आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
महात्मा – महान आत्मा या दोन शब्दांपासून बनलेला हा शब्द सगळेच पेलावू शकतात असं नाही. महात्मा म्हणवून घ्यायला माणसाचं चरित्र आणि कारकीर्द सुद्धा तशीच लागते. सन्मान मागून घेता येत नाही, तर तो मिळवावा लागतो असं म्हणतात. आणि राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांनी तो आपल्याला कष्टांनी, मूल्यांनी मिळवून घेतला. याच गांधीजींच्या देशातील ही एक गोष्ट.
अलीकडेच लक्षद्वीप फार चर्चेत आले होते. फारशी काही उलाढाल होत नसल्याने, हे बेट कधी ही कोणत्याही कारणावरून चर्चेत आले नव्हते. पण हल्लीच लक्षद्वीप तुफान चर्चेत आले आहे, काल गांधी जयंतीच्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लक्षद्वीपमधील पहिल्यावहिल्या गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले.
नवीन कायद्यांच्या विरोधात तिथल्या नागरिकांनी सरकार यंत्रणेविरुद्ध आंदोलन छेडले होते. भाजप सरकारने, तिथे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मद्यविक्रीला परवानगी दिली शिवाय अवैध गौहत्या करण्यावर बंदी घातली, या सारख्या काही कायद्यांमुळे तिथले नागरिक भडकले व विरोधी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी संधीचं सोनं करत या आंदोलनाला प्रतिसाद दिला.
तिथे या सगळ्या नियमांना इतका कडक विरोध होण्याचे कारण असे कि तिथले ९८% नागरिक हे मुसलमान आहेत. व त्यांच्या म्हणण्यानुसार इस्लाम मध्ये मद्यपान हराम समजले जाते व तेच सुरु केले गेले असल्याने त्यांच्या भावनांना ठेच पोहोचते.
अशा सगळ्या विषयांमुळे चर्चेत आलेल्या लक्षद्वीप बद्दल आणखीन एक गोष्ट आहे. ती म्हणजे तिथे ११ वर्षांपासून गांधीजींच्या पुतळ्याच्या स्थापनेला सुद्धा तिथल्या बहुसंख्य मुस्लिम समुदायाकडून विरोध करण्यात येत होता. काय आहे पूर्ण गोष्ट जाणून घेऊया.
–
- ‘बुद्धिस्ट टेरर’ म्हणून ओळखला जाणारा म्यानमारचा भिक्खू म्हणजे मुस्लिमांचा कर्दनकाळ!
- संस्कृत भाषेच्या प्रेमाखातर मुस्लिम राष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घेतला या युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश!
–
शांतीच्या मार्गावर चालणाऱ्या, शांतीनेच भारतासारख्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या, जगापुढे अहिंसेचे उदाहरण ठेवणाऱ्या गांधीजींचा पुतळा बसावण्याला लक्षद्वीप कोणाची पसंती नव्हती. तिथले नागरिक गेल्या ११ वर्षांपासून याचा विरोध करत आले होते.
लक्षद्वीप येथे यूपीएच्या शासनकाळात, लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती मध्ये महात्मा गांधीच्या पुतळ्याला स्थापित करण्यात येणार होते. गांधी जयंतीच्या दिवशी या पुतळ्याची स्थापना करू असा निर्णय घेण्यात आला होता.
गांधीजी, म्हणजे भारताचे राष्ट्रपिता, स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व, ज्यांच्या आदर्शांवर हा देश चालतो, ते बापू लक्षद्वीपमध्ये शांतीचाच संदेश घेऊन जाणार होते. सगळी तयारी पूर्ण झाली होती, सप्टेंबर २०१० ला एमवी अमीनदीवी जलयानातून महात्मा गांधींचा, २लाख रुपए खर्च करून बनवलेला पुतळा लक्षद्वीप येथे पाठवण्यात आला.
