' भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण, या प्रश्नाचं उत्तर अखेर ‘धोनी’ असं कशामुळे? वाचा – InMarathi

भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण, या प्रश्नाचं उत्तर अखेर ‘धोनी’ असं कशामुळे? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

संकल्पना आणि विचार – हिमांशू वाढवणकर

शब्दांकन – ईशान पांडुरंग घमंडे

===

आज RCB विरुद्ध CSK हा सामना आयपीएलमध्ये रंगणार आहे. विराटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रथमच भारतीय संघाचे आज-माजी कर्णधार विराट आणि धोनी आमनेसामने येणार आहेत. खरं तर विराटने वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि नवा कर्णधार कोण यावर चर्चा सुरु झाली.

कालच मुंबई इंडियन्सने सुद्धा पराभव स्वीकारला आणि मग रोहितच्या कर्णधारपदाबद्दल सुद्धा बोलणं सुरु होणार होतंच. नवा कर्णधार म्हणून रोहितच असावा, की आणखी कुणी नवा चेहरा हा मुद्दा मग ऐरणीवर येतो. कप्तानीबद्दल चर्चा झाली की मग पुन्हा एकदा धोनीशिवाय ती  संपत नाहीच. कारण, तोच भारताचा सर्वोत्तम कर्णधार आहे, असं आकडेवारी सुद्धा दर्शवते.

 

dhoni featire inmarathi
republicworld.com

 

धोनी एवढा ग्रेट का आहे?

आकडेवारी पाहिली तर धोनी हाच भारताचा सर्वोत्तम कर्णधार आहे, याबद्दल काही शंका घेण्याचं कारणच उरत नाही. भारतासाठी सर्वाधिक सामन्यांमध्ये कप्तानी करण्याचा मान कुणाचा असेल, तर तो महेंद्रसिंग धोनी याचाच!

त्याला कॅप्टन कूल हे नाव पडलंय, तेही त्याने सार्थ ठरवलंय. एखादा सामना अगदीच तणावाच्या परमोच्च पातळीवर असताना तो विकेट्सच्या मागे असो किंवा पुढे, त्याचं डोकं नेहमीच शांत असायचं, अजूनही असतं. कप्तान म्हणून विजयाचा रेशो सुद्धा काढायचा झाला, तरी प्रत्येकच ठिकाणी सर्वोत्तम २ भारतीयांमध्ये त्याचं नाव पाहायला मिळतं.

कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी करत असताना, त्याचा परिणाम कधीही यष्टिरक्षण किंवा फलंदाजीवर झाला नाही. तो एक दर्जेदार आणि हजरजबाबी यष्टीरक्षक होता आणि तेवढाच उत्तम फलंदाजही होता.

 

dhoni inmarathi

 

बेस्ट फिनिशरचा टॅग त्याच्या नावामागे उगाच लागला नाही. त्याने थंड डोक्याने संपवलेले अनेक सामने अनेकांना आजही आठवत असतील.

फिटनेसच्या बाबतीत म्हणाल तर तिथेही त्याचा हात कुणीही धरू शकत नाही. फार क्वचितच तो जायबंदी असल्याने संघात नाही, असं पाहायला मिळाला असेल. कर्णधार म्हणून ८ वर्ष तो संघाचा भाग राहिला, आणि यातील यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके सामने त्याने  मिस केले असतील.

 

dhoni featured inmarathhi
newindiaexpress.com

 

सगळ्या ट्रॉफीजचा मानकरी

भारतातीलच नव्हे, तर जगातील तो एकमेव असा कर्णधार आहे जो जवळपास सगळ्याच प्रकारच्या ट्रॉफीजचा मानकरी ठरला आहे. २००७ साली आजच्याच दिवशी त्याने पहिली ट्रॉफी हातात धरली आणि त्याचा जादुई प्रवास सुरु झाला.

त्यानंतर मग वनडे वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएल, अशा सगळ्याच स्पर्धांमध्ये त्याने आपल्या कर्णधारपदाची छाप पाडली. सगळ्या ट्रॉफीज हाती घेण्याचा मान त्याला मिळाला. असं असूनही त्याने नवोदित खेळाडूंना नेहमीच पाठिंबा दाखवला. नवोदितांना सेलिब्रेशनची संधीही दिली. कर्णधार म्हणून ट्रॉफी तो हाती घ्यायचा खरा, पण नंतर स्वतः मात्र कोपऱ्यात कुठेतरी जाऊन उभा राहायचा.

 

world cup winning indian team inmarathi

 

त्याच्या या स्वभावामुळे सुद्धा नेहमीच त्याचं एक उत्तम कप्तान म्हणून कौतुक झालं आहे.

कुठल्याही वादात सहभाग नाही

धोनी आणि वादविवाद या दोन गोष्टी एकत्र आलेलं कधी पाहायला मिळालं नाही. यष्ट्यांच्या मागून खेळाडूंना प्रोत्साहन देणारा, गोलंदाजांना मार्गदर्शन करणारा धोनी वादग्रस्त ठरणाऱ्या विषयांमध्येही कधी आढळला नाही. ताणतणाव सहन करण्याची क्षमता जशी त्याच्याकडे होती, तसंच कुठे थांबावं हेदेखील त्याला उत्तमरित्या कळलं होतं.

योग्यवेळी कप्तानी सोडणं, त्याची निवृत्ती या सगळ्याच गोष्टींकडे नेहमी उत्तम निर्णय म्हणून पाहिलं गेलं. त्याला सैन्याबद्दल असलेली आपुलकी, त्याने त्यांच्यासोबत घालवलेला वेळ आणि त्याही मार्गाने केलेली देशसेवा या गोष्टी सुद्धा नेहमीच चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

 

dhoni in army inmarathi

अशाच गोष्टींमुळे तो कर्णधार म्हणून आणि माणूस म्हणूनही अप्रतिम आहे. आज तो भारतासाठी खेळत नसला, तरीही कप्तान म्हणून मैदानावर उतरतो आहे. म्हणूनच, तो एक उत्तम कर्णधार आणि एक उत्तम व्यक्ती आहे आणि राहील. शेवटी भारतीय संघाचा कर्णधार या विषयावर कधीही आणि कुठेही चर्चा रंगली, तरी महेंद्रसिंग धोनी अर्थात माही या नावाशिवाय पूर्ण होणार नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?