चकणा म्हणून या ५ गोष्टी टाळाच, नाहीतर ‘एकच प्याला’ तुम्हाला चांगलाच महागात पडेल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘जमेगी मेहफिल जब मिलेंगे दिवाने दो’… हीच स्थिती असते जेव्हा आपण मित्रांसोबत मैफिल जमवतो. अशा मैफिलीत माहौल बनण्यासाठी मित्रांसोबत हातात वाईन किंवा हार्ड ड्रिंकचा ग्लास हवाच.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
सोबत जर छान चवीचे रुचकर स्टार्टर्सं असतील तर ‘सोनेपे सुहागा.’ चार घास जरा जास्तच जातात अशावेळी. पण हे तुम्हाला माहिती आहे का, की मद्यासोबत काही खाताना त्या खाद्यपदार्थांमुळे आपल्याला त्रासही होऊ शकतो.
रिकाम्या पोटी मद्यपान करणे, जास्त तेलकट, जास्त तिखट पदार्थ मद्यासोबत खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. अल्कोहोल आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करून आपल्याला डिहायड्रेड करते.
अल्कोहोलमुळे शरीरातील सोडीयमचे प्रमाणही कमी होते. हेच कारण आहे की मद्यपान केल्याच्या दुसर्या दिवशी आपल्याला डोके दुखण्याचा त्रास होतो. मद्यासोबत काही पदार्थ खाणे फारच हानीकारक आहे. कोणते आहेत हे पदार्थ? चला जाणून घेऊ.
१. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
जेव्हा तुम्ही मद्यपान करत असता तेव्हा दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा. जेव्हा मद्य प्यायले जाते तेव्हा आपल्या शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढलेले असते. अशावेळी जर आपण अल्कलीयुक्त असे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ले तर आपल्याला अपचनाचा त्रास होवू शकतो. म्हणून मद्यपान केल्यावर किंवा करण्याआधी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये.
२. पिझ्झा
पिझ्झा ही अनेकजणांची आवड असते. अशी माणसं कोणत्याही वेळेला पिझ्झा खायला एका पायावर तयार असतात. पण मद्य आणि पिझ्झा हे कॉम्बिनेशन काही फारसं चांगलं नाही. खासकरून जेव्हा तुम्ही हे कॉम्बिनेशन रात्रीच्या वेळी खाता, त्यावेळी अधिक घातक आहे. मद्यासोबत पिझ्झा खाणे म्हणजे आपल्या पचनसंस्थेवर ताण आणण्यासारखे आहे.
–
- लिव्हर खराब होण्यापूर्वी दिसतात `ही’ लक्षणं, तुमचं लिव्हर ठीक आहे ना? वेळीच तपासा
- सावधान! हे ७ पदार्थ खाल्लेत तर तुमचा शरीरातील ‘हा’ महत्वाचा अवयव होईल खराब!
–
३. डार्क चॉकलेट
इतरवेळी डार्क चॉकलेट खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते. पण ड्रिंक केल्यावर किंवा ड्रिंकसोबत डार्क चॉकलेट खाणे हे मात्र आरोग्यासाठी हानिकारक आहे.
इतर आम्लयुक्त पदार्थांप्रमाणे केफेन, फॅट आणि कोको हे चॉकलेटमधील पदार्थ मद्यासोबत खाल्ले तर गॅस्ट्रीक प्रॉब्लेम होऊ शकतो. परिणामी पोटाच्या तक्रारी वाढू शकतात.
४. मिठाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ
हलकेफुलके स्नॅक्स, चिप्स यांसारखे मिठाचे जास्त प्रमाण असणारे पदार्थ आपल्या शरीरातले पाण्याचे प्रमाण कमी करतात. त्यामुळे तुम्ही अधिकाधिक मद्याचे सेवन करता जे हानिकारक आहे. म्हणूनच मद्यपान करताना मिठाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ जास्त खाऊ नयेत.
५. तेलकट पदार्थ
जी गोष्ट चिप्सची तीच गोष्ट फ्राईज किंवा त्यासारख्या तेलकट पदार्थांची. तिखट आणि तेलकट पदार्थ टाळणे आपल्यासाठी थोडे जड जाते. पण तेलकट पदार्थ पचायला जड असतात. मद्यासोबत अशा पदार्थांचे सेवन आपली काळजी वाढवू शकते.
–
- या पदार्थांचं अतिसेवन वेळीच बंद केलं नाहीत तर तुम्ही कॅन्सरच्या विळख्यात अडकू शकाल
- कॅन्सरचा धोका वाढवणारे हे पदार्थ तुमच्या आहारात तर नाहीयेत ना?
–
याशिवाय पचायला जड असणारे कोणत्याही प्रकारचे पदार्थ, जसे बटाटा, कांदा यांपासून बनवलेले पदार्थ जर आपण मद्यासोबत खाल्ले तर आपल्या पचन संस्थेवर त्याचा ताण येऊन तब्येत बिघडू शकते.
याशिवाय रेड वाईन सोबत बीन्स, बीयर सोबत ब्रेड या प्रकारचे अल्कोहोल सोबतचे कॉम्बिनेशन देखील प्रॉब्लेम निर्माण करू शकते.
मग मंडळी, जेव्हा कधी मित्रांसोबत मैफिल जमवायची असेल आणि मद्यपान करायचे असेल तेव्हा सॅलड, उकडलेल्या अंड्याचे पदार्थ असे आरोग्यदायी कॉम्बिनेशन ट्राय करा आणि मैफिलीची मजा लुटा!
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.