' तुमचे डिजिटल व्यवहार आता इंटरनेटशिवाय देखील करू शकता, या सिंपल टिप्स वापरा – InMarathi

तुमचे डिजिटल व्यवहार आता इंटरनेटशिवाय देखील करू शकता, या सिंपल टिप्स वापरा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

पूर्वीच्या काळात एखादी वस्तू विकत घ्यायला जायचं म्हणजे पैसे घेऊन जावे लागत असे. तस आताच्या काळात सुद्धा एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी पैसे घेऊन जावे लागतातच. पण आत्ता ते पैसे घेऊन न जाता फक्त मोबाईलच्या एका क्लिकवर आपल्या अकाऊंटमधून समोरच्याच्या अकाऊंट मध्ये जातात. डिजिटल इंडियामुळे अगदी मॉल, मोठमोठी शॉपिंग सेंटर पासून रस्त्यावरील भाजी विक्रेतेसुद्धा ऑनलाईन पेमेंटची सुविधा पुरवत आहेत.

या ऑनलाईन पेमेंट सुविधांसाठी फोन पे, गूगल पे, पेटीएम किंवा भीम अशा अॅपचा वापर केला जातो. स्मार्टफोनवरून या अॅप आणि इंटरनेटच्या सोबतीने काही क्षणात पेमेंट केले जाते. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर अशा पेमेंट्सचा वापर वाढला आहे. एकमेकांना पैसे देताना किंवा घेताना कोरोनाच्या भीतीवर उपाय म्हणून अनेक जण हा पर्याय वापरत आहेत. या सेवेला युपीआय असे म्हंटले जाते.

 

online payment inmarathi

 

‘यूनीफाईड पेमेंट्स इंटरफेस’ म्हणजेच ‘यूपीआय’ ही सेवा येण्यापूर्वी नेट बँकिंग किंवा कार्ड पेमेंट हा पर्याय हि उपलब्ध होता. पण नेट बँकिंगची काही प्रमाणातील संथ प्रक्रिया आणि कार्ड पेमेंटसाठी प्रत्येक वेळेला कार्ड सोबत ठेवावे लागणे त्यामुळे या दोन सुविधा जास्त प्रमाणात वापरल्या जात नाहीत. युपीआयमुळे या प्रक्रियेची गती वाढली व लोकांना कमी वेळेत पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध झाली.

 

upi 3 inmarathi

यात ही एक समस्या मात्र आहे जर एखाद्यावेळी पेमेंट करत असताना अचानक इंटरनेट बंद झाले तर, आणि आपण पेमेंट करत असलेली प्रक्रिया तशीच अर्धवट राहिली तर. आपण समोरच्याला पैसे कसे देणार हा प्रश्न उभा राहतो? यावर भारत सरकारच्या ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीएससी)’ या संस्थेने नोव्हेंबर २०१२ मध्ये एक सुविधा सुरु केली. डिजिटल पेमेंट्स सेवा येण्याच्या ४ वर्ष आधीच भारत सरकारने ही सुविधा आणली होती. या सेवेअंतर्गत इंटरनेट बंद असतानाही तुम्ही एखाद्याला पेमेंट करू शकता.

या भारत सरकारच्या सुविधेला ‘*९९#’ हे नाव देण्यात आले आहे. व हि सुविधा कशी कार्य करते हे आपण पाहूया.

पहिली पायरी

सर्व प्रथम तुम्हाला भीम अॅप डाउनलोड करून त्यावर युपीआय खाते बनवणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला तुमचा योग्य मोबाईल नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक करावे लागेल.

 

bhim app inmarathi

दुसरी पायरी

त्यानंतर तुम्ही फोन मध्ये ‘*९९# बटण दाबून कॉल करावा. या कॉलनुसार तुम्हाला ७ विविध पर्यायांचे मेनू दिसतील. ज्यात पैसे पाठवणे, पैसे प्राप्त करणे, बॅलन्स तपासणे, युपीआय पिन तपासणे, व्यवहारच्या नोंदी आणि अकाउंट बद्दलची माहिती असे पर्याय दिसतील.

 

smartphones
newsilike

तिसरी पायरी

पैसे पाठवण्यासाठी १ नंबरचा पर्याय वापरावा आणि यात तुम्हाला व्यवहार करण्यासाठी युपीआय आयडी, बँक अकाउंट नंबर, आयएफसी कोड किंवा फोन नंबरच पर्याय दिला जातो. यातील तुमच्यासाठीचा योग्य पर्याय तुम्ही निवडावा.

 

ifsc inmarathi

 

चौथी पायरी

जर तुम्ही यात युपीआय आयडी निवडलात, तर तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा युपीआय आयडी टाकावा लागेल. जर तुम्ही बँक अकाऊंट निवडलत तर तुम्हाला अकाऊंट नंबर आणि आयएफसी कोड टाकावे लागेल. आणि जर तुम्ही फोन नंबर चा पर्याय निवडलात तर तुम्हाला समोरच्याचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.

 

number inmarathi

 

पाचवी पायरी

यांनतर ज्याप्रमाणे तुम्ही युपीआय अॅपमध्ये एखाद्याला पैसे पाठवताना ज्या प्रकारे त्यात किंमत टाकता. तसेच तुम्हाला इथे एखाद्याला किती पैसे पाठवायचे आहेत ती किंमत यात टाकावी लागेल.

 

money 22 inmarathi

 

पायरी सहावी

सर्वात शेवटी तुमचा युपीआय नंबर टाकून सेंड बटणवर क्लिक करावे. म्हणजे तुमची प्रक्रिया पूर्ण होईल. तुम्ही पूर्ण केलेल्या प्रक्रियेची तुम्हाला पुष्टीकरण तुमच्या फोनवर मेसेजमार्फत येईल. तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल की ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे पाठवले आहेत त्याच व्यक्तीला तुम्हाला भविष्यातही पैसे पाठवायचे असल्यास त्याची माहिती सेव्ह करून ठेवू शकता. या संपूर्ण सेवेचे तुमच्याकडून ०.५० पैसे शुल्क आकारले जातील.

 

बँक खाते कसे बदलायचे?

*९९# ही सेवा तुम्हाला विविध बँक खाते वापरण्याची परवानगी देते. बँक खाते बदलण्यासाठी *९९# दाबून त्यातील माय प्रोफाइल हा पर्याय निवडावा. यात तुम्हाला बँक खाते बदलण्याचा पर्याय मिळतो. यात तुमच्या बँकेचे आयएफसी कोड टाकून तुम्हाला हवे असणारे अकाऊंट समोर दिसेल आणि ते तुम्ही निवडून पुढील व्यवहारांसाठी सेव्ह करू शकता.

 

bank accounts inmarathi

ही सेवा अत्यंत सुरक्षित असून यासाठी तुम्हाला सर्व प्रथम ४ अंकी पिन कोड टाकावा लागतो. जो पिन कोड तुम्ही स्वतःच ठेवलेला असतो तो कोणालाही सांगू नये. जर तुमचा फोन चोरीला गेला तर तुम्ही ज्या प्रमाणे ऑपरेटरला सिम बंद करण्याचे विनंती करता त्याचप्रमाणे तुम्ही बँकेला विनंती करू शकता, की काही काळासाठी मोबाईल बँकिंग सेवा बंद करावी.

तर यापुढे कधीही ऑनलाईन पेमेंट करताना अचानक इंटरनेट गेल्यावर समोरच्याला पैसे कसे द्यायचे या भीतीने घाबरून न जाता. भारत सरकारने आपल्यासाठी तयार केलेल्या या सुविधेचा वापर करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?