“ओमप्रकाश मिश्रामुळे न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा रद्द” : पाकिस्तानचा हास्यास्पद दावा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
सध्या पाकिस्तान एकाच कारणासाठी चर्चेत आहे ते म्हणजे न्यूझीलंड आणि इंग्लंडने रद्द केलेल्या क्रिकेट दौऱ्यामुळे. टॉसच्या काही मिनिटं आधीच न्यूझीलँडने पाकिस्तानातल्या खेळाडूंना परत बोलावलं आणि दौरा रद्द केला.
यामगोमाग लगेचच इंगलंडनेदेखील त्यांचा पाकिस्तान दौरा रद्द केला, दोन्ही देशांनी यमागचं कारण एकच दिलं ते म्हणजे सिक्युरिटी!
पाकिस्तानात आपल्या खेळाडूंच्या सूरक्षेला धोका आहे म्हणूनच पहिले न्यूझीलंड आणि मग इंग्लंडने हा दौरा रद्द केल्याचं सांगितलं जातंय, खरंतर बरेच वर्षांनी कोणतातरी दूसरा देश पाकिस्तानात जाऊन क्रिकेट मॅच खेळणार होता त्यामुळे उत्सुकता होतीच, पण पाकिस्तानचं हे स्वप्न काही इतक्यात पूर्ण होणार नाही असंच वाटतंय.
याबद्दल पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीपासून अनेक सेलिब्रिटीजपर्यंत प्रत्येकाने ‘पाकिस्तान हा सुरक्षित देश आहे’ असं सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली.
या सगळ्या टुर कॅन्सल होण्यामागचं आता एक भलतंच कारण समोर येतंय, ते म्हणजे पाकिस्तानचे सूचना मंत्री फवाद चौधरी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं की “ओमप्रकाश मिश्रा नावाच्या एका भारतीय ईमेल अकाऊंटवरून न्यूझीलंडच्या टीमला धमकी देणारे मेल केले गेले!”
आता हा ओमप्रकाश मिश्रा नामक व्यक्ति कोण विचारलं तर सूचना मंत्री यांनी एक फोटो शेअर केला आणि तो फोटो बघून सोशल मीडियावर पुन्हा पाकिस्तानचा मूर्खपणा सिद्ध करणारे फोटोज ट्रेंड होऊ लागले.
–
–
हा तोच ओमप्रकाश मिश्रा आहे ज्याने एकेकाळी “बोल ना आंटी आऊ क्या..” सारखं एक टुकार गाणं युट्यूबवर टाकून अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता. हे गाणं, त्याचे शब्द आणि त्याचं चित्रीकरण हे सगळंच विनोदाचा विषय बनलं होतं!
कारण हे गाणं अश्लील तर होतंच शिवाय ते गाणं सेक्सीस्ट म्हणून युट्यूब वरुन काढून टाकण्यात आलं पण सोशल मीडियावर एकदा व्हायरल झालेली गोष्ट अशी सहजासहजी डिलिट होत नसते. ते गाणं एवढं व्हायरल झालं होतं की आजही तुम्हाला युट्यूबला बघायला मिळेल.
हाच तो ओमप्रकाश मिश्रा ज्याच्या ईमेल अकाऊंट वरून न्यूझीलँडच्या खेळाडूंना धमकीचे मेल केले गेले असा दावा पाकिस्तानच्या सूचना मंत्र्यांनी केल्यावर तर हे स्पष्ट झालं की पाकिस्तान हे मुद्दाम भारताला टार्गेट करत आहे.
खरं बघायला गेलं तर ओमप्रकाशसारख्या एका टुकार युट्यूबरमुळे पाकिस्तानमधले क्रिकेट दौरे रद्द होत असतील तर ही गोष्ट पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी कीती लज्जास्पद आहे.
पाकिस्तानच्या मते ISI सारखी त्यांची जगातली ‘सो कॉल्ड सर्वात बेस्ट’ गुप्तचर संस्थेला याबाबत काहीच माहिती मिळत नसेल तर त्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उभं राहणं स्वाभाविक आहे.
अर्थात ज्या अकाऊंटवरून मेल पाठवले गेले ते अकाऊंट फेकच आहे, पण पाकिस्तान सरकारमधल्या मोठ्या नेत्यांना ही गोष्ट समजू नये इतकी पाकिस्तान दूधखुळी आहे का? पाकिस्तानचा यामागे काही वेगळाच डाव आहे?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मिळायची आहेत तेव्हा मिळतीलच पण सध्यातरी पाकिस्तानच्या या हास्यास्पद दाव्यावर सगळेच चांगलं तोंडसुख घेत आहेत.
ओमप्रकाश मिश्रा याने एकहाती न्यूझीलँड दौरा रद्द केल्याने त्याला ‘रॉ’चा एजंट वगैरे म्हणून सोशलमीडियावर संबोधलं जातंय, अर्थात पाकिस्तानच्या या दाव्यात तथ्य काहीच नाही हे लोकांना चांगलंच ठाऊक आहे त्यामुळेच अशा पद्धतीने लोकं पाकिस्तानची सोशल मीडियावर चांगलीच निंदा करतायत.
ज्या देशाचा पंतप्रधान खुलेआमपणे तालिबानसारख्या आतंकवादी संघटनेला सहाय्य करतोय, त्यांच्यासाठी आर्थिक मदत गोळा करतोय त्या देशासोबत कोणताही देश मैत्रीपूर्ण संबंध का ठेवेल? त्यांच्या कोणत्याही खेळात का सहभागी होईल? हा विचार पाकिस्तानचे मंत्री किंवा तिथली जनता का करत नाही?
वासिम अक्रमपासून इम्रान खानपर्यंत सगळेच पाकिस्तानी स्वतःच्या देशाचं हे असं चुकीचं चित्रण का करतात? आपल्या देशाचा खरा चेहरा जगासमोर येऊ नये यासाठी ही लोकं इतक्या खालच्या पातळीवर का उतरतात?
–
- पाकिस्तानचं संविधान लिहिणाऱ्याचा गूढ अंत ठरला पाकिस्तानच्या भविष्याचा कर्दनकाळ!
- पाकिस्तानच्या सीमापार कुरापती सुरूच… भारताने सावध रहायलाच हवं!
–
असे अनेक प्रश्न या प्रकारानंतर डोक्यात येतात, पण आपल्यात एक म्हण आहे ना की “कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच” अशीच अवस्था सध्या पाकिस्तानची आहे, आणि हे आपल्याला काही नवीन नाही.
त्यामुळे पाकिस्तानच्या या अशा बिनबुडाच्या आणि हास्यास्पद आरोपांकडे लक्ष न देणंच योग्य आहे, हा देश कधीही सुधारला नव्हता आणि भविष्यातही त्यात काही सुधारणा होईल असंही वाटत नाही!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.