Site icon InMarathi

शहीद जवानांच्या शवपेटीतून हा कुख्यात गँगस्टर ड्रग्स पाठवायचा!

lukcas inmarathi final

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

तुम्ही ‘ओरिजनल गॅंगस्टर ‘ नावाचा चित्रपट पहिला आहे का? ज्यामधे डेन्झेल वॉशिंग्टन आणि रासेल क्रों यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट एका ड्रग्ज माफिया च्या आयुष्यावर आधारित होता. जो १९७०च्या दशकातील एक मोठा हेरोईन तस्कर होता.

अमली पदार्थांच्या व्यापारातील मध्यस्थाना कमी करून दक्षिणपूर्व आशियातील त्याकाळच्या ‘ गोल्डन ट्रंगल’ मध्ये थेट त्याच्या एजंट कडून हेरोईन खरेदी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला ‘फ्रँक लुकास’ हाच तो ड्रग्ज माफिया. त्याच्या अनेक काळ्या करतूतींनी त्याचे संपूर्ण आयुष्य भरलेले आहे. पण त्यातील सुरस कथा आहे ती ‘शहीद जवानांच्या शवपेट्यांमधून ड्रग्ज्स पाठवण्याची.’

 

 

 

लुकास चा जन्म ९ सप्टेंबर १९३० रोजी, अमेरिकेतील उत्तर कैरोलीना प्रांतात झाला. हा एक ड्रग ट्राफिकर होता. जो १९६० ते ७०च्या काळात हार्लेममध्ये कार्यरत होता. स्वत:च्या चुलत भावाची झालेली हत्या ही त्याला गुन्हेगारी विश्वात आणण्यास करणीभूत ठरली. हार्लेम मध्ये तो बम्पी जॉन्सन च्या गटात सामील झाला. जॉन्सनचा विश्वास संपादित करून त्याने आपला जाम बसवण्यास सुरवात केली.

जॉन्सनच्या मृत्यूनंतर, लुकास आजूबाजूला फिरला आणि लक्षात आले की, यशस्वी होण्यासाठी त्याला इटालियन माफियानी न्यूयॉर्कमध्ये ठेवलेली मक्तेदारी मोडावी लागेल. बँकॉक थायलंड असा प्रवास करत त्याने अखेरीस ‘अमेरिकन स्टार बार’ या काळ्या सैनिकांसाठीच्या हँगआउटमध्ये प्रवेश मिळवला.

 

 

इथेच तो अमेरिकेच्या लष्कराचा माजी सार्जंट लेस्ली इके अॅटकिन्सन याला भेटला , जो गोल्डस्बोरो, उत्तर कॅरोलिनाचा होता आणि त्याने लुकासच्या चुलत बहीणीशी लग्न केले होते. ‘इके’ तिथे असलेल्या प्रत्येकाला, आर्मीतील प्रत्येक कृष्णवर्णीय माणसाला, कुकपासून ते वरच्या हुद्दयावरील अधिकार्यापर्यंत सगळ्यांना ओळखत होता. याचा उपयोग करून ड्रग्ज तस्करीचे काम करून घ्यायचे ठरले.

२००० मध्ये न्यूयॉर्क  मासिकात प्रकाशित झालेल्या आपल्या मुलाखतीत लुकासने ही कहाणी सांगितली होती. तेव्हा मुलाखतकाराशी बोलताना लुकस म्हणाला होता, ‘आम्ही ते केले, ठीक आहे … हा, हा, हा … मृत सैनिकांच्या शवपेटीत कोण पाहणार आहे?  हाहाहा. . . .आम्ही त्या सरकारी शवपेट्यांच्या २८ प्रती बनवल्या. . . त्या पेट्यांना आम्ही खोटे तळ निश्चित केले, सहा, कदाचित आठ किलोपर्यंत हेरोईन लोड करण्यासाठी ते पुरेसे मोठे होते . . ते सुबक असायचे. ‘इके’ खूप हुशार होता, कारण त्याने युक्तीने सारा माल वजनाने जास्त असलेल्या सैनिकांच्या शवपेट्यांमध्ये लपवला होता.

