Site icon InMarathi

सुपरफिट व्हायचंय? या गोष्टी लक्षात ठेवा आणि “जिम”शिवाय उत्तम आरोग्य मिळवा!

fitness inmarathi 8

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

निरोगी शरीर हीच खरी संपत्ती असं म्हटलं जातं. चांगल्या दर्जाचं आयुष्य हे एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, ते म्हणजे “निरोगी आरोग्य”.. ! पण, निरोगी जीवनशैली म्हणजे फक्त उत्तम आहार आणि व्यायाम एवढंच नसतं.

तर, निरोगी जीवनात बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव होतो. दुधाचा चहा सोडून काळा चहा पिणे किंवा जिम जॉईन करणे, म्हणजे निरोगी जीवनशैली जपणे इतकाच त्याचा अर्थ मर्यादित नाही.

निरोगी आरोग्याची प्रत्येकाची व्याख्या निरनिराळी असू शकते. परंतु, या काही सध्या आणि छोट्या छोट्या गोष्टींत जर तुम्ही बदल केला आणि त्या जाणीवपूर्वक अवलंबल्या तर तुमच्या आरोग्यात निश्चितच सकारात्मक फरक जाणवेल.

दररोजच्या ताणतणावापासून थोडी सुटका होईल आणि मस्त निरोगी आयुष्य जगता येईल. येत्या वर्षात तुम्ही जर स्वतःमध्ये या २५ सवयी रुजवल्या तर २०२० संपेपर्यंत तुम्ही सुपर-फिट व्हाल!

 

 

हे ही वाचा –

===

 

१. भरपूर पाणी प्या.

पाणी म्हणजे जीवन हे तर आपल्याला माहितीच आहे. परंतु, सकाळी काहीही खाण्याअगोदर किमान एक ग्लास पाणी जरी प्यायलात तरी याने तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहील आणि शरीर निरोगी राहील.

भरपूर पाणी प्यायल्याने अतिरिक्त खाण्याचे प्रमाण देखील कमी होते. अनेकदा तहान आणि भूक यांमध्ये आपण गल्लत करतो. अतिरीक्त खाणे खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजदेखील वाढतात. म्हणून, भरपूर पाणी प्या आणि निरोगी राहा.

 

 

२. आनंदाने जेवण करा –

जेवण करतना टीव्ही पाहणे, गाणी ऐकणे, मोबाईल पाहणे किंवा मोबाईलवर बोलणे अशा गोष्टी टाळा. जेवताना कोणत्याही प्रकारे लक्ष विचलित न करता फक्त जेवणाचा आनंद घ्या.

जेवताना जर आपले लक्ष भरकटत असेल तर जेवणाची चव कळणार नाहीच पण, त्याचे फायदे देखील होणार नाहीत. प्रत्येक घास बारीक चावून खा, ज्यामुळे पचनाच देखील त्रास होणार नाही.

 

 

३. शुद्ध हवेचा आनंद घ्या

शक्य असेल तेंव्हा बाहेरच्या शुद्ध हवेचा आनंद घ्या. सकाळी लवकर उठून सकाळच्या ताज्या हवेत फिरायला जाण्याने फायदा तर होतोच पण, दिवसभरातून शक्य असेल तेव्हा मोकळ्या हवेत फिरून आल्याने शरीर आणि मन दोघांना फायदा होतो.

ऑफिसच्या लंच ब्रेक मध्ये देखील आजूबाजूच्या मोकळ्या जागी फिरून पाय मोकळे करायला हरकत नाही.

 

 

४. नियमित व्यायाम करा

कितीही बीजी शेड्युल असले तरी दिवसातील थोडा वेळ स्वतःच्या शरीरासाठी द्यायलाच हवा. व्यायामासाठी दिलेला वेळ म्हणजे स्वतःसाठी दिलेला वेळ.

व्यायामाचे शारीरिक फायदे तर मिळतातच पण, मन देखील हलकं, प्रसन्न रहातं. व्यायामात देखील तोच तोच पणा असेल तर कंटाळा येतो, म्हणून त्यातही कधी कधी नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.

बॉडीलव्ह प्लानरची निर्माती जेस्सी हॅगर्टी म्हणते, फ्लेक्झीबल शेड्युलमुळे दररोजचा व्यायाम करण्यास कधी कधी वेळ देता येत नाही अशा वेळी, कामातून अर्ध्यामध्ये उठून थोडा तरी फेरफटका मारतेच ज्यामुळे शरीर अॅक्टिव्ह राहील.

 

 

हे ही वाचा –

===

 

५. भरपूर भाज्या खा

आहारात विविध आकारच्या, प्रकारच्या आणि रंगीबेरंगी भाज्यांचा तर समावेश हवाच. भाज्यांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्वे तसेच खनिजे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे शक्य तितक्या भाज्यांचा आहारात समावेश असणे आरोग्यासाठी चांगले आहे.

शरीराला पोषक असणाऱ्या भाज्यांच्या नियमित सेवनाने तुम्हाला निरोगी आरोग्याचे सगळे फायदे मिळतील.

 

thecurrycousins.wordpress.com

 

६. पुरेशी झोप घ्या

रात्रीची सात तासांची झोप तरी आवश्यक आहेच. रात्री झोप पूर्ण झाल्यास तुम्हाला सकाळी ताजेतवाने वाटेल, दिवसभर थकवा जाणवणार नाही, पुरेशी झोप घेतल्याने दिवसभर उत्साह टिकून राहतो, यामुळे निर्णयक्षमता सुधारते.

पुरेशी झोप झाली नाही तर, दुसऱ्या दिवशी तुमच्या इच्छाशक्तीवर परिणाम होऊ शकतो आणि तुमचा हार्मोनल बॅलन्स देखील बिघडू शकतो, ज्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो.

 

Getty Images

 

७. ध्यानधारणा/मेडिटेशन

मेडिटेशनचे मानसिकआरोग्य आणि शारीरिक दोन्हीसाठी चांगला फायदा होतो. दिवसातील १० ते २० मिनिटे फक्त स्वतःवर लक्ष केंद्रीय करणे हे आनंददायी, निरोगी आणि दीर्घायुष्याचे रहस्य आहे.

मेडिटेशनमुळे मनावरील ताण कमी होतो, झोप चांगली लागते, ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हृदयाचे आरोग्य देखील सुधारते, असे इलेव्हेन इलेव्हेन वेलनेस सेंटर न्यू यॉर्क चे हेल्थ कोच केरी बजाज म्हणतात. काही काळ दैनंदिन तणावापासून दूर राहिल्याने अधिक चांगला अनुभव येतो.

 

Stylecraze

 

८. ग्रीन टी

भरपूर चहा प्या. पाण्यानंतर चहा हे तुमच्या शरीरासाठी एक उत्तम पेय असू शकते. ग्रीन टीचे भरपूर फायदे होतात, जसे की रोगप्रतिकारशक्ती वाढणे, पचनक्रिया सुधारणे, ब्लडप्रेशर कमी ठेवणे, श्वासोच्छवास करताना होणारा त्रास कमी होणे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रीन टी पिण्याकडे कल वाढवा.

 

food.ndtv.com

 

९. भरपूर घाम गाळा 

बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीमध्ये झाल्येल्या संशोधनानुसार शरीरातून जास्तीत जास्त घाम गेल्याने शरीर तंदुरुस्त राहते. यासाठी तुम्हाला जिममध्ये भरपूर वेळ द्यावा लागेल. यामुळे शरीराची तंदुरुस्ती तर वाढेलच पण, हृदय रोग्य, अतिताणाव , मधुमेह यासारख्या आजारांपासून देखील बचाव होईल.

 

newscientist.com

 

१०. बिपीए टाळा 

BPA म्हणजे बिस्फेनॉल ए, हे एक असे केमिकल आहे जे पॅकेज्ड फूड मध्ये वापरले जाते. पाणी बॉटल, अन्नाचे कॅन अशा घरगुती वापरासाठी लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंच्या पॅकिंगसाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो.

संशोधनाअंती असे सिद्ध झाले आहे की, बीपीओ मुले वंध्यत्व, मधुनेह आणि हृदयरोग होण्याची शक्यता वाढते.

म्हणून अशा पॅकेज्ड फूड पासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा. नंतर पस्तावण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली केंव्हाही उत्तम.

 

 

११. त्वचेची स्वच्छता राखा

इतर महत्वाच्या अवयवांप्रमानेच त्वचा हा देखील एक महत्वाचा अवयव आहे. त्वचेच्या स्वच्छतेसोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे विनाकारण केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांच्या अतिरिक्त मारा टाळणे.

अनेक सौंदर्यवर्धक उत्पादनांत सोडियम लॉरेल सल्फेट आणि सोडियम लॉरेथ सल्फेट असते ज्यामुळे केस आणि त्वचा दोन्ही कोरडे पडू शकतात. त्यामुळे अशी उत्पादने वापरताना त्यातील कंटेंटची माहिती जरूर घ्या.

 

 

१२ सनग्लासेस वापरा

डोळे हा आपल्या शरीराचा नाजूक आणि अतिशय महत्वाचा अवयव आहे. अतिरिक्त सूर्यप्रकाश, ऊन, वारा सोबत अल्ट्रा रेजपासून डोळ्यांचा बचाव करण्यासाठी गॉगल जरूर वापरा.

 

 

१३. फायबरचे भरपूर सेवन

पोषक आहारातील फायबर हा एक महत्वाचा घटक आहे. आहारात मोठ्या प्रमाणात फायबर असेल तर शरीराची चयापचय क्रिया सुरळीत सुरु राहते आणि वाढलेले वजन देखील कमी होते.

मधुमेहापासून बचाव करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी आहारात फायबर असणे अत्यावश्यक आहे.

 

 

१४. हिरव्या पालेभाज्या

तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेह आवर्जून असायला हवा. नेहमी खाताना याची काळजी घ्या की, ताटात एक तरी हिरवी भाजी असलीच पाहिजे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रथिने, ओमेगा-३, बी जीवनसत्व असे विविध पौष्टिक घटक आढळतात.

 

 

१५. अधिकाधिक सेक्स करा

अधिकाधिक वेळ आणि नियमित वेळी सेक्स केल्याने ताणतणाव कमी होतो, प्रतिकार शक्ती वाढते, झोप चांगली लागते, प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत होते.

तारुण्य टिकवून ठेवण्यात सेक्सचा वाटा मोठा असतो, हे नुकतेच संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.

 

 

१६. नियमित वजन तपासा

नियमित वजन तपासल्याने वजन कमी होणे किंवा वाढणे दोन्ही बाबींवर पटकन उपाय योजता येतात.

 

 

१७. कमरेची ताकद वाढवा

४० च्या आसपास कंबर दुखीची तक्रार अनेकांना सतावते. विशेषत: ज्यांचा व्यवसाय ओझे वाहने, गाडी चालवणे अशाशी संबधित आहे त्यांना तर जास्तच. म्हणून नियमित व्यायाम करण्यावर भर ठेवा.

 

 

१८. आहारातील असमतोल टाळा

विकेंड सेलिब्रेशनच्या नावाखाली, जेवण खाणे टाळून तुम्ही अधिक दारू प्यायलात, सिगारेट ओढली आणि सोबतच काही चुकीच्या सवयी लावून घेतल्या असतील तर तुमच्या पचनशक्तीला याचा फटका बसू शकतो.

