' इस्लाम धर्म प्रचारकाला सून हवी : फेसबुक पोस्टवर धुवाधार कमेंट्सची आतिषबाजी! – InMarathi

इस्लाम धर्म प्रचारकाला सून हवी : फेसबुक पोस्टवर धुवाधार कमेंट्सची आतिषबाजी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

डॉ. झाकीर नाईक हे नाव कधीच ऐकलं नाही, असा भारतीय सापडणं तसं कठीणच! इस्लामिक रिसर्च फॉउंडेशन आणि peace tv network यांचे संस्थपाक आणि इस्लाम धर्मप्रचारक असलेले नाईक, हे अनेकदा चर्चेत असतातच.

वादग्रस्त विधानं करणं असो, किंवा एखाद्या वादाविषयी धार्मिक गोष्टींबाबत मत व्यक्त करून वाद निर्माण करणं असो, डॉ. झाकीर नाईक हे नाव चर्चेत राहतं. धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्यं करणं, भाषणं देणं यात ते नेहमीच पुढे असतात असं अनेकांचं मत झालं आहे.

 

zakir naik inmarathi

 

यावेळी सुद्धा ते अशाच एका गोष्टीत चर्चेत आहेत. यावेळी चर्चेत राहण्यासाठी त्यांनी पर्याय निवडलाय तो फेसबुक पोस्टचा! ‘मला सून हवी आहे’ असं म्हणत त्यांनी थेट एक फेसबुक पोस्टच केली आहे. हा नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला नसता, तरच नवल वाटलं असतं. तुम्हीच बघा, या पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय.

 

zakir naik fb post inmarathi

 

“माझा मुलगा फारिक याच्यासाठी मी बायको शोधतोय. चांगल्या चारित्र्याची मुस्लिम मुलगी असायला हवी. माझा मुलगा आणि ती एकमेकांना पूरक असावेत, आणि त्यांनी एकमेकांच्या मदतीने प्रगती साधावी. ते एकमेकांची ताकद बनावेत.” या भाषेत त्यांनी त्यांच्या अपेक्षा मांडल्या आहेत.

बरं एवढंच सांगून ते थांबले नसून, जे तुम्ही अशा मुलीचे पिता किंवा नातेवाईक असाल, तर अपेक्षित माहितीसह त्या व्यक्तीने या पोस्टवर उत्तर द्यावं असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, याची एक झलक सुद्धा पहाच…

 

expectations by zakir naik inmarathi

 

ही अशी पोस्ट डॉ. झाकीर नाईकसारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्वाने केली म्हटल्यावर, त्यावर कमेंट्सचा पाऊस तर पडणार होताच. यातल्याच काही कमेंट्स आम्ही घेऊन आलोय, खास तुमच्यासाठी…

comment 1

 

एखाद्या धर्मप्रसरकाला ‘जशास तसं’ उत्तर देणारी व्यक्ती कधीच भेटणार नाही, असं थोडीच आहे. या कमेंटमधून झाकीर यांच्या मुलाला शुभेच्छा देतानाच, या व्यक्तीने स्वतःच्या धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला दिसतोय.

 

comment 2

 

नाईक यांच्या अपेक्षा पूर्ण होतील, अशी मुलगी मिळणं जवळपास अशक्य असल्याचं, यांनी म्हटलं आहे. असं म्हणताना, त्यांच्या मुलाला शुभेच्छा द्यायला मात्र ही व्यक्ती विसरली नाहीये.

 

comment 3

 

अशी मुलगी मिळणारच नाही, असं म्हणणाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली गेली आहे नाही का?  चांगल्या मुली फक्त चांगल्या मुलांना मिळतात असं म्हणत त्यांनी चांगलीच कोपरखळी मारली आहे.

 

comment 4

 

माझ्याही मुलांनी असं घडावं, असंच व्हावं असा मी प्रयत्न करीन, असं म्हणतायत हे महाशय… त्यांना झाकीर नाईक यांनी केलेल्या अपेक्षा आवडलेल्या दिसतायत.

comment 5

 

डॉ. झाकीर नाईक यांना त्यांच्याच बांधवांनी घरचा आहेर दिलाय असंच या कमेंट्स बघून म्हणायला हवं नाही का? तुमच्या मुलाने आयुष्यभर अविवाहितच राहावं, असं एकजण म्हणतोय, तर एकजण या अशा अपेक्षांची खरंच गरज आहे का? असा सवाल करताना दिसतोय.

 

comment 6

 

ही काहीशी पोस्ट विचित्र आहे असं म्हणणाऱ्या या व्यक्तीचं सुद्धा मत काही फार वेगळं नसावं.

 

comment 7

 

लग्न जमवण्यासाठीची जागा म्हणून किंवा लग्नासाठीचा अर्ज इथे करावा अशी ही जागाच नाही, असं म्हणत या महाशयांनी सुद्धा खडे बोल सुनावलेत. असं करण्यापेक्षा ही खाजगी गोष्ट ओळखीतल्या मंडळींना सांगा आणि लग्नासाठी हवी असणारी एक मुलगी मिळवा असा सल्लाही दिला गेलाय.

थोडक्यात काय, तर डॉ. झाकीर नाईक यांच्या या फेसबुक पोस्टमुळे सध्या लोकांना चर्चेसाठी मोठा विषय मिळालाय असंच म्हणायला हवं.

 

dr zakir naik inmarathi

 

तुम्हालाही अशा इतर काही भन्नाट पोस्ट्स किंवा कमेंट्स पाहायला मिळत असतील, तर आम्हाला जरूर कळवा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?