' डॉल्फिनचे प्रेम जडले चक्क एका मुलीवर, प्रेमभंगातून केली आत्महत्या, वाचा विचित्र घटना – InMarathi

डॉल्फिनचे प्रेम जडले चक्क एका मुलीवर, प्रेमभंगातून केली आत्महत्या, वाचा विचित्र घटना

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

प्राणी,पक्षी आणि माणूस यांच्यातील नाते फार जुने आहे. जेव्हापासून माणसाने पशुपालन सुरु केले तेव्हापासून माणूस व प्राणी यांच्यात जवळचे नाते निर्माण झाले. कुत्रा , मांजर, गाय, बैल, घोडा यांपासून ते पोपट, लव्हबर्ड्ससारखे पक्षी तसेच घरात फिशटॅन्कमध्ये वेगवेगळे मासे असे वेगवेगळे प्राणी /पक्षी माणसाने पाळले. माणूस जसा प्राण्यांना जीव लावतो तसेच प्राणी देखील माणसांना जीव लावतात.

 

sunny leone with pets inmarathi

 

आपला मालक/मालकीण दिसला नाही तर अन्नाला हात न लावणारे , मालकाचा मृत्यू झाला तर दुःखात अन्नपाणी सोडणारे ,अस्वस्थ होणारे हे पाळीव प्राणी म्हणजे घरचे सदस्यच असतात. एक वेळ माणूस दगा देईल पण प्राणी त्याच्या मालकाला कधीच दगा देत नाही हा बहुतांश लोकांचा अनुभव असतो.

प्राणी व माणूस यांच्यात रोमँटिक प्रकारचे नाते असणे आपल्याला नॉर्मल वाटत नाही. या  गोष्टीवर “द शेप ऑफ वॉटर” नावाचा एक चित्रपट देखील येऊन गेलाय ज्यात एक स्त्री व एक माश्यासारखा प्राणी यांच्यातली प्रेमकहाणी दाखवली आहे. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

 

shape of water inmarathi

 

 

आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपण अनेक कथा रचतो ज्या जगावेगळ्या असतात. अश्या घटना फक्त कल्पनेतच घडतात असे आपल्याला वाटते परंतु अशी एक घटना घडली आहे जी ऐकायला सुद्धा विचित्र वाटते. ती मात्र सत्यघटना आहे. एक डॉल्फिन एका मुलीच्या प्रेमात पडला आणि जेव्हा ती मुलगी त्याला सोडून गेली तेव्हा त्या डॉल्फिनने चक्क दुःखात बुडून आत्महत्या केली.ही घटना १९६० च्या दशकातील आहे.

नासा विविध प्रकारच्या रिसर्चसाठी वेगवेगळे प्रोजेक्ट्स हाती घेत असते. डॉल्फिन हा मासा खूप बुद्धिमान असतो आणि तो माणसांशी सहज मैत्री करतो त्यामुळे या माश्याविषयी माणसांना आधीपासूनच आकर्षण वाटत आले आहे. डॉल्फीन्सवर वर्षानुवर्षे झालेल्या रिसर्चमधून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. डॉल्फिन्स आणि व्हेल मासा यांचे जवळचे नाते आहे.

 

nasa moon featured inmarathi

 

डॉल्फिनला जरी आपण मासा म्हणत असलो तरी तो एक सस्तन जलचर आहे. तो अंडी देत नाही तर डॉल्फिन माद्या पिल्लांना जन्म देऊन त्यांना दूध पाजतात. आणि म्हणूनच डॉल्फिन त्यांच्या आईबरोबर आयुष्यातील बराच मोठा काळ घालवतात. पिल्ले त्यांच्या आईबरोबर ३ ते ८ वर्षे इतका काळ असतात.

डॉल्फिन्सना दोन पोटं असतात. एक पोट अन्न साठवण्यासाठी तर दुसरे पोट अन्न पचनासाठी असते. डॉल्फीन्सचे आयुष्य ५० वर्षांपर्यंत असते. जगात आजपर्यंत डॉल्फीन्सच्या ४० प्रजाती सापडल्या आहेत. डॉल्फिन्स कळप करून राहतात आणि ते त्यांच्या कळपातील आजारी आणि वृद्ध सदस्यांची काळजी घेतात. म्हणूनच डॉल्फिन्सना प्रेमळ आणि मैत्री करणारे समजले जाते. तसेच ते बुद्धिमान देखील असतात. त्यांच्या मेंदू व शरीराचा रेशिओ काढल्यास बुद्धिमान प्रजातींमध्ये माणसांनंतर डॉल्फीन्सचा क्रमांक बराच वरचा आहे. असे सगळे असताना नासाला अधिक रिसर्चसाठी डॉल्फीन्सचे आकर्षण वाटले नसते तरच नवल!

 

mating-dolphins-inmarathi
india.com

 

तर नासाने १९६०च्या दशकात एक अशक्य वाटणारे प्रोजेक्ट हाती घेतले होते. हे प्रोजेक्ट म्हणजे डॉल्फीन्सना इंग्रजी भाषा शिकवणे व ती बोलायला लावणे हे होते. यासाठी खऱ्याखुऱ्या डॉल्फीन्सना इंग्रजी भाषेचे शिक्षण देण्यात आले आणि त्यांना शब्दांद्वारे संवाद साधण्यासाठी ट्रेनिंग सुद्धा दिले गेले. त्यासाठी त्यांना चक्क एलएसडी नावाचे औषध देखील दिले गेले. एलएसडी म्हणजे lysergic acid diethylamide होय. हे एक ड्रग आहे. ह्याने मेंदूला झिंग चढते. भास होतात. भ्रम होतात.