आहारातील हा असमतोल तुमच्या पचनक्रियेसाठी हानिकारक ठरू शकतो. म्हणून कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर रहा.

 

 

१९. कामाचा अतिरिक्त ताण घेऊ नका

आठवड्यातून ३५ ते ४० तास काम करणे नॉर्मल आहे पण जर तुम्ही बॉसला खुश करण्यासाठी म्हणून किंवा पगाराचा आकडा वाढवण्यासाठी म्हणून जास्त वेळ काम करत असाल, तर कामाच्या या अतिरिक्त तणावामुळे स्ट्रोकची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे स्वतःवर अतिरिक्त ताण देऊन कामाला जुंपू नका.

 

 

२०. प्रक्रिया केलेले प्रोडक्ट्स टाळा

प्रक्रिया केलेले अन्न खाल्याने पोट फुगू शकते. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते. डेअरी उत्पादने, प्रक्रिया केलेले मटन/चिकन, ग्ल्युटेन, प्रिझर्वेटीव्हज, रिफाइंड शुगर, हे पदार्थ कधीही टाळलेले बरे.

 

 

२१. मर्यादित प्रमाणात कॅफेनचे सेवन

मोजक्या प्रमाणात कॅफेन घेतल्यास त्याचा आरोग्याला फायदा होऊ शकतो. पण जर तेच प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात.

वार्धक्याकडे झुकणे, लिवरवरच्या कार्यात अडथळा निर्माण होणे अशा समस्या उद्भवू शकतात. अर्थात कॅफेनचे सेवन अजिबातच करू नये, असे नाही पण त्याचे प्रमाण राखता आले पाहिजे.

 

 

२२ मायक्रोन्युट्रीयंट टेस्ट

मायक्रोन्युट्रीयंट हा शब्द थोडा विचित्र वाटेल पण, खरे तर आपल्या आहाराचा हा एक अत्यावश्यक भाग आहे. आपण जो काही आहार घेतो त्या आहारात हे घटक असतातच.

आपल्या शरीराला या मायक्रोन्युट्रीयंट्सची नितांत गरज असते. जसे की, कॅल्शियम, बी१२, मॅग्नेशियम, ओमेगा३. यातला कोणत्याची घटकाचे प्रमाण कमी जास्त झाल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतोच. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ठराविक अंतराने मायक्रोन्युट्रीयंट टेस्ट करून घ्या.

 

 

२३ आठवड्यातून एकदा आहारात बदल

समतोल आहार आवश्यक असला आणि आहाराच्या चुकीच्या सवयी बदलणे आवश्यक असले तरी, आठवड्यातून एकदा बदल करून थोड्या जास्त कॅलरीज आणि कर्बोहायड्रेट असलेला आहारात घ्यायला हरकत नाही.

तुमचे हार्मोन्स संतुलित असतील तेंव्हा पचनक्रिया, भूक लागणे, आणि उर्जाचा अपव्यय यातील संतुलन राखण्यात ते मदत करतात. आठवड्यातून एखादा दिवस जास्त कॅलरीज घेतल्या तरी, यामुळे थायरॉइड, पचनक्रिया सुधारू शकते.

 

 

२४. विकेंडला अधिक विश्रांती आवश्यक

विकेंडदिवशी जास्त वेळ झोपून राहण्याने आळस वाढतो असे तुम्हाला वाटत असेल पण, शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, आठवड्याच्या शेवटी घेतलेली अधिकाची झोप म्हणजे आरोग्यातील गुंतवणूक आहे. यामुळे मधुमेहासारखे धोके टाळता येतील.

 

 

२५. हुक्का पिणे किंवा स्मोकिंग टाळा

सिगारेटमुळे हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ३५% – ४०% मृत्यू हे स्मोकिंगमुळे होतात, असे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. स्मोकिंगमुळे आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होतात.

 

 

या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला फिट होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.

हे ही वाचा –

===

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

 आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version