Site icon InMarathi

अखेर इतिहास घडवला! GP3 Race जिंकणारा अर्जुन मैनी ठरला पहिला भारतीय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आजवर जे एकाही भारतीयाला करून दाखवता आलं नाही, ते करून दाखवलंय अर्जुन मैनी या तरुणाने! एक भारतीय या नात्याने GP3 Race जिंकत त्याने GP3 Race मध्ये तिरंगा फडकवला आहे.

hindustantimes.com

GP3 Race म्हणजे काय?

GP3 Race ही एक सिंगल सिटींग मोटार रेसिंग सिरीज आहे. ही रेस २०१० मध्ये लॉन्च करण्यात आली होती. फॉर्म्युला वन सिरीज ज्यांना माहित आहे त्यांना GP3 Race बद्दल वेगळ्याने सांगायची गरज नाही.

fmsci.co.in

अर्जुन मैनी याने तीन दिवसांपूर्वीच Haas F1 team मध्ये डेव्हलपमेंट ड्राईव्हर म्हणून प्रवेश केला होता. GP3 Race सिरीजमधील Race 1 मध्ये सातव्या क्रमांकावर राहिलेल्या अर्जुनने Race 2 रिव्हर्स ग्रीडमध्ये दुसऱ्या स्थानावरुन रेस सुरु केली.

mensxp.com

आणि या रेसमध्ये पहिल्या पासूनच त्याने आपला दबदबा कायम ठेवला. सहाव्या लॅप्समध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडून त्याला काही काल मात सहन करावी लागली, पण पुन्हा या भारतीय पट्ठ्याने मुसंडी मारत पहिले स्थान पटकावले आणि पुढे सलग तेरा लॅप्समध्ये त्याने आपली आघाडी कायम ठेवली, परिणामी GP3 Race अर्जुन मैनीच्या नावावर झाली.

autosport.com

अवघ्या १९ वर्षीय अर्जुनने साध्य केलेले हे यश अफाट आहे. जेव्हा अर्जुन पहिल्या स्थानावर उभा राहिला आणि मागून भारताचे राष्ट्रगीत वाजू लागले तेव्हा त्याला अश्रू अनावर झाले.

newindianexpress.com

या यशामध्ये जे के टायर्स आणि टीव्हीएस यांचा देखील मोठा वाटा आहे, कारण त्यांनी अर्जुनच्या रेसला सपोर्ट केलं होतं.

हे यश म्हणजे फक्त सुरुवात असून कार रेसिंगच्या क्षेत्रामध्ये भारताला अजून दैदीप्यमान यश मिळवून देण्याचे अर्जुनचे स्वप्न आहे.

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version