Site icon InMarathi

गांधीगिरीचं महत्त्व सांगणाऱ्या संजू बाबाने खुद्द गांधींनाच ओळखलं नव्हतं…!!

dilip final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

चित्रपट म्हणजे सगळ्या कलांची सरमिसळ, मग त्यात तंत्रज्ञ आले, सेट डिझाईन करणारी मंडळी आली, मेकअपवाले, कलाकार आणि अशा सगळ्या मंडळींना बांधून ठेवणारा येतो तो दिग्दर्शक. दिग्दर्शकांच्या खांदयावर अख्ख्या सिनेमाची धुरा असते. सिनेमा हिट झाला तर दिग्दर्शकावर कौतुकाचा वर्षाव होतो मात्र तोच सिनेमा पडला तर त्याच्यावर टीकेची झोड देखील उठते.

 

 

दिग्दर्शकाला सगळ्याच कलांचं ज्ञान असायलाच हवं असं काही आग्रह नसतो, मात्र निदान थोडे तरी त्या गोष्टीचे ज्ञान असायला हवे असे म्हंटले जाते. आपले तंत्रज्ञ, कलाकार, सेटवरील मंडळी यांची निदान तोंडओळख तरी असायला हवीच. मात्र आपल्याकडचे बॉलीवूडकर एकत्र काम करून सुद्धा एकमेकांना ओळखत नाहीत. याचं उदाहरण म्हणजे आपल्या संजू बाबाने मराठीतल्या दिग्गज अशा दिलीप प्रभावळकरांना ओळखले नव्हते. नेमका काय घडला होता किस्सा तो जाणून घेऊयात…

 

रविवारची दुपार म्हणजे मुन्नाभाई हे समीकरणच आता बनून गेलं आहे. सूर्यवंशमने आपली परंपरा सुरु ठेवलीच आहे. तर मुन्ना भाई आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा सिनेमा. राजू हिरानी नामक एक हुशार दिग्दर्शक बॉलीवूडला मिळाला. मुन्नाभाईच्या यशानंतर राजूने त्याचा पुढचा भाग काढायचा ठरवला.

हुशार आणि भारतीय प्रेक्षकांची अचूक नस ओळखणाऱ्या राजुने पुढच्या भागात भाईगिरीला गांधीगिरीची जोड दिली. सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे महात्मा गांधींचा रोल कोण करणार? राजुने अनेक कलाकारांची टेस्ट घेतली. पण शेवटी बाजी मारली ती आपल्या मराठमोळ्या दिलीप प्रभावळकरांनी!

 

 

दिलीप प्रभावळकर हे मुळातच हरहुन्नरी कलाकार. हसवाफसवी सारख्या नाटकात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका करून आपले अभिनय कौशल्य दाखवले होते. दिलीप प्रभावळकरांनी तो विडा उचलला आणि महात्मा गांधींचा रोल अक्षरशः जिवंत केला. सिनेमात सर्वात जास्त सीन्स आहेत ते दिलीप प्रभावळकरांचे आणि संजू बाबांचे.

दिलीप प्रभावळकर गांधींच्या भूमिकेसाठी भरपूर मेहनत तर घेतली तसेच त्यांच्या मेकअपसाठी देखील वेळ लागत असे.  दिलीप प्रभावळकर यांच्या वक्तशीरपणामुळे कधीच उशीर झाला नाही त्याउलट आपला संजू बाबा. दिलीप प्रभावळकर मेकअप करून तयार झाल्यानंतर संजू बाबा सेटवर उगवायचा. त्यामुळे दिलीप प्रभावळकरांना प्रत्यक्षात संजू बाबाने बघितलेच नव्हते.

 

 

सिनेमा तयार झाला, निर्मात्याने प्रीमियर ठेवला होता तेव्हा सगळ्या कलाकार मंडळींना आवर्जून बोलवले होते. प्रीमियर संपला सगळ्यांचा कौतुक सोहळा चालू झाला. कधी नव्हे तो संजू बाबा प्रीमियरला हजर होता.

दिग्दर्शक राजुने संजू बाबा आणि दिलीप प्रभावळकरांची ओळख करून दिली. साहजिकच संजू बाबाने कोणीतरी एक सामान्य कलाकार म्हणून त्यांच्याकडे बघितले. हुशार राजुच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला की संजू बाबाने या दिग्गज माणसाला ओळखले नाही.

राजुने तातडीने संजूला सांगितले यांनीच गांधींचा रोल केला आहे. तीनताड उडालेल्या संजू बाबाने दिलीप प्रभावळकरांना कडकडून मिठी मारली आणि त्यांचे कौतुक केले.

जवळजवळ पूर्ण सिनेमात एकत्र काम करून सुद्धा इतक्या मोठ्या कलाकाराला न ओळखणे हे एक प्रकारे दिलीपजींचे त्यांच्या अभिनयाचे आणि मेकअपमनचे कौतुक तर आहेच मात्र दुसरीकडे आपले कामात किती लक्ष आहे हे संजू बाबाच्या वर्तनावरून दिसतेच.

 

संजू बाबाने जरी तितकीशी दिलीपजींची दाखल घेतली नसली, तरी खुद्द दिग्दर्शकाने त्यांचे पाय धरले आहेत. जेव्हा भूमिकेची स्क्रीन टेस्ट होती तेव्हा दिलीपजी जेव्हा गांधींचा गेटअप करून चालत आले तेव्हा एक क्षण दिग्दर्शक राजू देखील अवाक होऊन बघत बसला आणि त्याच क्षणी त्यांच्या पाया पडला.

या चित्रपटासाठी दिलीपजींना अनेक अवॉर्ड्स मिळाले होते . हा संपूर्ण किस्सा खुद्द दिलीप प्रभावळकरांनी एका मुलाखतीत सांगितला होता.

सलमान खान, गोविंदा ही मंडळी कामापेक्षा कामावर उशिरा येण्यामध्ये सर्वात पुढे असतात. तर दुसरीकडे महानायक अमिताभ बच्चनसारखी मंडळी सेटवर सर्वात पहिले हजर राहून कामावरचे प्रेम श्रद्धा दाखवून देतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version