Site icon InMarathi

खाल्ल्यावर लगेचंच शौचाला जाताय! असं होणं किती धोक्याचं ठरू शकतं जाणून घ्या…

kangna inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

तुम्हाला माहिती आहे का? आपल्याकडे संगितले जाते की, भूक असेल तेवढेच खावे किंवा पचेल तेच खावे. हे सांगण्यामागे काय कारण असावे बरे? बरेचदा आपण भूक नसतानाही खातो किंवा दोन खाण्यांमध्ये खूप कमी अंतर ठेवतो. त्यामुळे होते काय की, आधी खाल्लेले अन्न पचायच्या आधीच आपण पुन्हा खाऊन आपल्या पचनसंस्थेला ताण देतो आणि मग साहजिकच ‘गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्शन’ ची परिस्थिती उद्भवते.

आता तुम्ही म्हणाल काय आहे हे ‘गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्शन’ ? तर मित्रांनो, ‘गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स’ म्हणजे आपण काहीही खाल्ले असता किंवा जेवणानंतर लगेच शौचास जावेसे वाटणे. पदार्थ पोटात जाताना होणारी ही प्रक्रिया जरी सामान्य असली तरी .. व्यक्तीनुसार त्याची तीव्रता मात्र वेगळी असू शकते.

 

 

अनेकदा लहान मुले खाल्ले की लगेच टॉयलेटकडे पळतात. खाल्ल्या खाल्ल्या लगेच शौचास होण्याची ही समस्या फक्त लहान मुलांनाच नव्हे, तर मोठ्या व्यक्तींनाही उद्भवते. खाल्ल्यानंतर लगेच शौच होण्याचे नेमके कारण काय आहे आणि ते आपल्या आरोग्यास किती हानिकारक आहे ते जाणून घेऊयात.

 

कारणे :

बैठी जीवनशैली आणि खोटी भूक :

बैठ्या जीवनशैलीमुळे शरीराची हालचाल कमी झाल्याने पचनाचे विकार सुरू होतात. त्यातच सतत काहीतरी खावेसे वाटणे यामुळे आधीचे पचण्याआधीच पुन्हा खाल्ले जाते. हे असे खाण्यामुळे खाल्या खाल्या शौचास जावेसे वाटते.

 

 

जठराची सूज :

अति मसालेदार खाणे, मद्यपान यांमुळे जठराला सूज येते त्यामुळे पचनक्रियेतील अवयवांवरील नियंत्रण कमी झाल्याने डायरियाची परिस्थिती उद्भवू शकते.

आतड्यांमध्ये अन्न साठून राहिल्यामुळे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम होवू शकतो ज्यामुळे ही शौचाची भावना सतत होवू शकते.
खाल्यानंतर अन्नाचे पचन होण्यास १ ते २ दिवस लागू शकतात.त्यामुळे खाल्ल्यानंतर लगेच शौचास जाणारी व्यक्ती १ किंवा २ दिवस आधी खाल्लेले अन्न उत्सर्जित करते.

 

 

 

या कारणांमुळे जेवल्यानंतर लगेच शौचाची भावना होत असली तरी यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवू शकतात. जसे की सतत गॅस पास करणे,तीव्र पोटदुखी, बद्धकोष्ठता, अतिसार ,मलअसंयमन, गुदाशयातील घाव, जंतुसंसर्ग , पाठदुखी इत्यादि. यातील काही लक्षणे तीव्र असल्याने कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होवून तो प्राणघातकही होऊ शकतो.

बऱ्याच वेळा योग्य व वेळेत निदान न झाल्याने अशा प्रकारचे पोटाचे आजार बळावतात आणि मग मोठमोठ्या शस्त्रक्रिया आणि खर्च सोसावा लागतो. पोटाचे आजार बऱ्याच वेळा रुग्ण आणि डॉक्‍टरांच्याही उशिरा लक्षात येतात. त्यातही गैरसमजूत आणि निष्काळजीपणा यामुळे शास्त्रशुद्ध आणि नेमके उपचार मिळण्यास विलंब होत जातो. त्यातून पुढे गुंतागुंत वाढते. पोटाचे आजार होणाऱ्यांमध्ये १८ ते ४० वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश अधिक आहे.

 

 

बदललेल्या जीवनशैलीबरोबरच चहा, कॉफी, मद्याच्या अतिसेवनामुळे पचनक्रियेसंबधी विकारांमध्ये वाढ होत आहे. चयापचय प्रक्रियेत व्यत्यय, चुकीचा आहार, मानसिक तणाव यांचा थेट परिणाम पचनक्रियेवर होताना दिसून येतो. प्रौढांमध्येही मोठ्या प्रमाणात पचनक्रियेसंबंधी आजार दिसून येतात.

अपचन, गॅस, पोटफुगी अशा तक्रारींचा सामना उतारवयात करावा लागतो. वय झाले की सांध्यांची हालचाल मंदावते, तसेच आतड्यांची हालचालही कमी होते. त्यामुळे अन्नमार्गातून अन्न संथपणे पुढे सरकते. त्यामुळे पोटाला फुगीरपणा जाणवतो.

 

 

पोट जड होते व बद्धकोष्ठाचा (Constipation) त्रास सुरू होतो. मंदावलेल्या हालचालींमुळे पोट किंवा जठर लवकर रिकामे होत नाही. त्यामुळे जेवल्यानंतर बराच वेळ जाऊनही पोट भरलेले वाटते आणि भूक लागत नाही.

मात्र या समस्येवर ही काही घरगुती उपचार करता येतात. पेलाभर पाण्यात बारीक किसलेले आले घालून ते उकळून घ्यावे. हे पाणी थंड झाल्यावर त्याचे सेवन करावे.

केळे आणि हिरव्या पालेभाज्या: यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असल्याने बद्धकोष्ठासारखी समस्या उद्भवत नाही. पचनासंबंधी तक्रारीही दूर होतात.

अंजीर: यामध्ये असलेले प्रोटीन पचनास उपयुक्त ठरते.
पुदीना: पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
जिरे: गॅसच्या समस्येवर गुणकारी. सकाळी काही खाण्यापूर्वी थोडीशी जिरे पावडर घ्या.

 

ताक थोडेसे मेथीदाणे, हळद, हिंग, जिरे एकत्र करून चूर्ण तयार करून ठेवा. जेवण झाल्यानंतर हे चूर्ण ताकात टाकून घ्या. गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या मुळापासून दूर होईल.
( हे उपचार घरगुती आणि परंपरागत केले जात असल्याने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावेत )

माणसाच्या प्रकृतीनुसार जेवल्यानंतर लगेच शौचास जाण्याची भावना होणे हे व्यक्तीसापेक्ष असू शकते. पण जर ही गोष्ट सतत होत असेल तर मात्र तज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version