आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
१९७१चं भारत-पाकिस्तान युद्ध आठवतंय? तेच तेच, ज्या मुळे बांग्लादेशची निर्मिती झाली होती तेच.
आपल्या आई-बाबा, आजी-आजोबा ह्यांना विचाराल तर ते सांगतील ते युद्ध, भारतीय थलसेना, वायुसेना, नौसेनेने गाजवलेला पराक्रम, भारताचा पाकिस्तान वर मिळवलेला विजय आणि — आय एन एस विक्रांत !
भारताची पहिली वहिली विमानवाहु युद्धनौका. भारताने ब्रिटिशांकडुन १९५७ला विकत घेतली. विकत घेताना तिची अर्धवट बांधणी झालेली होती. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने पूर्ण केली बांधून. १९६१ मध्ये ही महाकाय युद्धनौका नौसेनेत रूजू झाली. त्या युद्धात पाकिस्तानचं NAVAL BLOCKADE करण्यात हिचा खुप मोठा वाटा आहे.
३६ वर्षे नौसेनेची सेवा केल्यानंतर हिला सेवेतून निवृत्त केलं गेलं. निवृत्तीनंतरही म्युझियम म्हणून होतीच – तो युद्धकाळाचा शौर्याभिमान, त्या आठवणी घेऊन दिमाखात…!
पण काही वर्षानंतर, मेंटेनंस् होत नव्हता, परवडत नव्हता म्हणून नाईलाजाने हिला भंगारात काढावी लागली. त्यावर बराच वादंग झाला…जो सहाजिक होता. भारतीय सैन्याच्या शौर्याचं प्रतिक “असा” निरोप घेणं कुणालाच आवडत नव्हतं…पण बर्याचशा घडामोडींनंतर शेवटी INS Vikrant ला भंगारात काढण्याला कोर्टाने परवानगी दिली.
पण खरी गम्मत तर आता इथेच आहे मित्रांनो.
हम सभी का लाडका, “हमारा बजाज” घेऊन येत आहे आपल्या साठी, In all due honor of INS Vikrant : स्पोर्ट्स बाईक – V-15 – जी आपल्या विक्रांतच्याच मेटलपासून बनलेली आहे…!
म्हणजे तो भारताची “pride” आता आपल्यासमोर नव्याने येणार आहे…आपण ती स्वतःच्या घरी आणू शकणार आहोत!
दिमाखदार V-15 चे काही फोटो :
Engine Details
Type – 150cc, single-cylinder, air-cooled
Maximum power – 12bhp @ 7,500rpm
Maximum torque – 13Nm @ 5,500rpm
Transmission – 5-speed constant mesh unit
Bajaj V Colour Options – Ebony Black and Pearl White
New Bajaj V Bike Dimensions
Length – 2,044mm
Width – 780mm
Height – 1,070mm
Wheelbase – 1,315mm
Saddle Height – 780mm
Ground Clearance – 165mm
Kerb Weight – 135.5kgs
Suspension
Front – Telescopic forks
Rear – Twin-spring loaded hydraulic type (gas filled)
Braking System
Front – 240-dia Disc
Rear – 130 dia Drum
Tyres Size
Front – 90/90 – 18-inch
Rear – 120/80 – 16-inch
Bajaj V15 Key Features
INS Vikrant badge
INS Vikrant’s metal made fuel tank
Trapezoidal headlamp
LED tail lamp
Bold stance
Ergonomic handlebars
Removable rear seat cowl
New speedometer cluster with a dual color LED fuel level indicator
येत्या २३ मार्च पासून – जो भारतात शहीद दिवस म्हणून पाळला जातो – आपली V15 भारताच्या रस्त्यांवर पुन्हा दिमाखात धावु लागणार आहे.
मग? आहात तयार INS Vikrant ला घरी आणायला?
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi