Site icon InMarathi

अरे देवा, लग्न केलं कुकरशी, पण ४ दिवसातच घेतला घटस्फोट कारण…

wedding cooker 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

काही महिन्यांपुर्वी हॉंगकॉंगमधील एका पठ्ठ्याने शारिरीक गरजा पुर्ण करण्यासाठी खरेदी केलेल्या एका बाहुलीशी थेट लग्न केलं. या बाहुलीबरोबर संसार थाटून इतर जोडप्यांप्रमाणेच घरकामं, रोमान्सही केल्याचे फोटो व्हायरल झाले. जगभरातून या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. काहींनी डोक्याला हात लावला तर काहींनी त्यावर ‘थिल्लरपणा’ अशी टिका केली.

 

 

माणूस, प्राणी, किंवा एखाद्या देखण्या बाहुलशी लग्न करण्याच्या घटना आपण याआधी ऐकल्या आहेत. आजही अशा घटना ऐकून किळस वाटत असेल, तर जरा थांबा, याहूनही नवाकोरा, विचित्र प्रकार समोर आलाय.

इंडोनेशियाच्या एका माणसानं प्राणी, पक्षी नव्हे तर चक्क प्रेशर कुकरशी संसार थाटलाय.

हो, हो तुम्ही बरोबर ऐकलंंय, धक्का बसणं स्वाभाविक आहे, मात्र हा विचित्र प्रकार नेमका का घडला? हे आधी जाणून घ्या,

कुकरवर प्रेम जडलं आणि….

इंडोनेशियात राहणा-या खोईरुल अनाम या महाशयांनी चक्क कुकरशी लग्न केल्याचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आणि एकच गदारोळ माजला.

अनाम हे इंडोनेशियात कन्टेन्ट क्रिएटर म्हणून काम करतात, त्यामुळे सोशल मिडीयावर त्यांचा चांगलाच वावर असतो. त्याचे अनेक फॉलोवर्सही आहेत. त्यामुळे त्याच्या या अजब कृत्याचे पडसाद जगभर पसरत आहेत.

तर झालं असं, की अनामने आपल्या सोशल मिडीयावर आपल्या लग्नाचा फोटो पोस्ट केला. प्रथमदर्शनी सर्वांना आनंद झाला मात्र अनामच्या फोटोत कुठेही त्याची वधू दिसत नव्हती, उलट अनामच्या शेजारी ठेवण्यात आलेल्या कुकरलाच नववधुचा पोषाख परिधान करण्यात आला होता.

 

 

त्या फोटोखालीच अनामने स्पष्टीकरण दिलं होतं. ही माझी बायको असं म्हणत त्याने कुकरशी विधिवत लग्न केल्याची कबुली दिली होती. यावेळी लग्नाते सर्व विधी पार पाडून कायदेशीर प्रक्रियाह पुर्ण केल्याचे त्याने सांगितले.

यातील एका फोटोत आपल्या नववधुला अर्थात कुकरला प्रेमाने चुंबन देणा-या अनामला पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

 

 

”माझी बायको खूप सुंदर असून तिला उत्तम स्वयंपाकही करता येतो, ती दररोज मला जेवण खाऊ घालते, त्यामुळे माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, म्हणूनच मी तिला जोडीदार म्हणून निवडलंय”. असं म्हणत अनामने प्रेमाची जाहीर कबुली दिली.

लग्न झालं आणि घटस्फोटही… 

कुकरशी लग्न करणा-या अनामचा अवघ्या चारच दिवसात संसार मोडला. कारण लग्नानंतरच्या चार दिवसात आपण कुकरशी घटस्फोट केल्याचंही त्याने खुलेआम जाहीर केलं.

याउलट या घटस्फोटाचे कारण सांगताना तो म्हणाला, ”माझ्या बायकोला भाताशिवाय इतर कोणाताही पदार्थ बनवता येत नाही. त्यामुळे मी तिच्याशी थाटलेला संसार मोडतो आहे”.

 

 

आधीच विचित्र लग्न, त्याचा गाजावाजा आणि नंतर तितकचं विचित्र कारण देऊन घेतलेला घटस्फोट ही सगळीच घटना सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनली आहे.

यावर नेटक-यांच्या अनेक चित्रविचित्र कमेंट्स येत आहे. अनेकांच्या मते हा पोरकटपणा असून अनेकांनी हा प्रसिद्धीसाठी केलेला स्टन्ट आहे अशीही टिका केली आहे. 

सोशल मिडीयाला दररोज अशा विचित्र घटनांची गरज असतेच, त्यामुळे अनामचा हा वेडेपणा सोशल मिडीया आणि नेटक-यांसाठी विकेंडसाठी चघळण्यात येणारा खाऊ ठरत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version