीवुड या नावाचं भुरळ फक्त देशातच नाहीये तर इतर देशातील कलाकरांना सुद्धा आहे, आपला नशीब अजमावायला या बॉलीवूडमध्ये अनेकजण येतात. काहींचं स्वप्न साकार होत तर काहीजणांच स्वप्नच बनून राहतं.

बॉलीवूडमध्ये घराणेशाही चालते, फक्त स्टार किड्सना संधी मिळते, यावरून बॉलीवूडमधील जी प्रतिष्ठती घराणी आहेत त्यांच्यावर लोकांनी टीका करायला सुरवात केली. मात्र त्याच घराण्यातील काही स्टार किड्स पुढे आले मात्र त्यांना आपले नशीब मात्र आजमावता आले नाहीत, कोण आहेत  ते स्टार किड्स चला बघुयात…

nepotism

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अमजद खान :

खलनायकाचा आवाज पट्टीतला असावा या संज्ञेला छेद देत अमजद खानने धीरगंभीर आवाजात खलनायक असा काही रंगवला की आज नुसतं शोले म्हंटले तरी फक्त गब्बरसिंग आठवतो. अमजद खानला एकूण तीन मुले त्यातील दोन मुलांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले मात्र वडिलांसारखे अजरामर होऊ शकले नाही.

 

amjad inmarathi 1

 

राजकुमार :

विशिष्ट अशा लहेजात संवाद म्हणणारा अभिनेता म्हणजे राजकुमार, आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये स्थान तर निर्माण केले होते, मात्र त्यांच्या मुलांना काही हे स्थान निर्माण करता आले नाही. पाणिनी आणि पुरु अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत, हे दोघे अनुक्रमे अभिनेते दिग्दर्शक आहेत. मात्र वडिलांइतके प्रतिभा निर्माण करू शकले नाही.

 

rajkumar 1 inmarathi

मेहमूद :

आपल्या अफाट कॉमेडी टायमिंगमुळे सत्तर ऐंशीच्या काळात धुमाकूळ घालणारा विनोदी अभिनेता म्हणजे मेहमूद. मेहमूदने अनेक चित्रपटात काम केली आहेत मात्र त्याच्या  आठ मुलांपैकी कोणीही त्याच्या इतका मोठा स्टार होऊ शकला नाही. लकी अली हा प्रसिद्ध गायक त्याचाच मुलगा मात्र तो अभिनयात न उतरता गायन क्षेत्रात उतरला.

 

mehmood 3 inmarathi

 

कपूर घराणं :

कपूर घराण्याने सर्वात जास्त कलाकार बॉलीवूडला दिले असतील हे म्हणणं तितकेसे खरे नाही. कारण फक्त रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांचीच मुलं आज बॉलीवूडमध्ये काम करत आहेत. शशी कपूर, शम्मी कपूर, राजीव कपूर या कपूर लोकांपैकी कोणाचीच मुले या बॉलीवूडकडे वळली नाहीत.

 

kapoor family inmarathi

 

मिथुन चक्रवर्ती :

गरिबांचा अमिताभ बच्चन, डिस्को डान्सर असंही ओळख असलेल्या मिथुनदाने ही आपल्या मुलाला बॉलीवूडमध्ये स्टार बनवणायचे प्रयत्न केले मात्र तो अपयशी ठरला. मिमोह या नावाने ओळखला जाणारा मिथुनचा मुलगा जिम्मी या सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये दाखल झाला मात्र सिनेमा फ्लॉप ठरला.

 

mithun inmarathi

 

फिरोज खान :

आपल्या बॉलीवूडच्या सिनेमांना बोल्ड आणि स्टायलिश करणाऱ्या फिरोज खानने देखील आपल्या मुलाला स्वतःच्या बॅनरखाली लाँच केले मात्र मुलगा वेगळ्याच कारणांमुळे प्रसिद्ध झाला. फरदीनने देखील काही चित्रपटात काम केले मात्र अभिनयाची छाप त्याला पडता आली नाही.

 

firoj khan inmarathi

 

तनिषा मुखर्जी :

अभिनेत्यांनी जसे आपल्या मुलांसाठी बॉलीवूडमध्ये प्रयत्न केले तसेच प्रयत्न अभिनेत्रींनी देखील केले. मराठमोळी अभिनेत्री तनुजा हिच्या दोन मुली काजोल आणि तनिषा त्यातील काजोलने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये नाव कमावले मात्र दुसऱ्या मुलीला फारसे नशीब आजमावता आले नाही.

 

tanuja inmarathi

 

अनुपम खेर :

२६ वय असताना एका ६०चे वय असणाऱ्या एका वयोवृद्ध माणसाची भूमिका करणारा अभिनेता म्हणजे अनुपम खेर. अनुपम खेर यांनी आजवर ४००हुन अधिक सिनेमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. मात्र त्यांच्या मुलाने केवळ दोन सिनेमात काम केले आहे.

 

anupam 33 inmarathi

 

जिंतेद्र :

मराठी संस्कृतीशी जवळीक असलेला बॉलीवूडचा जम्पिंग जॅक म्हणजे अभिनेता जिंतेद्र. चित्रमहर्षीं व्ही शांताराम यांनी जिंतेद्रना प्रथम संधी दिली होती. मात्र जितेंद्र यांनी आपल्या मुलाला बॉलीवूडमध्ये संधी जरी दिली तरी मुलाने त्याचे सोने केले नाही. तुषार केवळ त्याच्या बहिणीची सिनेमामध्ये आपल्याला दिसला मात्र त्याला अभिनयाची छाप मात्र पाडता आली नाही.

 

jitendra inmarathi.jpg 1

 

यश चोप्रा :

अभिनेत्यांनी जसे आपल्या मुलांना बॉलीवूडमध्ये आणले तर मग निर्माते दिग्दर्शक कसे मागे राहतील? लव्ह स्टोरीजमध्ये माहीर असणाऱ्या यश चोप्रांनी आपल्या दुसऱ्या मुलाला बॉलीवूडमध्ये आणले मात्र तो ही अपयशी ठरला. यशराज बॅनरच्या खाली असलेल्या सिनेमामध्ये फक्त तो दिसला. धूम बनल्या कॉमेडी रोलमुळे तो फक्त लक्षात राहिला.

 

chopra inmarathi

आज शाहरुखच्या मुलामुळे पुन्हा एकदा स्टार किड्स बद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहे. शाहरुख स्वतः एका सामान्य कुटुंबातून संघर्ष करून किंग खान पर्यंत पोहचला आहे. आज त्याच्याच वयाचे असलेल्या कलाकारांच्या मुलंदेखील या ना त्या कारणांमुळे चर्चेत असतात. ड्रग्स प्रकरणी  सैफ अली खानच्या मुलीला म्हणजे सारा अली खानला ड्रग्स प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते.

राकेश रोशन, अमिताभ बच्चन यांच्या मुलांनी देखील बॉलीवूडमध्ये काम करून आपले स्थान निर्माण केले आहे. नेपोटीजम, घराणेशाही आज प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे. अनेक उद्योगपतींच्या मुलांनी नको ते उद्योग करून कंपनीला रसातळाला गेला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?