 

 

यासाठी उत्तर कॅरोलिना मधील काही सुतारांना बोलावले गेले आणि त्यांच्याकडून खास तर्‍हेच्या शवपेट्या तयार करून घेतल्या गेल्या. ” तथापि ड्रग एनफोर्समेंट एडमिनिस्ट्रेशन (डीईए ) द्वारे ” सार्जंट स्मैक” असे टोपण नाव असलेल्या अ‍ॅटकिन्सनने संगितले की त्याने ड्रग फर्निचरमध्ये पाठवले होते, कास्केड मध्ये नाही. पण या तस्करीतून त्यांना प्रचंड नफा मिळाला. ज्यातून त्यांनी डेट्राईटमध्ये कार्यालयीन इमारती, लॉस एंजेलीस मध्ये अपार्टमेंट अशी अनेक प्रकारची मालमत्ता खरेदी केली.

डेन्झेल वॉशिंग्टनने “अमेरिकन गँगस्टर” मध्ये लुकासची व्यक्तिरेखा साकारली होती, ज्यात त्याच्या अंमली पदार्थाच्या व्यापारात वेगाने वाढ झाल्याचे चित्रण होते – लुकासने आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर दिवसाला १ दशलक्ष डॉलर्स कमावल्याचा दावा केला – आणि त्याच्या घसरणीमुळे काही प्रमाणात तो कमी झाला.

“गोल्डन ट्रँगल” नामक गुन्हेगारी कारवाईमागील सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लुकासने व्हिएतनाममध्ये ठार झालेल्या अमेरिकन सैनिकांच्या शवपेटीद्वारे दक्षिणपूर्व आशियातून अमेरिकेत हेरॉईनची तस्करी केल्याचा दावा केला.

 

yffpindia.wordpress.com

 

लुकासच्या चरित्राचे सह-लेखक रॉन चेपेसियुक यांनी नंतर त्या दाव्यांना आव्हान दिले; लुकासणे मात्र ही कहाणी खरी असल्याचे सांगितले. पण २००८ मध्ये त्याने त्यात सुधारणा केली. आणि सांगितले की त्याने फक्त एकदा शवपेटीतून हेरोईन ची तस्करी केली.

१९७५ मध्ये लुकासला ७० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. राज्याचा साक्षीदार म्हणून काम केल्यानंतर १९८१ मध्ये वेळेवर त्याची सुटका झाली. तथापि, त्याच्या पॅरोलचे उल्लंघन करणाऱ्या आणखी एका ड्रग-डीलमध्ये अडकल्यानंतर त्याला फक्त तीन वर्षांनी सात वर्षांची शिक्षा झाली.

२००० मध्ये न्यूयॉर्क मेगेझिनने ” द रिटर्न ऑफ सुपरफ्लाय ” नावाच्या लेखासाठी मुलाखत घेतल्यावर लुकासची ही कहाणी सर्वांसमोर आली. त्याचा सहफिर्यादी असणारा रिचर्ड “रिची” रॉबर्ट्स, ज्याने लुकासला दोषी ठरवण्यात मदत केली तो,वास्तविक जीवनात नंतर लुकासचा मित्र आणि वकील बनला, अगदी त्याच्या मुलाचा गॉडफादर ही!

 

 

अमेरिकन गॅंगस्टरचा आदर्श असलेल्या या ‘ ओरिजनल गॅंगस्टर ‘ चे २०१९ मध्ये वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. त्याचा मित्र बनलेल्या रोबर्ट्सने एका स्थानिक न्यूजचॅनलशी बोलताना सांगितले की ,त्याला लुकासने ‘कायमचे जगणे’ अपेक्षित होते.

मित्रांनो आजवर आपण अनेक कथा,चित्रपटांमधून, कादंबर्‍यांमधून स्मगलर्स आणि त्यांच्या सुरस कहाण्या ऐकल्या, वाचल्या, पहिल्या असतील. पण मृत सैनिकांच्या शवपेट्यांमधून हेरोईनची तस्करी करणे हे थोडे जगावेगळेच आहे नाही का? तुमच्या अभिप्रायाचे स्वागत आहे. इनमराठीचे नवनवीन विषयांवरील सुरस लेख वाचत रहा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version