' Waste Management करत पर्यावरणसंवर्धनाला हातभार लावणारे ५ यशस्वी स्टार्टअप्स – InMarathi

Waste Management करत पर्यावरणसंवर्धनाला हातभार लावणारे ५ यशस्वी स्टार्टअप्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

वेस्ट मॅनेजमेंट अर्थात घनकचऱ्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्त्वाचा जागतिक मुद्दा झालेला आहे. प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या भारतासारख्या देशात तर ही फार मोठी समस्या आहे, असंही म्हणायला हरकत नाही.

कचऱ्याचं व्यवस्थापन योग्यरित्या झालं नाही, तर नेमक्या काय काय समस्या उद्भवू शकतात, हे भारतीयांना वेगळं सांगायची गरज पडणारच नाही. निव्वळ महत्त्वाचा मुद्दा म्हणा किंवा एक गंभीर समस्या, याचं निवारण करणं ही काळाची गरज बनली आहे.

 

waste on road inmarathi

 

ही समस्या सोडवणं नागरिकांच्या सुद्धा हातात आहे, यात शंकाच नाही. पण घनकचरा व्यवस्थापन हा एक व्यवसायही होऊन गेला आहे. एकक बाजूला कचऱ्याची विल्हेवाट लागल्याने पर्यावरणाची हानी टाळण्याची किंवा कमी करण्याची संधी मिळते, तर दुसरीकडे ते उत्पन्नाचं एक महत्त्वाचं साधन बनतं.

आज अशाच काही भारतीय स्टार्ट अप्सबद्दल जाणून घेऊयात, ज्यांनी वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हाती घेतलं आहे.

१. SKRAP

दिव्या रविचंद्रन हिने २०१७ साली skrap अर्थात स्क्रॅपची स्थापना केली. ऑफिस आणि विविध कार्यक्रम यांच्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याची संपूर्ण जबाबदारी ही संस्था घेते.

 

skrap waste management inmarathi

 

मोठमोठाले इव्हेंट्स, ऑफिसेस, संस्था त्यांचे कार्यक्रम अशा ठिकाणी तयार होणारा कचरा, त्याचं व्यवस्थापन करणं आणि आणि ‘शून्य कचरा’ संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करण्याचं काम स्क्रॅपमार्फत होत असतं. ही कंपनी मुंबईत काम करते.

२. साहस झिरो वेस्ट

अशा संस्था, ऑफिसेस, प्रॉपर्टीज जिथे मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो, त्यांच्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याचं काम ‘साहस’मार्फत पाहिलं जातं. सगळ्या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करण्याच्या योजना आखणं आणि त्या अमलात आणण्याचं प्लॅनिंग करून देणं हे काम या संस्थेमार्फत केलं जातं.

 

saahas zero waste inmarathi

 

३. जेम एन्विरो मॅनेजमेंट

स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणासाठी झटणारी ही आणखी एक कंपनी! रिसायकलिंग हा यांचा मुख्य उद्देश आहे. सामानाच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचे रिसायकलिंग करण्याचं काम हे जेम एन्विरोचं मुख्य काम आहे असं म्हणता येईल. त्यांच्या मशिन्समध्ये बाटल्या किंवा तत्सम वस्तू टाकल्या जातात आणि त्यापुढील गोष्टींची काळजी कंपनीकडून घेतली जाते.

 

gem enviro management inmarathi

 

४. नमो ई -वेस्ट मॅनेजमेंट

ई -वेस्ट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून निर्माण होणारा कचरा हादेखील सध्याच्या काळात एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नमो ई -वेस्ट मॅनेजमेंटमार्फत अशा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम करण्यात येतं.

अक्षय जैन या मेकॅनिकल इंजिनियर व्यक्तीने ही कंपनी स्थापन केली. इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना तिथल्या इ-कचऱ्याचे मॅनेजमेंट बघून ही कल्पना त्याला सुचली. आज त्याने ती यशस्वीरित्या अमलात आणली आहे.

 

namo e waste management inmarathi

 

५. एक्सट्राकार्बन

गौरव जोशी यांनी २०१३ साली ही कंपनी सुरु केली. या कंपनीची संकल्पना फारच निराळी आहे असं म्हणता येईल. घर, ऑफिसेस अशा ठिकाणांहून रिसायकल होऊ शकेल असा कचरा गोळा करण्यासाठी कंपनी स्वतःच ‘भंगारवाला’ पाठवते. अर्थात यासाठी तुम्हाला आधी कंपनीला तसं सांगावं लागतं.

 

extracarbon inmarathi

 

कार्बन फूटप्रिंट म्हणजेच एका व्यक्तीकडून तयार होणारा कार्बनचा समावेश असणारा कचरा! असा कचरा एकाच व्यक्तीकडून अधिक प्रमाणात तयार होऊ नये, होत असेल तर त्याची योग्य विल्हेवाट लावली जावी हे काम या कंपनीतर्फे केलं जातं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?