मित्रांसाठी काहीपण : या अभिनेत्याने आपल्या मित्रांवर चक्क करोडो रुपये खर्च केलेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
मैत्रीखातर असंख्यजण आपल्याला मदत करत असतात. त्याची परतफ़ेडही सगळेचजण या ना त्या स्वरुपात करत असतात. अनेक चित्रपटातून खऱ्या आयुष्यात आपण बघितले आहे. मात्र प्रसिध्द हॉलिवुड अभिनेता जॉर्ज क्लूनीनं असं काही केलं की त्याचे मित्रच नव्हेत तर सगळं जग अचंबित झालं –
जॉर्ज क्लूनी. नाम हि काफ़ी है! असं व्यक्तिमत्व. हॉलिवुड अभिनेता जॉर्ज क्लूनी जगभरातल्या चाहत्यांचा अत्यंत लाडका अभिनेता. ६ मे १९६१ या दिवशी अमेरिकेतील लेक्सिंगटनमधल्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा पुढे जाऊन हॉलिवुड गाजवेल असं कोणी सांगितलं असतं तर विश्वास बसणं कठीणच होतं. मात्र जॉर्ज लहानपणापासूनच इतर सामान्य मुलांसारखा सामान्य स्वप्नं बघणारा नव्हताच.
धडपड्या जॉर्जला मदतीला नेहमी त्याचे मित्र धावून येत असत. जॉर्जचा अभिनयाच्याबरोबरीनं वाखाणण्यासारखा हा गूण आहे. त्याची मित्रसंपत्ती समृध्द आहे. आयुष्यात नेहमी मित्रांच्या गराड्यात असणारा, त्याच्या एका हाकेसरशी धावून येणारे मित्र कमावलेला हा अभिनेता माणूस म्हणून कायम जमिनीवर राहिला.
१९७५ साली तो नशिब अजमावया लॉस एंजेलिसमधे आला. तो लॉस एंजेलिसमधे आला तेव्हा त्याचा खिसा फाटका होता. दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत असणारा जॉर्ज लॉस एंजेलिसमधे संघर्ष करायला आला. मित्रांच्या मदतीनं त्यानं हे दिवस काढले.
रहाण्यासाठी घर भाड्यानं घेण्याइतके पैसेही त्याच्या खिशात नसत. मग मित्रांच्या घरी त्यांच्या सोफ़्यावर झोपण्यापुरतं जाऊन दिवसभर कामाच्या शोधात भटकणं असा त्याचा दिनक्रम होता. खरं तर ही खूप मोठी गोष्ट नाही. मात्र बाहेरच्या कडकडत्या थंडीत उबदार रात्रीची झोप संघर्षाच्या काळात मिळणं ही जॉर्जसाठी नक्कीच मोठी गोष्ट होती.
–
- जेम्स बॉण्डने स्टीव्ह जॉब्सला लिहिलेल्या व्हायरल पत्रामागचं सत्य तुम्ही वाचायलाच हवं!
- पुण्याच्या या आयआयटीयन व्यक्तीने हॉलीवूड अॅनिमेशनचा चेहरामोहरा बदलून टाकलाय!
–
पुढे जॉर्जासाठी हॉलिवुडची दारं उघडली आणि या सुपरहिट अभिनेत्यानं अब्जावधी कमावले. कामात व्यस्त असताना तो आपल्या संघर्षकाळातल्या मित्रांना विसरला नव्हता. त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे याचा अंदाज तो घेत रहात असे. लॉस एंजेलिसच्या सुरवातीच्या काळात त्याला हरप्रकारे मदत करणारे हे त्याचे १४ मित्र तो कधीच विसरू शकला नाही.
वर्ष २०१३. जॉर्जनं आपल्या चौदाही मित्रांना फ़ोन केला आणि कॅलेंडरमधे २७ सप्टेंबर २०१३ ही तारीख नोंदवून ठेवायला सांगितली. या दिवशी त्यानं या सगळ्य़ांना आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. मित्रांना कळेना की काय घडलंय? आपल्या सगळ्यांना एकत्र का बरं बोलवल असेल? ठरल्याप्रमाणे सगळेजण जॉर्जच्या घरी जमले.
जॉर्जच्या घरात आल्यावर त्यांनी पाहिलं की टेबलावर चौदा चमकत्या सूटकेसे नीट मांडून ठेवल्या होत्या. सगळेजण विचारात पडले होते की या सूटकेस अशा ठेवण्याचं कारण काय? काय असेल यांच्या आत? जॉर्जनं सगळ्यांचं हसतमुखानं स्वागत केलं. रूबाबदार कपड्यातला हॉलिवुडस्टार जॉर्ज समोर उभा असला तरीही वागण्या बोलण्यात १९७५ सालातला जॉर्जच होता.
आगतस्वागत झाल्यावर जॉर्जनं मनापासून बोलायला सुरवात केली. त्यानं सांगितलं की तो जेव्हा लॉस एंजेलिसमधे आला तेव्हा त्याच्याकडे खायला पैसे नव्हते की झोपण्यापुरताही निवारा. मात्र त्याचे हे संघर्षाचे दिवस सुसह्य झाले कारण त्याच्या पाठिशी त्याचे हे चौदा मित्र भक्कमपणे उभे राहिले. आज तो जो काही आहे त्यात या मित्रांच्या मदतीचा वाटा खूप मोठा आहे.
तो त्यांच्या मदतीची परतफेड कधीच करू शकणार नसला तरीही त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची त्याची इच्छा आहे आणि म्हणूनच या समोर ठेवलेल्या सूटकेस त्यांनी स्विकाराव्यात. मित्रांनी कुतुहलानं सुटकेस उघडल्या आणि त्यांनी आश्चर्यानं आ वासला.
कारण त्या सूटकेसमधे नोटांच्या थप्प्या होत्या. जॉर्जनं प्रत्येक मित्राला थोडे थोडके नाही तर प्रत्येकी तब्बल एक मिलियन (सात कोटींहून जास्त) डॉलर्स दिले होते. त्याच्या या चौदा मित्रांपैकी काहीजण आर्थिक अडचणीत होते हे त्याला माहित होतं.
एक मित्र मात्र सधन होता त्यानं हे पैसे घेण्यास नकार दिला. मात्र जॉर्जनं अट घातली की हे पैसे त्यानं दिले तर सगळ्यांना देईल नाहीतर कोणालाच नाही. हे ऐकल्यावर सधन मित्र विचारात पडले. कारण, त्यांच्या नकारामुळे ज्यांना गरज आहे अशांनाही पैसे मिळणार नव्हते. अखेर विचारांती त्यांनी ते पैसे स्विकारायचे ठरविले.
–
- हॉलिवूडच्या ‘गॉडफादर’ला अभिनयाचे धडे गिरवायला लावणारा दिग्गज भारतीय अभिनेता
- ३१ ऑस्कर नामांकने आणि ६ ऑस्कर पुरस्कारांचा पडद्यामागचा अस्सल मुंबईकर चेहरा!
–
केवळ मित्रांना मदत करणारा म्हणून नव्हे तर गरजूंना नियमित आर्थिक मदत करणारा म्हणून जॉर्जची ख्याती आहे. अनेक सेवाभावी संस्थांना जॉर्जकडून लाखो करोडो डॉलर्सची मदत दरवर्षी होत असते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.