Site icon InMarathi

गुन्हेगारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘गुंड’ या शब्दाची भन्नाट जन्मकथा…

gunda image inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गुन्हेगारांसाठी गुंड हा शब्दप्रयोग होतो मात्र तुम्हाला माहित आहे का? हा शब्द कसा आणि कुठून आला? काय आहे या शब्दामागची कथा? इंग्रजांच्या काळात एका व्यक्तिच्या नावावरून हा शब्द प्रचलित झाला.

गुंड हा शब्द गुन्हेगारांच्याबाबतीत नेहमी वापरला जातो. चित्रपटांच्या संवादांनी हा शब्द विशेषत: लोकप्रिय केला आहे. गुंडा या शब्दाला एक नकारात्मक छटा आहे त्यामुळे या शब्दाचा वापरही त्याच अर्थानं केला जातो.

गुंडा या नावचा हिंदी गाजलाच मात्र इतरही अनेक चित्रपटांमध्ये गुंडाच्या भुमिकेत वावरणारा खलनायक भाव खाऊन गेला. गुंडाचा वेश, त्याची भाषा, कौर्य, मुलींची छेड काढणारा, धमक्या देणारा गुंड हा चित्रपटांमध्ये ‘मसाला’ भरण्याचं काम करतो.   

 

 

मुळात हा शब्द आला कुठून? याचा कधी विचार केला आहे? काहीजणांच्या मते या शब्दाचं मूळ पश्तू भाषेत आहे, तर काहींच्या मते पश्तूशी याचा संबंध नसून भारतात अनेक भाषांत हा शब्द वापरात आहे.

तमिळमधे शक्तिशाली नायकाला गुंडा संबोधलं जातं. मराठीतही गावगुंडा हा ग्रामयोध्दा म्हणून ओळखला जातो. गुंडाचा अर्थच मुळात प्रधान किंवा नेता असा आहे.

 

 

मात्र जे हा शब्द पश्तू आहे आणि पश्तुतून हिंदीत आलेला आहे असं ठामपणे मानतात त्यांच्या मते या शब्दाचा पश्तुतील अर्थ आहे, बदमाश व्यक्ती! याचमुळे भारतातही या शब्दाचा वापर याच अर्थानं केला गेला.

या नकारात्मक संबोधनामुळेच काहींच्यामते मात्र या शब्दाचा आणि पश्तूचा काहीच संबंध नसून मुळात १९१० पर्यंत भारतात हा शब्दही अस्तित्वात नव्हता. लोकांना हा शब्द माहितच नव्हता. या शब्दामागची कथा फारच रंजक आहे.

असं म्हणतात की १९१० मधे बस्तर येथील एका व्यक्तीच्या नावावरून हा शब्द वापरात आला. बस्तरमधील गुंडा धुर नावाच्या व्यक्तीवरून हा शब्द वापरायला सुरवात झाल्याचं सांगितलं जातं.

तत्कालीन ब्रिटिश राजवटीविरुध्द गुंडा धुराने बंड केलं. इंग्रजांना पळवून लावण्याचा निर्धार करत त्यानं त्यानुसार कारस्थानं सुरु केली. मात्र ब्रिटिशांच्या दृष्टिनं गुंडा हा एक गुन्हेगार होता.

 

 

काहीजणांच्या मते इंग्रजांच्या राजवटीतील पोलिसांनी गुन्हेगाराला समानार्थी म्हणून गुंडा इतकंच संबोधायला सुरवात केली आणि हळूहळू या शब्दाचा प्रसार झाला.

साधारण १९२० पासून वृत्तपत्रांतील गुन्हेगारी जगतातल्या बातम्यांमधून या शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला सुरवात झाली.

एक अर्थ असाही

गुंडा शब्द मूळ गुंड शब्दापासून बनला आहे. या शब्दाचा अर्थ आहे, गाठ. सपाट पृष्ठभागावर असणारा फुगवटा. एखाद्या व्यक्तीची समाजात प्रतिष्ठा असेल त्यालाही गुंड म्हणून संबोधलं जातं. (समर्थांनींही पुत्र व्हावा ऐसा गुंडा म्हणलं आहे).

शुरवीर योद्ध्यासाठीही गुंड हा शब्द वापरला जातो. केवळ मराठीतच नाही तर इतर अनेक भारतीय भाषांमधून या शब्दाला सकारात्मक अर्थानं वापरलं जातं मात्र कालांतरानं गुन्हेगारांच्या संदर्भातच हा शब्द जास्त वापरला गेल्यानं त्याला एक नकारात्मक अर्थ प्राप्त झाला आहे.

 

 

अर्थात या सगळ्या आख्यायिका आहेत, प्रत्येक भाषेत शब्दाच्या व्युत्पत्तीसाठी वेगवेगळ्या कथा-कहाण्या सांगितल्या जातात. त्यामुळे गुंड या शब्दामागेही अनेक कथा आहेत. मात्र गुंड धुरा या व्यक्तीच्या नावावरून हा शब्द प्रचलित झाला असा दाखला देणा-यांची संख्या मोठी आहे. 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version