Site icon InMarathi

तुम्ही बटर समजून जे खाता ते मार्जरीन तर नाही ना? सत्य जाणून घ्याच

butter-margarine-featured-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बटर म्हणजे आपल्या मराठी भाषेत लोणी! कोणाला नाही आवडत ओ हे लोणी?! गावाला मिळणारं लोणी अस्सल, ते तोंडात विरघळताच स्वर्गीय आनंदाचा अनुभव येत नसेल तर नवलच!

आपल्या शहरातलं लोणी म्हणजे ‘बटर’! शहरात लोण्याचं बटर हे नामकरण होतं आणि सोबतच त्याच्यातलं गावठी अस्सलपण देखील हरवतं. पण नाईलाजाने आपण ते लोणी सुद्धा खातोच, करणार काय? दुसरा पर्याय नाही ना बुवा!

सकाळी न्याहारीला ब्रेड असेल तर बटर हवं, बाहेर पावभाजी, सॅण्डविच खाताना बटर हवंच, हॉटेलात चहा बरोबर बन मागवला की त्यालाही बटर हवंच… बनमस्का तर अनेकांचा अगदीच आवडीचा पदार्थ असतो. म्हणजे बघायला गेलं तर या बटरशिवाय आपलं पान हलणं मुश्कील!

 

historyhole.com

 

तुम्ही देखील रोज न चुकता बटर खात असाल. खाण्याच्या अनेक पदार्थांमध्ये त्याचा वापर करत असाल, तर तुम्हाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे की, “तुम्ही बटर समजून जे खाता ते मार्जरीन तर नाही ना?”

काय म्हणता? प्रश्न समजला नाही? मार्जरीन म्हणजे काय माहित नाही? अहो मग हे धक्कादायक प्रकरण तुम्ही जाणून घेतलंच पाहिजे!

सगळ्यात पहिले जाणून घेऊया मार्जरीनचा अर्थ- 

मार्जरीन हा एक असा पदार्थ आहे, जो बटरसारखाच दिसतो, पण वास्तवात ते बटर नसते. हेच ते बाजारात आपल्याला मिळणारे लाईट बटर होय.

सर्वसामान्य बटरमध्ये कोलेस्ट्रोल असते, त्यामुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते. वजनाच्या बाबतीत आपण सजग असतो. फिटनेसची चिंता आपल्याला असतेच. म्हणून मग लाईट बटरच्या नावाखाली मार्जरीन विकलं जातं.

 

iluminasi.com

 

मार्जरीन हा वनस्पती तेलापासून बनिवण्यात आलेला पदार्थ आहे. वनस्पती तेला ला आपल्याकडे डालडा म्हणूनही ओळखलं जातं. ज्याची आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होते. याचं मुख्य कारण म्हणजे ते स्वस्त असते.

त्यामुळे ग्राहकदेखील ते लगेच खरेदी करतात. विशेष म्हणजे, यातून विक्रेत्याला चांगला नफा मिळत असल्याने; तो देखील याच्याकडे पैसा कमवण्याचं साधन याच दृष्टीकोनातून पाहतो.

वजन वाढू नये म्हणून लाईट बटर खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे ‘वजन नियंत्रणात राहतं का?; हा झाला एक भाग; पण हे लाईट बटर आपल्या आरोग्यासाठी कितपत चांगलं आहे ते तुम्ही पाहायलाच हवं.

 

 

१) मार्जरीन बनवताना उच्च तापमानाचा वापर केला जात असल्याने वनस्पती तेलामधील जीवनसत्त्वे निघून जातात.

 

२) मार्जरीन हे गर्भवती महिला किंवा लहान मुलांसाठी अपायकारक आहे. कारण त्यांना नैसर्गिक पद्धतीनेने तयार केलेल्या बटरची अवश्यकता असते.

 

३) यामध्ये ट्रान्स फॅट असिडचे प्रमाण जास्त असल्याने याच्या सेवनाने शरिरातील असिडचे प्रमाण वाढण्यास मदत होते. म्हणजेच पित्ताचा त्रास होण्याची शक्यता वाढते.

 

shawacademy.com

 

४)  द टेलिग्राफच्या एका रिपोर्टनुसार, मार्जरीन हे बटर नसल्यामुळे त्यापासून आपल्या आरोग्याला काहीच लाभ मिळत नाहीत.

 

५) मार्जरीन वनस्पती तेलापासून बनविण्यात येत असल्यामुळं त्यात कोलेस्ट्रॉल नसतं. पण बटरसारखे दिसावे म्हणून यात अनेक केमिकल वापरले जातात, ज्याचा आपल्या ह्रदयावर थेट परिणाम होतो.

 

६) मार्जरीन हे वनस्पती तेल असल्याने अनसॅच्युरेटेड फॅट मोठ्या प्रमाणावर असतात.

जर अधिक माहिती हवी असेल तर  डेली मेल या प्रतिष्ठीत वृत्तपत्राने प्रकाशित केलेली ही बातमी तुम्ही वाचायलाच हवी!

 

michaelolesky.com

 

असं आहे हे लाईट बटरचं गौडबंगाल, तुम्ही सुज्ञ आहातच स्वत:साठी योग्य ती निवड करण्यास!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version