Site icon InMarathi

‘तुम्हाला राजा हवा की जोकर?’ – बर्गर किंगने McDonalds ला लगावला टोला!

macd inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आज ग्राहकांना तुम्ही काय वेगळं देताय यावरून तुमचा व्यवसायाचे भविष्य ठरत. साध्या टपरीवरच्या वडापाव आणि कटिंग चहाला सुद्धा आता वेगळे रूप आले आहे. आजकाल चहाचे सुद्धा वेगवगेळे प्रकार मिळू लागले आहेत. चहाच्या टपऱ्या या प्रामुख्याने राजस्थानी लोक चालवतात आता त्यांना टक्कर द्यायला मराठमोळे अमृततुल्य आले आहेत. वडापावचा आता तंदूर वडापाव, शेजवान वडापाव असे नाना प्रकार लोकांपुढे आले आहेत.

 

 

हे झाले अगदी छोट्या व्यवसायिकांचे, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये तर आपलं प्रॉडक्ट टिकावं यासाठी जीवघेणी स्पर्धा असतेच, त्यात एखादा नवखा व्यावसायिक स्पर्धेत उतरू पाहत असेल, तर त्याच्यासाठी तारेवरची कसरत असते. आज मार्केटमध्ये मोठ्या कंपन्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलेलं असत्यामुळे अशा मोठ्या कंपन्याना आवाहन देणं तितकं सोपं नसतं. म्हणूनच तिथे कामी येते जाहिरात कला…

 

जाहिरात कला म्हणजे तरी काय काही क्षणात लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि हळूच आपले प्रॉडक्ट लोकांच्या मनात उतरवणे, मग यासाठी जाहिराती तयार करणाऱ्या एजन्सी जीवाचं रान करतात. साम, दाम, दंड भेद यासगळ्याचा वापर करून जाहिरात तयार करतात. कधी कधी या जाहिराती दुसऱ्याची खिल्ली उडवणाऱ्या असतात तर कधी लोकांच्या भावनेला हात घालणाऱ्या असतात.

दुसऱ्या कंपनीच्या प्रॉडक्ट्सची खिल्ली उडवण्यामध्ये ऑडी आणि बीएमडब्लू या कंपन्या कायमच अग्रेसर राहिल्या आहेत. या दोन कंपन्या कायमच एकमेकांना तोडीस तोड देणाऱ्या जाहिराती बनवत असतात. आता या खालोखाल आपल्या भारतीय कंपन्या कशी मागे राहातील? टाईड विरुद्ध एरिअल, स्वीगी विरुद्ध झोमॅटो इत्यादी.

भारतात नुकतंच लोकप्रिय ठरलेला ब्रँड म्हणजे बर्गर किंग, आज अनेकांच्या पसंतीस पडत आहे. तर अशा या बर्गर किंगने शंभर वर्ष जुना असलेल्या मॅकडोनाल्डसारख्या दिग्गज ब्रँडची खिल्ली उडवणाऱ्या काही जाहिराती बनवल्या आहेत. चला तर मग पाहुयात अशा जाहिराती आणि त्या जाहिराती मागची सॉल्लिड संकल्पना..

 

 

बर्गर किंग व्हॅलेंटाइन डे 

जगभरातील प्रेयसी प्रियकर या दिवसाची वाट बघत असतात. या दिवशी आपल्या प्रिया व्यक्तीला काहीतरी खास भेट देता यावी यासाठी अनेक कंपन्या हटके जाहिराती करत असतात. अशातच बर्गर किंगने एक शक्कल लढवली बघा या जाहिरातीत…

 

 

मॅकडोनाल्ड हा ब्रँड ओळखला जातो ते त्यांच्या दुकानाच्या बाहेर असलेल्या जोकरमुळे, बच्चे कंपनीचा लाडका असलेला हा जोकर गेले अनेक वर्ष एकटाच आहे त्याला कंपनी द्या त्याच्यासोबत फोटो काढा आणि आम्हाला म्हणजे बर्गर किंग ला टॅग करा. या जाहिरातीत थेट मॅकडोनाल्ड या ब्रँडच्या ओळखीचीच खिल्ली उडवली आहे. आणि हळूच आपले प्रॉडक्ट पुढे केले आहे.

KFC :

आतपर्यंत मॅकडोनाल्ड सारख्या स्पर्धकाची खिल्ली उडवणाऱ्या जाहिराती बर्गर किंग तयार करत होते मात्र आता त्यांनी चिकन प्रेमींचा लाडका ब्रँड असलेला KFC ला ट्रोल केले आहे. आपल्या नव्या बर्गरच्या लॉनच्या वेळी त्यांनी ही जाहिराती बनवली होती,

 

 

चिकनमध्ये मक्तेदारी असणाऱ्या KFC ब्रँडला आवाहन देणारी ही जाहिरात होती, आपण नीट पहिले असेल तर त्यात जाहिरातीतील निवेदक म्हणतो की, राजा नेहमीच कर्नलला मागे टाकतो, तसेच शेवटाकडे जेव्हा बर्गर दाखवले आहे त्यावर एक टॅग लाईन दिली आहे ती अशी आहे की, फ्लेम ग्रिल्ल्ड गुड आणि आता KFC ची टॅगलाइन पाहुयात इट्स फिंगर लिकिंग गुड. केवळ ब्रॅण्डचीच नाहीतर ब्रँडच्या टॅगलाईनची सुद्धा खिल्ली उडवली गेली आहे.

लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी जाहिरातकार कायमच काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. गर्दीच्या ठिकाणी, लोकांचा जिथे जमाव जास्त आहे अशा ठिकाणी जाहिरातीचे फलक लावले जातात. आता खालचीच जाहिरात बघा ना…

 

 

मॅकडोनाल्डने चक्क आग असलेले जाहिरातीचे फलक अमेरिकेत लावले होते, मग बर्गर किंग शांत कसे बसेल? आपल्या अॅप्लिकेशनच्या जाहिरातीमध्ये असे एक फिचर टाकले जेणेकरून आग लागेल, आगीला आगीचे प्रतिउत्तर या जाहिरातीतून दिले आहे.

आता पर्यंत आपण व्हिडिओ स्वरूपातील जाहिराती बघितल्या आता काही आउटडोअर जाहिराती बघुयात, खालच्याच जाहिरातीतून तुम्ही पाहू शकता..

 

 

मॅकडोनाल्डने खालच्या मजल्यावर आपले आउटलेट टाकले तर लगेचच आपण सर्वात वरती आहोत हे सांगणारा एक फलक लगेचंच बर्गर किंगने वरती लावला.

बर्गर किंग जिथे आपली खिल्ली उडवतो आहे तिथे मॅकडोनाल्डवाले कसे मागे पडतील? बघा ही खालची जाहिरात…

 

राजाकडून सेवा घेणार? कि राजासारखी सेवा घेणार? अशा शब्दात बर्गर किंगची खिल्ली उडवली आहे. यावर बर्गर किंगने देखील चोख उत्तर दिले आहे. 

आज कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत, लोकांसमोर रोजगाराचे प्रश्न उभे आहेत. एकीकडे मोठमोठाले ब्रँड छोट्या छोट्या ब्रॅण्ड्सना विकत घेत आहेत. एकेकाळचे कट्टर स्पर्धक असलेले वोडाफोन आणि आयडिया जिओच्या नुसत्या आगमनामुळे तोट्यात गेले. शेवटी दोघांना एकत्र येण्याशिवाय पर्याय उरला नाही. संपूर्ण जगाच स्पर्धेचं बनून गेलं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version