१९६० च्या दशकाच्या सुरुवातीला कॅरेबियन द्वीपावर एक गुप्त प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. डॉल्फिन्स माणसाची हुबेहूब नक्कल करू शकतात त्यामुळे अमेरिकन न्यूरोसायंटिस्ट जॉन लिली यांनी एक खास प्रकारचे लॅब तयार केले. या लॅब मध्ये दोन डॉल्फिन माद्या व एक नर डॉल्फिनला ठेवण्यात आले. मादी डॉल्फीन्सची नावे सीसी व पामेला अशी होती. तर नर डॉल्फिनचे नाव पीटर होते. पीटर यांतील सर्वात तरुण डॉल्फिन होता..

त्यांना मानवी भाषेचे ट्रेनिंग देण्यासाठी देण्यासाठी डॉल्फिन्सबरोबर काही व्यक्तींना ठेवण्यात आले. त्यातील एक व्यक्ती मार्गारेट लोवॅट ही स्त्री होती. रिसर्च दरम्यान त्यांना लक्षात आले की डॉल्फिन्सबरोबर फक्त काही तास वेळ घालवून त्यांना भाषा शिकवता येणार नाही तर त्यासाठी त्यांच्याबरोबर २४ तास राहावे लागेल. तर पीटर बरोबर राहण्यासाठी मार्गरेटची निवड करण्यात आली.

एकत्र राहत असताना मार्गरेटचे बरोबर खूप जवळचे संबंध निर्माण झाले. जवळचे संबंध म्हणजे इतके जवळचे होते की मार्गारेट व पीटर एकाच लॅब मध्ये एकत्र राहत असत. रिसर्चसाठी पीटरला मार्गारेटबरोबर २४ तास राहता यावे म्हणून त्या लॅबमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी होते जेणे करून पीटरला त्या लॅबमध्ये आरामात पोहता यावे.

 

dolphin inmarathi
the guardian

 

एकत्र राहत असताना मार्गारेट व पीटर यांच्यात चांगली मैत्री झाली. हळूहळू पीटर मार्गरेटच्या जवळ आपणहून येऊन बसू लागला. तिच्या पायांना आपली त्वचा प्रेमाने घासू लागला. हळूहळू पीटर पौगंडावस्थेत आला आणि त्याच्या शरीरात नैसर्गिक बदल होऊ लागले. त्याच्या सानिध्यात केवळ मार्गरेटच असल्यामुळे तो त्याची भावी सेक्स पार्टनर म्हणून मार्गारेटलाच गृहीत धरू लागला. हे फारच विचित्र होते.

जरी हे प्रोजेक्ट गुप्त होते तरीही स्थानिक मीडियामध्ये ही बातमी फुटलीच. त्याकाळच्या बातम्यांमध्ये असे सांगितले गेले की खरे तर पीटर मार्गरेटजवळ शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी येत होता. मार्गरेटला देखील ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती त्याला कुरवाळून त्याच्या भावना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत असे. लोकांनी जेव्हा ह्या बातम्या वाचल्या तेव्हा सर्वांनीच ह्या गोष्टीवर भयंकर टीका केली. जग इतके पुढे गेले आहे तरी आजही आपल्याला असे काही कळले तर आपल्याला त्या गोष्टीची किळस येऊन आपण त्यावर टीकाच करू.

 

dolphin 2 inmarathi
daily star

टीकेला सामोरे जाऊन सुद्धा मार्गरेटने तिचे रिसर्चचे काम सुरूच ठेवले. या सगळ्यात पीटरला मार्गारेट बरोबर २४ तास राहण्याची सवय झाली. मार्गारेट व पीटर जवळजवळ सहा महिने एकत्र राहत होते. परंतु काहीच दिवसांत लॅबचे मालक जॉन लिली यांना त्या प्रोजेक्टमध्ये रस वाटेनासा झाला. काही बातम्यांत तर असे देखील सांगितले गेले की या रिसर्च दरम्यान डॉल्फीन्सना ड्रग्स दिले गेले. तसेच ह्या प्रोजेक्टला मिळणारी आर्थिक मदत देखील थांबली. त्यामुळे हे प्रोजेक्ट पुढे जाऊ शकले नाही व ते थांबवण्यात आले. त्यामुळे पीटर, पामेला व सीसी या तीन डॉल्फीन्सना मियामी येथे हलवण्यात आले.

मार्गरेटला देखील याचे दुःख झाले पण कुत्रा, मांजर ,पोपटाप्रमाणे घरात डॉल्फिन ठेवणे तिला शक्य नव्हते. त्यामुळे ती स्वतःच्या घरी परत गेली. पण इकडे पीटरला मात्र मार्गरेटशिवाय जगण्याची सवय नसल्याने त्याचे आयुष्यच अचानक बदलले. काही दिवसांनी बातमी आली की पीटरचा मृत्यू झाला.

पीटरच्या मृत्यूबद्दल सांगताना डॉक्टर लिलींनी सांगितले की पीटरने खरं तर आत्महत्या केली आहे. त्याच्या आयुष्यात अचानकपणे झालेला बदल त्याला सहन झाला नाही आणि त्यामुळे त्याने जीव दिला.

डॉल्फिन्स श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर येतात हे तर आपल्याला माहितीच आहे. पण त्यांच्यात श्वास घेणे ही आपोआप घडणारी क्रिया नसून त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतात. मार्गरेटपासून लांब गेल्यावर पीटरने श्वास घेण्यासाठी प्रयत्न करणे सोडून दिले आणि आत्महत्या केली असे सांगितले जाते.

प्रेमभंग झाला की अनेक लोक आत्महत्या करतात. पण एका डॉल्फिनने एका स्त्रीच्या प्रेमाखातर आत्महत्या केल्याची ही घटना विचित्र असली, विश्वास बसण्यासारखी नसली तरी सत्य आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?