उत्साहाच्या भरात मित्राला कळवलं आणि बॉलिवूडच्या ‘बॅड मॅन’ची हॉलीवूडवारी हुकली…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
कोणत्याही घटनेची प्रसिद्धी जितकी महत्वाची असते तितकीच गोपनीयता टिकवणं सुद्धा गरजेचं असतं. आजच्या सहज शेअरिंगच्या जगात हा समतोल ज्या व्यक्तीला राखता आला त्याची कधीच फजिती होणार नाही हे नक्की.
गोपनीयता राखण्याचं कारण हे प्रत्येक वेळी दृष्ट लागणं वगैरे नसतं. तुमच्याकडे असलेली बातमी सांगण्याची ‘हीच ती योग्य वेळ’ हे संकेत ज्याचे बरोबर असतात त्याचं कौतुक होतं, अन्यथा तुम्ही लोकांच्या टिकेस पात्र ठरता. हे फक्त सामान्य माणसालाच नाही, तर सेलिब्रिटी लोकांना सुद्धा लागू पडतं. गुलशन ग्रोव्हर या बॉलीवूडच्या यशस्वी खलनायकाने अशीच एक चूक केली जी त्याला फारच महागात पडली होती.
काय झालं होतं?
“जिंदगी का मजा तो गोलगप्पे मे ही है” हे दिलजलेमधील वाक्य लोकप्रिय करणाऱ्या गुलशन ग्रोव्हरला हॉलीवूडमध्ये काम करण्याची एक संधी चालून आली होती. २००६ ची ही गोष्ट आहे. जेम्स बॉण्डच्या सिनेमाची टीम ही कॅसिनो रॉयल या सिनेमासाठी कलाकार शोधत होते. डॅनियल क्रेग हा नवीन बॉण्ड या टीमने फायनल केला होता. आता ही टीम डॅनियल क्रेग समोर शोभून दिसेल असा ताकदीचा व्हिलन शोधत होती.
कास्टिंग टीम जगभरातील व्हिलनचं काम करणाऱ्या कलाकारांचा अभ्यास करत होती. ‘राम लखन’सारखा गुलशन ग्रोव्हरने साकारलेला एखादा ‘बॅड मॅन’ कदाचित त्यांच्या पाहण्यात आला असावा. तो त्यांच्या मनात भरला.
–
- ३१ ऑस्कर नामांकने आणि ६ ऑस्कर पुरस्कारांचा पडद्यामागचा अस्सल मुंबईकर चेहरा!
- जेम्स बॉण्डने स्टीव्ह जॉब्सला लिहिलेल्या व्हायरल पत्रामागचं सत्य तुम्ही वाचायलाच हवं!
–
गुलशन ग्रोव्हरला जेव्हा या टीमने व्हिलन म्हणून बॉण्ड समोर उभं करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी रीतसर लंडनला येण्याचं बोलावणं पाठवलं. गुलशन ग्रोव्हरने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीनुसार हे बोलावणं त्यांना चक्क प्रिन्स चार्ल्सच्या एका चुलत भावाकडून आलं होतं.
२००५ मध्ये गुलशन ग्रोव्हर सेंट जेम्स पॅलेस इथे निर्मात्यांना भेटायला गेला होता. मार्टिन कॅम्बेल हे या सिनेमाचे दिगदर्शक होते. ‘कोलंबिया पिक्चर्स’ची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं १५० मिलीयन युएस डॉलर्स इतकं बजेट होतं.
डॅनियल क्रेगला या टीमने आधी झालेल्या ‘पिअर्स ब्रॉसनन’ला बाजूला ठेवून संधी दिली होती, म्हणून निर्माते आणि वितरणाचे हक्क आधीच विकत घेतलेले सोनी पिक्चर्स हे या सिनेमाकडे लक्ष ठेवून होते.
१४४ मिनिटांच्या या सिनेमात आपल्याला ‘ली किफायर’ नावाच्या व्हीलच्या रोलमध्ये गुलशन ग्रोव्हर दिसला असता. पण, त्याने एक घोडचूक केली की त्याने लंडनहून आनंदाच्या भरात आपल्या भारतातील एका मित्राला “मी पुढच्या बॉण्डपटात व्हिलन म्हणून काम करणार आहे” असं सांगितलं.
यामध्ये त्यांचं काय चुकलं? तसं बघितलं तर, काहीच नाही… चूक ही होती, की तो मित्र ‘डेली मिरर’ या वृत्तपत्राचा पत्रकार होता. त्या मित्रासाठी ती एका मित्राच्या आनंदाच्या बतमीपेक्षा एक ‘ब्रेकिंग न्यूज’ होती.
गुलशन ग्रोव्हरच्या त्या मित्राने ही बातमी दुसऱ्या दिवशीच्या ‘डेली मिरर’मध्ये छापून आणली. इंटरनेटमुळे जग छोटं झालं आहे. ही बातमी ‘कॅसिनो रॉयल’च्या निर्मात्यांपर्यंत वाऱ्याच्या वेगाने पोहोचली.
निर्मात्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही. बोलणी प्राथमिक स्वरूपात असतांना गुलशन ग्रोव्हरने आपल्या पत्रकार मित्राला ही गोष्ट सांगणं त्यांना अजिबात आवडलं नाही. भारतीय लोकांप्रमाणे कोणत्याही भावनेच्या बंधनात न अडकता त्यांनी गुलशन ग्रोव्हरला या सिनेमात न घेण्याचा निर्णय घेतला.
‘ली किफायर’चा रोल त्यानंतर मॅड्स मिकेल्सन या अभिनेत्याला देण्यात आला आणि गुलशन ग्रोव्हरला रिटर्न तिकीट देऊन भारतात पाठवण्यात आलं.
–
- स्टीव्हन स्पीलबर्गने सत्यजित रे यांची कथा चोरून तयार केला होता हा सुपरहिट चित्रपट!
- जर तो सैन्यात गेला असता, तर भारतीय प्रेक्षक एका उमद्या अभिनेत्याला मुकला असता!
–
गुलशन ग्रोव्हरच्या करिअरमध्ये या घटनेमुळे फार काही फरक पडला असं नाहीये. पण एका बॉण्डपटात काम करता येणं हे अनेक छोट्या सिनेमात काम करण्याच्या प्रसिद्धीसारखं असतं हे सगळेच मान्य करतील.
गुलशन ग्रोव्हरने नंतर ‘अवतार’ या हॉलीवूड फिक्शनमध्ये काम केलं होतं. पण, हे शल्य त्यांना नेहमीच टोचत राहील असं त्यांनी एका वृत्तपत्राला बोलतांना सांगितलं होतं. ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ या म्हणीप्रमाणे घडलेल्या या घटनेतून आपणही शिकण्यासारखं आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.