महात्मा गांधींची ती अर्ध-मूर्ति लक्षद्वीपमध्ये जलयानातून उतरवली सुद्धा गेली नव्हती, एवढ्यात लक्षद्वीपच्या मुसलमान समुदायाचा एक मोठा जत्था तिथे जमा झाला. व लक्षद्वीप येथे कोणत्याही प्रकारची मूर्ती स्थापित करण्याला विरोध करू लागला. लक्षद्वीप मध्ये ९८% जनसंख्या मुसलमानांची असली तरीही ते भारताचा एक भाग आहेत, हे ते बहुदा विसरले असावे.
परिस्थिती सांभाळून घेण्या करीता तिथल्या प्रशासनाने, हवामानाचे कारण पुढे केले. त्यांच्या अहवालानुसार वेळेवर लक्षद्वीपचे वातावरण बिघडून नैसर्गिक आपत्ती आल्याने पुतळा बसवण्याचे कार्य पूर्ण होऊ शकले नाही असा हवाला त्यांनी दिला. पण काही काळाने जेव्हा पुन्हा पुतळा स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा असाच विरोध झाला, व ते काम अर्धवट राहिले.
तिथल्या मुस्लिमांना याबद्दल विचारणा केल्यास त्यांचे म्हणणे पडले की इस्लाम कोणत्याही प्रकारच्या मूर्ती पूजनाची व मूर्तीचा आदर करणे हराम मानले आहे. आणि ते अल्लाह सोडून कोणाचाच आदर करीत नाही, कारण त्यांना इस्लाम तशी परवानगी देत नाही.
त्यांच्यासाठी अल्लाह सोडून सगळे हराम आहे. त्यामुळे जर तिथे गांधीजींच्या पुतळ्याची स्थापना केली तर त्यांना, त्या पुतळ्याच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी लागेल, त्याला हार फुल प्रदान करून अल्लाह सारखा त्याचा सुद्धा आदर करावा लागेल, आणि हे सगळे इस्लाम मध्ये हराम असून हिंदुत्वात त्याचे पालन करतात. त्यामुळे कोणताही सच्चा मुसलमान कधीच पुतळा बसवण्याची परवानगी देणार नाही आणि यानुसार तिथल्या मुसलमानांनी सुद्धा तेच केले.
लक्षद्वीप मध्ये मुसलमानांतर्फे झाल्या विरोधामुळे जलयान एमवी अमीनदीवी येथून महात्मा गांधींच्या त्या अर्ध-मूर्तिला कोची येथे पाठवण्यात आले आणि एका दिवसानंतर पुन्हा त्या मूर्तीला कवरत्ती येथे पाठवण्यात आले होते. त्या वेळी तिथल्या कलेक्टरने, म्हणजे एन वसंत कुमार यांनी या प्रकरणाशी धर्माला जोडू नये अशी अपील केली होती.
धर्माचा याच्याशी कोणताही संबंध नसून काही तांत्रिक अडचणींमुळे तो पुतळा लक्षद्वीप येथे बसवण्यात आम्हाला अपयश येते आहे असे सांगितले होते. पण काही काळाने सत्य बाहेर आले व प्रशासनाने मुस्लिमांच्या विरोधामुळे तो पुतळा स्थापन करण्याचे कार्य रद्द केल्याचे सुद्धा समजले. असे सांगण्यात येते की बराच काळ कोची आणि लक्षद्वीप अशा दोन्ही ठिकाणी सतत फिरत असलेली ती मूर्ती आता शेवटी लक्षद्वीपच्या प्रशासनिक कार्यालयात ठेवण्यात आली होती आणि कालच्या गांधी जयंतीच्या निमित्ताने एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावण्यात आला.
–
- दलितांनी मुस्लिमांसोबत राहावं, हे सांगणाऱ्याला ३ वर्षांत पाकिस्तान सोडून भारतात यावं लागलं होतं!
- ‘सारे जहाँ से अच्छा’ हे अजरामर काव्य रचणाऱ्या कवीला हवा होता स्वतंत्र मुस्लिम देश
–
सर्व धर्म समभावाला मानत आलेला हा देश आजही जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कारकिर्दीला, महानतेला डावलून धर्माच्याच पट्ट्यांनी स्वतःचे डोळे झाकून ठेवतो तेव्हा त्याला नेस्तनाबूत व्हायला वेळ लागत नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.