Site icon InMarathi

आधी इन्फोसिस आणि आता ‘अमेझॉन’ RSS च्या निशाण्यावर! कशामुळे?

rss 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने आयटी कायद्यातील तरतुदींमध्ये बदल केले, ज्यात फेक न्युज, सरकार विरुद्ध आक्षेपार्ह विधान करणे, माध्यमांवर लक्ष ठेवणे इत्यादी गोष्टींचा त्यात समावेश होता. आयटी कायद्यात जशा सुधारणा करण्यात आल्या तशाच सुधारणा काही वर्षांपूर्वी ईकॉमर्स क्षेत्रात केल्या गेल्या होत्या.

 

याच ईकॉमर्स क्षेत्रावर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे, यावेळी सरकार नसून तर आरएसएस या संघटनेने अमेझॉनसारख्या बलाढ्य कंपनीची तुलना थेट इस्ट इंडिया कंपनीसोबत केली आहे. याआधी आरएसएसने इन्फोसिससारख्या कंपनीवर आरोप केले होते. चला तर मग जाऊन घेऊयात नेमकी काय भानगड आहे…

 

 

अमेझॉनची ईस्ट इंडिया सोबत तुलना का? 

अमेझॉन कंपनी ईकॉमर्स क्षेत्रातील आज सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे कंपनीची सेवा, आज अगदी ब्रशपासून ते फ्रिज, कपडे, फर्निचर आदी वस्तू घरबसल्या मागवू शकतो. मागवलेल्या वस्तू अगदी काही दिवसात पोहचवण्याचं काम कंपनी अगदी चोखपणे करते, म्हणूनच कंपनी आज अनेक ग्राहकांचं मन जिंकण्यात यशस्वी झाली आहे.

 

 

उत्कृष्ट सेवा देणाऱ्या या कंपनीला आरएसएससारख्या संस्थेने टार्गेट केले आहे मात्र त्यांनी केलेलं आरोप अगदीच चुकीचे नाहीत असेही काहींचं म्हणणं आहे, आरएसएसने नेमके काय आरोप केले आहेत बघुयात –

१. १८ व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीने भारत आपल्या ताब्यात घेण्यासाठी जे जे प्रयत्न केले तेच प्रयत्न आज अमेझॉन कंपनी करताना दिसून येत आहे.

२.अमेझॉन कंपनी देशात एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

३. अमेझॉनकंपनीने सुरु केलेल्या अमेझॉन प्राईम व्हिडिओ ओटीटी प्लॅटफॉर्मवरून भारतीय संस्कृतीच्या विरोधातील कार्यक्रम प्रदर्शित करत आहेत.

 

आरएसएसने आरोप त्यांच्या पांचजन्य या मुखपत्रातून केले आहेत. अमेझॉन कंपनीने सरकारला कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा गंभीर आरोपही संस्थेने केला आहे. संबंधित लाचखोरीची घटना नेमकी कोणत्या राज्यात घडली हे अजून स्पष्ट झाले नाही.

इन्फोसिसवर निशाणा 

ज्या कंपनीला आयटी क्षेत्रातील प्रणेता म्हंटले जाते अशा इन्फोसिस विरोधात आरएसएसने गंभीर आरोप केले होते. इन्फोसिसने काही दिवसांपूर्वी विकसित केलेल्या नवीन आयकर फायलिंग पोर्टलमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि करदाते यांची गैरसोय होत आहे.

 

 

भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. तसेच  कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका  व्यक्त केली होती. मात्र आरएसएसने यानंतर घुमजाव केला आणि आपला त्या मुखपत्राशी संबंध नाही असे स्पष्टीकरण देखील केले होते.

यावरून आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाचं राजकरण सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसने झालेल्या भ्रष्टचाराबद्दल चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे काही दिवसात आपल्यासमोर सत्य येईल अशी अपेक्षा करूया.

सध्या देशात एकीकडे कोरोना थैमान घालत आहेत तर दुसरीकडे काही राज्यात सत्ताबदल होत आहेत, काही राज्यांच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे येत्या काळात हा राजकारणाचा मुद्दा झाला तरीही आश्चर्य वाटणार नाही…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version