आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या देशात खरंच व्यक्तिस्वातंत्र्य आहे का? कुणी काय कपडे घालावेत? कोणी काय करावं? कोणासोबत फिरावं? या सगळ्याचं स्वातंत्र्य आहे का? सध्या हेच प्रश्न सोशल मीडियावर विचारले जातायत.
मागे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हीडिओ होता. दिल्लीतल्या अंसल प्लाझा इथल्या एका रेस्टॉरंटमधला हा व्हीडिओ सध्या बऱ्याच ठिकाणी फिरत होता.
या व्हिडिओमध्ये एक महिला जिला तिने साडी नेसल्याने त्या हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला जातोय याविषयी ती तक्रार करतीये. नेमकी ती महिला कोण आहे? हे असलं विचित्र हॉटेल आहे तरी कोणतं? आणि यावरून नेमकी का एवढी चर्चा का झाली होती हे या लेखातून जाणून घेऊया.
—
—
दिल्लीस्थित अनीता चौधरी या आपल्या परिवारासोबत मुळीच वाढदिवस साजरा करायला अक्विला या रेस्टॉरंटमध्ये गेल्या, तिथे गेल्यावर त्यांना तिथे प्रवेश नाकारण्यात आला, कारण त्यांनी साडी परिधान केली होती, शिवाय त्यांच्या पतीने पॅन्ट-शर्ट तर मुलीने वेस्टर्न ड्रेस घातला होता.
साडी हा प्रकार कॅज्यूअल आऊटफिट मध्ये मोडला जात नसल्याने तिथल्या कर्मचाऱ्यांनी अनीता यांच्या मुलीला बाजूला घेऊन रेस्टॉरंटचे नियम समजावून सांगितले. खरंतर रेस्टॉरंटमध्ये जाण्याआधीच अनीता यांनी बुकिंग केलं होतं, तरी त्यांना प्रवेश नाकरल्याने त्यांना प्रथम काहीच समजत नव्हतं.
तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना २ गोष्टी सांगितल्या, एक म्हणजे रेस्टॉरंटमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय सर्वस्वी रेस्टॉरंटचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे फक्त स्मार्ट आऊटफिट घातलेल्यांनाच परवानगी दिली जाते!
Saree is not allowed in Aquila restaurant as Indian Saree is now not an smart outfit.What is the concrete definition of Smart outfit plz tell me @AmitShah @HardeepSPuri @CPDelhi @NCWIndia
Please define smart outfit so I will stop wearing saree @PMishra_Journo #lovesaree pic.twitter.com/c9nsXNJOAO— anita choudhary (@anitachoudhary) September 20, 2021
रेस्टॉरंटच्या या नियमाविषयी तिथे कुठेही बोर्ड लिहिलेला नव्हता शिवाय त्यांच्या वेबसाईटवरदेखील असं कुठेच नमूद केलं गेलं नव्हतं. अनीता यांनी रेस्टॉरंटच्या रूल बुकची मागणी केली, पण त्यावरही हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले नाही.
अनीता यांनी पुन्हा पुन्हा स्मार्ट आउटफिट म्हणजे नेमकं काय हे विचारायचा प्रयत्न केला तरी त्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे उत्तरं द्यायला सुरुवात केली, हळू हळू या वादाचं रूपांतर भांडणात झालं आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा आवाज चढवून “saree is not allowed” म्हणत अरेरावी केली!
–
- मिंत्राच्या लोगो पाठोपाठ आता या ७ लोगोंचादेखील काढला जातोय ‘तो’ अर्थ!
- तनिष्क जाहिरात वाद आणि लव्ह जिहाद: भारतीय हिंदू समाजाचं नवं रूप…
–
हा सगळा प्रसंग अनीता यांनी मोबाइल कॅमेरामध्ये कैद केला आणि लगेच त्याबद्दल सोशल मीडियावर ट्विट केलं, यानंतर देशाच्या काना कोपऱ्यातून लोकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली, लोकांनी या रेस्टॉरंटला zomato वर कमी रेटिंग द्यायला सुरुवात केली.
या घटनेची लोकांनी कडव्या शब्दात निंदा केली होती, शिवाय ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करून त्याविषयी चर्चासुद्धा केली होती, इंग्रज गेले तरी त्यांची मानसिकता अजूनही आपल्या लोकांच्या डोक्यातून जात नाही असं म्हणत लोकांनी याविरोधात मत व्यक्त केलं होत.
या एका प्रकरणामुळे रेस्टॉरंटचा परवाना रद्द करावा अशीही मागणी सोशल मीडियावर झाली होती.
याविषयी रेस्टॉरंटच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा तेव्हा स्पष्टीकरण दिलं, त्यांच्या म्हणण्यानुसार तेव्हा त्याठिकाणी एक इवेंट होणार होता म्हणूनच त्यांना प्रवेश नाकारण्यात आला, शिवाय तिथे अनीता आणि तिच्या बरोबरच्या लोकांनी स्टाफला धक्काबुक्की केली, कानाखाली मारली असेही रेस्टॉरंटच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अर्थात हा सगळा प्रकार व्हायरल होणाऱ्या व्हीडियोमध्ये दिसत नाहीये, कारण रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांच्या मते तो व्हीडियो धक्काबुक्की नंतरचा आहे!
शिवाय आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन अक्विला रेस्टॉरंटने एक पोस्ट करत स्पष्टीकरण दिले की त्यांच्या हॉटेलमध्ये साडी नेसलेल्या महिलांना प्रवेश दिला जातो. याबरोबरच त्यांनी या पोस्टमध्ये २ व्हीडियोजसुद्धा जोडले ज्यात साडी नेसलेल्या महिला रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसतायत!
आता या सगळ्या प्रकारानंतर संभ्रम निर्माण झाला होता की अनीता यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की रेस्टॉरंटने शेअर केलेली पोस्ट खरी?
रेस्टॉरंटचं म्हणणं खरं असेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हीडियोज किती घातक ठरू शकतात याची आपल्याला जाणीव होईल, आणि जर अनीता यांच्या व्हीडियोमध्ये तथ्य असेल तर ‘साडी परिधान करणाऱ्या’ स्त्रियांना प्रवेश न देणाऱ्या हॉटेलवर कारवाई होणं अत्यावश्यक होत !
सोशल मीडियामुळे आजकाल या गोष्टी सर्रास घडताना आपण बघतो, आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने कॅमेरा सुरू करून ती व्यक्ति तिला जे वाटेल ते व्हायरल करते, आणि यामुळे नेमकं सत्य समोर न येता हे असले प्रकार घडतात.
प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहायलाच हवं पण सोशल मीडियाचा वापरही लोकांनी समंजस वृत्तीने करायला हवा हे अनीता चौधरी यांच्या प्रकरणावरुन शिकण्यासारखं आहे!
===
- …म्हणून व्हीडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरोधात “बाबा का ढाबाच्या” मालकाने केली पोलिसात तक्रार!
- बंगलोरमध्ये डिलिव्हरी बॉयने केली महिलेला मारहाण, महिलेने शेअर केला व्हिडिओ
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.