Site icon InMarathi

औषधांच्या पॅकेटवर असणाऱ्या लाल रेषेचा नेमका अर्थ जाणून घ्या!

red line medicine strip inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजारपण हे कायमच नकोसं वाटतं. त्यात डॉक्टरांकडे जायचं म्हणजे त्यांनी दिलेली कडू औषधं घ्यायची ही कुणालाच न आवडणारी गोष्ट आहे. सध्याच्या काळात मात्र औषध घेणे ही एक गरज बनली आहे. छोट्या छोट्या आजारावर सुद्धा औषध घेतले जाते. औषधांमुळे आपल्याला बरे वाटतं, पण आजारपण दूर होतं. काहीवेळा हिच औषधं आपल्यासाठी घातक सुद्धा ठरू शकतात.

आजारी पडल्यावर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चिठ्ठीवर नक्की कोणतं औषध दिलं आहे हे वाचायची उत्सुकता प्रत्येकाला कायमच असते.

 

 

त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सामान्य लोकांना कळत नाहीत ही गोष्ट वेगळी. पण त्या गोळ्यांच्या पाकिटावर Rx, Nrx किंवा XRx असं लिहिलेलं आपण पाहतो त्याचा नक्की अर्थ काय ते आपण जाणून घेऊया.

Rx

यातील Rx लिहिलेलं असते त्याचा अर्थ हा असतो, की हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं असतं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधं घेतली, तर ती घातक ठरू शकतात. त्यामुळे Rx लिहिलेली औषधं ही डॉक्टरने ज्या रुग्णाला दिली आहेत त्यानेच फक्त ती घ्यायची असतात. इतरांसाठी ती घातक ठरू शकतात. पुढच्या वेळेपासून Rx लिहिलेली औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.

 

NRx

NRx लिहिलेली औषधही डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाहीत. कारण यात काही प्रमाणात ड्रग्सचा वापर केलेला असतो. यामुळे ही औषध फक्त तेच डॉक्टर किंवा दुकान देऊ शकतात ज्यांच्याकडे या औषधांसंबंधित ड्रग्सचा परवाना आहे.

 

 

XRx

काही औषधांच्या पाकिटावर XRx असे लिहिलेले असते. याचा अर्थ असा. की ही औषधं फक्त डॉक्टरच देऊ शकतात. म्हणजेच हे औषध डॉक्टर थेट रुग्णाला देतात. डॉक्टरांनी प्रिस्क्रिपशनमध्ये लिहून दिले, तरी हे औषध रुग्ण मेडिकल स्टोअरमधून विकत घेऊ शकत नाही.

 

 

लाल रेघेचा अर्थ…

आपण जर थोडे निरखून पाहिले, तर काही औषधांच्या पाकिटावर आपल्याला लाल रंगाची पट्टी दिसते. आपण काही वेळा विचार करतो की ही पट्टी का दिली असेल. पण आपल्याला त्याच्या मागचा अर्थ कळत नाही. ती पट्टी ही सतर्कतेसाठी असते. त्या लाल पट्टीचा अर्थ असा, की ते औषध फक्त डॉक्टरच देऊ शकतात.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध विकता येत नाही आणि त्यासोबतच सल्ल्याशिवाय त्याचं सेवन करणंही योग्य नाही. अशा औषधांना अँटिबायोटिक औषध म्हणतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ही औषधं मलेरिया, टीबी, मुत्रसंदर्भातील समस्यांसाठी वापरली जातात. तसेच एचआयव्हीसारख्या अतिगंभीर आजारांवर सुद्धा अशी औषधं वापरली जातात. त्यामुळे ही औषधं घेण्यासाठी डॉक्टरांची परवानगी घेणं अतिशय गरजेचं आहे.

 

 

पुढच्या वेळेपासून जेव्हा तुम्ही, तुमच्या घरातले किंवा शेजारी पाजारी आजारी पडतील तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेली औषध व मेडिकल मधून आणलेली औषध कोणती आहेत ती नक्की पहा. आपण जी औषध घेत आहोत ती नक्की योग्य आहेत ना हे तपासून पाहणं आपली जबाबदारी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version