Site icon InMarathi

दाक्षिणात्य लोक, मुख्यतः तामिळी लोक स्वतःच्या नावामागे आडनाव का लावत नाहीत?

jaylalita dhanusha sridevi inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘नावात काय आहे?’ असे विचारणार्‍या ‘हुज हू’पासून ‘नाम तो सुना होगा’ पर्यंतच्या सर्व, तमाम जनतेला आपाआपल्या नाव आडनावांचा सार्थ अभिमान असतो. पण आपल्याला नाव आणि आडनाव का दिले जाते? हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का?

मित्रांनो, नाव किंवा आडनाव ही आपल्याला ओळखण्याची एक सोय असते. म्हणजे जसे की आपण विज्ञानाचा अभ्यास करताना ‘धिस इज द वर्ल्ड ऑफ नेम्स अँड फॉर्म्स’ हे वाक्य बर्‍याचदा वाचतो. विज्ञानातील प्रत्येक संज्ञा ही एका विशिष्ट नावाने ओळखली जाते. त्यामागे त्या गोष्टीचा अभ्यास व्हावा हा हेतू असतो.

 

 

माणसाचे मात्र तसे नसते. जन्माला आल्यावर जे नाव त्याला मिळते तेच अखेरपर्यंत त्याच्या सोबत राहते. हे नाव किंवा आडनाव लावण्याची पद्धत जर एकट्या दुकट्याने बदलण्याच्या ऐवजी संपूर्ण गावाने, जिल्ह्याने, राज्याने आणि राज्यातील सगळ्या लोकांनी बदलले तर?

वही तो! दक्षिण भारतातील विशेषतः तामिळनाडू राज्यातील लोक आपल्याला आपली ओळख देणारी आडनावे लावताना दिसत नाहीत. काय असेल बारे यामागचे कारण? चला जाणून घेऊ ही नामांतराची कथा.

विश्वनाथ आनंद, आर. कार्तिक, इ. व्ही. रामास्वामी ही नावे तर तुम्हाला परिचित आहेतच. या नावांमध्ये कुठेच आडनावे नाहीत. ही सगळी नावे दक्षिण भारतीय नावे आहेत.

 

अशी असत तामिळ नावे…

तामिळ नावे सहसा प्रथम गावाचे नाव, वडिलांचे नाव, स्वत:चे नाव आणि जातीचे नाव या स्वरुपात असत. याला आश्रयदात्याच्या नामकरणाची व्यवस्था असे म्हणतात. बहुतेक तामिळ महिला आपल्या पतीचे पहिले नाव आडनाव म्हणून लावतात.

पूर्वीच्या काळी तामिळ लोक त्यांचे आडनाव म्हणून जातीचे नाव किंवा गावाचे नाव वापरत असत. पण पेरियार ई. व्ही. रामास्वामी यांनी तामिळनाडूमध्ये ‘द्रविड स्वाभिमान चळवळ’ सुरू केली तेव्हापासून सगळा बदल व्हायला सुरुवात झाली. ही चळवळ म्हणजे जाती व्यवस्थेविरुद्ध उचललेले पाऊल होते.

 

blog.ipleaders.in

 

त्यांनी सर्वप्रथम साईन बोर्ड, इमारती, हॉटेल्स, यांच्या नावातून जातीची नावे काढून टाकायला सांगितली. ही एक गोष्ट यशस्वी झाल्यावर त्यांनी लोकांना त्यांच्या जातीवर आधारित आडनावे काढून टाकण्याची सूचना केली. यामुळे एखाद्याचे आडनाव ऐकल्यानंतर तयार होणारे पूर्वग्रह, निर्माण व्हायचे बंद झाले.

जाती व्यवस्था संपवण्यासाठीच्या लढ्यात ही गोष्ट खूप मोठी गोष्ट आहे. सर्व समान आहेत, हे दर्शवण्यासाठी ही पद्धत अवलंबली गेली. जर तुम्हाला जातीची आडनावे लावणारे तामिळ लोक दिसले तरी हे समजून जा, की हे लोक किंवा त्यांचे पूर्वज रामास्वामींचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच तामिळनाडुमधून बाहेर पडले होते किंवा बाहेर स्थायिक झाले होते. त्यांनी आपली आडनावे लावली तरी त्यांना आणि इतर तामिळ समाजाला त्याने फारसा फरक पडत नाही. आणि ते कोणती तक्रार देखील करत नाहीत.

 

 

तामिळ समाजाने जात निर्मूलनासाठी उचललेले पाऊल हे नक्कीच कौतुकास्पद आणि सर्व भारतीयांसाठी आदर्श ठरणारे आहे. ‘जात नाही’ ती ‘जात’ ही म्हण खोटी ठरवत दक्षिण भारतीय, त्यातल्या त्यात तामिळी लोकांनी सर्वसमावेशक समाज होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version