Site icon InMarathi

तब्बल ६७१ मिनिटांची इनिंग, सर्वात संथ द्विशतक! भारतीय संघाची ‘पहिली’ ‘ग्रेट वॉल’!

anshuman gaekwad young inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सध्या आयपीएलमुळे सर्वत्र क्रिकेटचा माहोल पाहायला मिळतोय. कोरोनामुळे अर्ध्यातून बंद करावी लागलेली स्पर्धा आता दुबईमध्ये परत सुरु करण्यात आल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

आयपीएलमुळे भारतातील नवनवीन कौशल्य आणि प्रतिभा असणारे खेळाडू समोर येतात असे म्हंटले जाते आणि ते खरेच आहे. भारतात अनेक उत्तम क्रिकेट खेळाडू आहेत हे आपण कायमच ऐकतो. आज अशाच एका भारतीय खेळाडू बद्दल आपण जाणून घेऊया ज्याने पाकिस्तानच्या टीम समोर तब्बल ११ तास बॅटिंग केली होती.

 

 

त्या खेळाडूचे नाव आहे अंशुमन गायकवाड. अंशुमन यांनी नुकतेच २३ सप्टेंबरला ६९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. गायकवाड यांच्या खेळामुळे गोलंदाज अक्षरशः हैराण होत असत. त्याकाळात ते हेल्मेट न घालताच बॅटिंग करत असत आणि तेव्हा बाउन्सर बॉल टाकण्यासाठी कुठलीही पाबंदी नव्हती.

गायकवाड हे सुनील गावस्करांचे खास मानले जात, कारण ते दोघे ओपनिंग पार्टनरशिपसाठी येत असत. गायकवाड यांनी ५५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २२५४ रन्स केले. हे रन्स कमी वाटत असले, तरी त्यांच्या बचावात्मक खेळाच्या पद्धतीमुळे त्यांचा फार मोठा चाहता वर्ग होता.

 

 

भारतीय टीमचे ‘ग्रेट वॉल’

गायकवाड यांना भारतीय टीमचे ग्रेट वॉल म्हणत असत. गावस्कर आणि गायकवाड जेव्हा बॅटिंग करत तेव्हा गावस्कर रन्स करत आणि गायकवाड गोलंदाजांना आपल्या शैलीने थोपवून ठेवत. त्यांचे वडील स्वतः क्रिकेटर असल्यामुळे त्यांना वडिलांमुळे क्रिकेटची आवड निर्माण झाली.

त्यांनी बरोडामधून आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात केली आणि यातूनच त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. २७ डिसेंबर १९७४ मध्ये त्यांनी कलकत्तामध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध प्रथम संधी मिळाली. त्यात त्यांनी ३६ रन्स केले.

 

वेस्ट इंडिज विरुद्ध बिनधास्त खेळी

आपल्या खेळामुळे त्यांनी भारतीय संघातील स्थान निश्चित केले होते. ज्या काळात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसमोर खेळताना फलंदाजांना भीती वाटत असे त्या काळात गायकवाड त्या गोलंदाजांच्या माऱ्याला बिनधास्त सामोरे जात.

१९७६ च्या विंडीज विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भारतीय संघाने विंडीज संघाला हरवून धक्का दिला होता. याच रागातून पुढच्या किंग्सटन टेस्टमध्ये क्लाइव्ह लॉईड आणि मायकल होल्डींग यांनी अत्यंत वेगाने बॉलिंग केली. यात गावस्कर आणि गायकवाड यांनी १३६ रन्स केले.

 

 

याच दरम्यान मायकल होल्डिंगने फलंदाजांच्या शरीरावर बॉल टाकण्यास सुरुवात केली. आणि एक बॉल ८१ रन्सची खेळी करत असणाऱ्या अंशुमन गायकवाड यांच्या कानाला जाऊन लागला. त्यांच्या कानातून रक्त यायला लागले आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

यांनतर पटेल आणि गुंडापा विश्वनाथ यांनाही अशीच दुखापत झाली. आपल्या खेळाडूंना होणारी दुखापत पाहून कर्णधार बिशन सिंग बेदी यांनी ५ विकेट नंतर इंनिंग घोषित केली.

जागतिक विक्रमी द्विशतक

गायकवाड यांनी १९८३-८४ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या टेस्टमध्ये २०१ रन्स केले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. झहीर अब्बास आणि जावेद मियांदाद यांनी ४९ आणि ६६ रन्सची इनिंग खेळली. पहिल्या दिवशी भारताने १८५ रन्सवर ७ विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या दिवसापर्यंत पाकिस्तानने एकूण ३३७ रन्स केली आणि भारताची बॅटिंग सुरु झाली. सुरुवातच गावस्कर यांच्या विकेटने झाली. नंतर मोहिंदर अमरनाथ ७ रन्स करून आऊट झाले. दुसऱ्या दिवसापर्यंत भारताच्या ३७ वर २ विकेट गेल्या. गायकवाड हे १७ रन्ससह त्यांची बॅटिंगची शैली दाखवत होते, त्यांच्या सोबत खेळणारे यशपाल शर्मा आणि संदीप पाटील यांची विकेट गेली होती.

 

 

भारताची धावसंख्या ८५ षटकांमध्ये १५४ अशी होती. गायकवाड यांनी अत्यंत सावधरित्या बॅटिंग करून ४३६ बॉलमध्ये २०१ रन्स केले. आणि हे रन्स करण्यासाठी त्यांनी ६७१ मिनिटांचा कालावधी घेतला होता. त्यांनी अक्षरशः मैदानावर बस्तानच बसवले होते.

पाकिस्तानी खेळाडूंनी सर्व प्रकारे त्यांना आऊट करण्यासाठी प्रयत्न केले पण गायकवाड आऊट झाले नाहीत. त्यांच्या या खेळाला त्या काळात अत्यंत धिम्यागतीने केलेले द्विशतक मानले जाते.

भारताचे प्रशिक्षक म्हणून करिअर

अंशुमन गायकवाड यांनी १९८४ मध्ये कोलकात्यामध्ये इंग्लंड विरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला. त्यांनी भारताकडून खेळताना ४० कसोटी सामन्यात २ शतक आणि १० अर्धशतक केली. तसेच १५ एकदिवसीय सामन्यात २८९ रन्स केले. खेळाडूपटू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी २ वेळा भारताचे प्रशिक्षक पदाची धुरा उत्तमरित्या सांभाळली.

 

 

त्यांच्या क्रिकेटमधील या योगदानासाठी त्यांना बीसीसीआय तर्फे २०१८ मध्ये लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version