Site icon InMarathi

हे १२ फोटो पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, “मला नेमकं हेच म्हणायचं होतं”

alone inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आईवडिल, मित्र, सहकारी, नातेवाईक या सगळ्या गोतावळ्यात माणूस गुंतून जातो. बालपणी केवळ कुटूंबातील माणसांमध्ये रमणारं मुल, हळूहळू शाळा, त्यानंतर कॉलेज आणि मग ऑफिस अशा वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक नवी नाती जोडतं.

त्यातील काही नाती औपचारिक असली तरी काही मात्र जिव्हाळ्याची! तरीही, अनेकदा आपल्याला एकटं वाटतं, माणसांच्या गर्दीत राहूनही ‘आपलं असं कुणीच नाही’, किंवा ‘मला एकट्याला राहू द्या’ असा विचार कधीतरी प्रत्येकाच्या मनात डोकावतो.

 

 

सुख, आनंद साजरा करताना आपल्या भोवती माणसांचा गोतावळा असला तरी दुःखद प्रसंग, मनात साचणाऱ्या नकारात्मक भावना, आलेलं डिप्रेशन, एखादं संकट अशावेळी नक्की कुणाचा आधार घ्यावा, कुणाकडे आपलं मन मोकळं करावं हे ठरवणंही कठीण जातं.

कधी ना कधी प्रत्येकाच्याच मनात थैमान घालणाऱ्या भावना, विचार यांना मोकळी वाट करून देणारे हे १० फोटोज म्हणजे स्वतःच्या विचारांचा आरसा! काही बोलक्या चित्रांच्या आधारे तुमच्या मनातील भावना रेखाटण्याचा हा प्रयत्न…

१. पैसा आहे पण…

 

 

हल्ली प्रत्येकाच्याच खिशात पैसा खळखळतो. नोकरी, व्यवसाय यांमुळे आर्थिक स्थैर्य जरी आले असले तरिही पैशाने माणसाची सोबत विकत घेता येत नाही. बाजारात, किंवा मॉलमध्ये सगळंकाही पैशाने खरेदी करता येत मात्र माणसांची साथ, आपुलकी यांच्यासाठी माणसं जपावी लागतात, अर्थात ज्याच्यासाठी पैसा खर्च करावा असा माणूसच नाही असं कधीतरी तुम्हाला वाटलं असणारच!

 

२. तू फार बदललास…

 

 

माणसं बदलतात हे कितीही मनाला समजावलं तरी अनेकदा याच कारणांमुळे दुःख सोसावं लागतं. “तु पुर्वीसारखा आता वागत नाहीस” किंवा “तू खूप बदललीस? ” हे वाक्य अनेकदा आपल्या ओठी येतं.

 

३.  ऐकणारं कुणीच नाही

 

 

मी सगळ्यांची दुःख, टेन्शन्स ऐकून घेत आधार द्यायचा, मात्र गरजेच्या वेळी माझं ऐकून घेणारं कुणीही नाही असा विचार कधी तुमच्या मनात आलाय का ?

४. नको ना जाऊस…

 

 

आपण कितीही खटपट केली, तरिही आपल्याला गरज असतानाच माणसं सोडून जातात. तुम्हालाही हा अनुभव आलाय का?

 

५. माझं बरोबर आहे पण….

 

 

नात्यातील भांडणात अनेकदा आपली बाजू योग्य असते, मात्र ती ठामपणे मांडणारे मुद्दे किंवा शब्द ऐनवेळी सापडत नाहीत. अशावेळी विनाकारण दोष  आपल्यालाच दिला जातो, तुमच्याही बाबतीत असं कधीतरी घडलं असेलच!

 

६. विश्वासघात होतोच…

 

 

विश्वास ठेवणं ही माणसाची सर्वात मोठी चूक असते, मात्र जाणीवपुर्वक हीच चूक वारंवार केली जाते. आणि मग विश्वासघात झाला की पुन्हा त्यासाठी पश्चातापही व्यक्त केला जातो.

 

७. दुःखातही एकटेपण

 

 

अनेकदा आपले अश्रू पुसायलाही कुणी नाही अशी जाणीव तुम्हाला कधी झाली आहे का? सुखात सगळेच सोबत असतात, मात्र दुःखात जो खंबीरपणे सोबत उभा असतो तोच खरा मित्र! म्हणूनच ज्यांना तुमची किंमत नाही अशांसाठी विनाकारण आपले मौल्यवान अश्रू वाया घालवू नका.

८. नातं टिकवणेयाची धडपड

 

 

नातं टिकवण्याची जबाबदारी दोघांची असते, हे कधीही विसरू नका.

९. विश्वास तुटला तर….

 

 

विश्वासघाताचं दुःख हे काही क्षणापुरत नव्हे तर आयुष्यभर सोसावं लागतं, हो ना?

 

१०.  तो काय एकटाच…

 

 

इतरांना दुःखाच्या वेळी सांभाळणारी, आपला खांदा पुढे करणा-या व्यक्तीच्या आयुष्यात नेमकं काय सुरु असतं, याची कुणाला कल्पनाही नसते. आपलं दुःख एकट्याने सोसून पुन्हा चेह-यावरील हास्यासह सर्वांमध्ये मिसळणारी अशी एखादी व्यक्ती तुमच्या परिचयात आहे का?

 

११. असल्या व्यक्ती नको गं बाई

 

 

मनस्ताप देणारी, किंवा तापदायक माणसं असण्यापेक्षा नसलेली बरी! तुम्हाला कोणाकोणाबद्दल असं वाटतं?

 

१२. हसरे दुःख

 

 

आपल्या दुःखामुळे इतरांना त्रास होऊ नये यासाठी जो सगळं सहन करून सतत चेहरा हसरा ठेवतो, तोच खरा समंजस!

 

१३. नवा दिवस, नवी आशा

 

 

आयुष्याच्या प्रवासात खाचखळगे येतात, कधी दुःखाची वळणं तर कधी संकटाचे डोंगर उभे राहतात, मात्र या सर्वांमधून वाट काढत जो पुढे चालत राहतो तोच खरा सच्चा माणूस! कारण रात्रीच्या भयावह अंधारानंतर नव्या दिवसाचा प्रकाश येतोच.

त्यामुळे मनातील दुःख, निराशा, अपेक्षाभंग, विश्वासघात या भावना वेळोवेळी येत राहणार हे नक्की, मात्र त्याकडे आपण सकारात्मक दृष्टीनं पाहिलं तर संकटांचे काळे ढगही लवकर सरतील आणि पुन्हा आनंदाच्या, उत्साहाच्या प्रकाशाने तुमचं जग उजळून निघेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version