आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
सध्या टॅटू अंगावर गोंदवून घेणं ही एक फॅशन झाली आहे! त्या टॅटूमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात! शरीराच्या कोणत्याही भागावर आता तुम्ही टॅटू काढू शकता!
पूर्वीच्या काळातल नाव गोंदवून घेण्याला आज एक प्रोफेशन म्हणून ओळख मिळाली आहे! फॅशन बाजूला ठेवली तर ही सुद्धा एक कलाच आहे!
आज तुमच्या परिसरात सुद्धा तुम्हाला कित्येक टॅटू पार्लर सापडतील!
मोठमोठे गायक, पेंटर, आर्टिस्ट, अभिनेते, अभिनेत्री ह्यांच्या सुद्धा अंगावर तुम्हाला टॅटू काढलेले दिसतील!
हे ही वाचा –
===
कित्येक क्रिकेटपटू सुद्धा सध्या त्यांच्या खेळाबरोबरच टॅटू साठी सुद्धा प्रसिद्ध आहेत! त्याला आपले भारतीय खेळाडूही अपवाद नाहीत.
विराट कोहलीकडे पहा त्याच्या अंगावर तर भरमसाठ टॅटू असल्याचे दिसून येतात.
कित्येक वेस्ट इंडिज टीमचे प्लेयर, इंग्लंडचे प्लेयरच्या अंगावर हातावर दंडावर तुम्हाला टॅटू दिसतील! क्रिकेटर्स च्या अंगावर टॅटू ही गोष्ट आता बरीच नॉर्मल झालेली आहे!
पण दुसरीकडे त्यांच्यापेक्षा किंवा काही जास्त प्रसिद्ध असलेला माझी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अंगावर मात्र कुठेच टॅटू दिसत नाही.
कॅप्टन कुल धोनी ने क्रिकेटच्या मैदानात पाउल ठेवल्यापासून अवघ्या भारतीय क्रिकेटविश्वाला आपलं वेड लावलं आहे.
आज संपूर्ण जगामध्ये असा भारतीय माणूस सापडणे कठीण ज्याला महेंद्रसिंग धोनी माहित नसेल.
हे ही वाचा –
===
तुम्हालाही माहित असले कि सगळ्यांच्या गळ्याचा ताईत असणाऱ्या या खेळाडूच्या अंगावर एकही टॅटू नाही.
धोनीच्या निस्सीम चाहत्यांनी आजवर अनेकवेळा आपल्या शरीरावर धोनीचे टॅटू गोंदवून त्याच्यावरचे प्रेम व्यक्त केले आहे.
पण धोनीने मात्र आजवर कधीही आपल्या अंगावर साधा ठिपका ही गोंदवलेला नाही आता तुम्हाला ही उत्सुकता असेलच की असे का? तर आज याचंच उत्तर आम्ही तुम्हाला देत आहोत.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, काहीसं हसू देखील येईल पण हे खुद्द धोनीने मान्य केलंय की त्याला सुई अंगात टोचवून घेण्याची फार भीती वाटते.
अगदी लहानपणापासून हि भीती त्याच्या मनात घर करून बसली आहे. ही सुई डॉक्टरच्या हातात असो वा टॅटू आर्टिस्टच्या हातात असो, त्याला अंगात ती टोचवून घेणे फार भीतीदायक वाटते.
मैदानात भल्या भल्या बोलर्सच्या वेगवान चेंडूला सहज फटकावणारा किंवा विकेटच्या मागे उभे राहून वाऱ्याच्या वेगाने येणाऱ्या चेंडूला अडवणाऱ्या धोनीचं धैर्य मात्र सुई पाहिल्यावर कुठल्या कुठे पळून जातं.
पण एकंदरच धोनीचा हा निर्णय कौतुकास्पद आहे, कारण एकदा टॅटू काढला की तुम्हाला रक्तदान करता येत नाही, कारण त्या धातूचा काही अंश तसेच ती शाई आपल्या शरीरात असते त्यामुळे आपल्याला कुणाला रक्तदान करता येत नाही!
निश्चितच ज्यांना टॅटू काढायचे आहेत ते काढतातच, पण ह्या ट्रेंड ला फॉलो न करता धोनी त्याच्या मतावर ठाम आहे मग त्यामागे त्याची भीती का असेना!
ह्याचा अर्थ टॅटू काढणं वाईट आहे असं नाही, पण प्रमाणाबाहेर टॅटू काढून घेणं हे सुद्धा शरीरसाठी घातक ठरू शकते!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.