आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी २ करोड लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा विश्वविक्रम भारताने नोंदवला! संपूर्ण भारतातच आता लसीकरण जोरात सुरू झालं आहे.
बहुतेक लोकांचा पहिला डोस आणि काही लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले असून हळूहळू देशातले सगळेच व्यवहार सुरू होत आहेत, गेल्यावर्षी जी उदासीनता आपल्याला दिसत होती ती यावर्षी नसून एक उत्साहाचं आणि उमेदीचं वातावरण बघायला मिळतंय!
गेल्या वर्षभरापासून खेड्यापाड्यातील लोकांना कोरोना लस घेण्यासाठी जागरूक केलं जातंय हे आपण बघतोच आहोत पण आता ही गोष्ट शहरी भागांमध्येसुद्धा करावी लागणार असंच वाटतंय.
कारण अजूनही अशी बरीच लोकं आहेत ज्यांनी कोरोची एकही लस घेतलेली नाही, कारणं काहीही असो पण अजूनही अशी काही मंडळी आहेत ज्यांना हा सगळा एक मोठा घोटाळा वाटतोय, यात बऱ्याच सुशिक्षित लोकांचा तसेच सेलिब्रिटीजचासुद्धा समावेश आहे.
–
- बाई आणि ब्रा – या विळख्यात ‘तिला’ अडकवणाऱ्यांना हेमांगी कवीचा सणसणीत टोला
- पोलिओ आणि कोव्हिड लशीकरणाची रवीश कुमार यांच्याकडून तुलना..काय घडलंय वाचा
–
सोनाली खरे या मराठमोळ्या अभिनेत्रीचे पती आणि अभिनेते बीजय आनंद यांनी नुकतंच असं स्टेटमेंट दिलं आहे की काहीही झालं तरी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणार नाही.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की “लंडनमध्ये शुटींग असूनही मला त्या फिल्म्स सोडाव्या लागल्या, दुबईमध्ये एका पुरस्कार सोहळ्याला जायचं मी टाळलं, कारण एकच मी लस घेतलेली नाही म्हणून, मला काहीच काम नाही मिळालं तरी चालेल पण मी लस घेणार नाही, माझ्यासाठी अभिनय ही गोष्ट दुय्यम आहे!”
यासंदर्भात पुढे बोलताना ते म्हणाले की “माझं शरीर म्हणजे एक मंदिर आहे, त्यात मी कोणतंही केमिकल टाकून ते दूषित करू इच्छित नाही, मला अॅक्टिंग नकोय किंवा कोणती नोकरीही नकोय, या सगळ्या गोष्टींचा मी त्याग केलाय!”
याबाबत पुढे सांगताना आनंद यांनी स्पष्ट केले की त्यांची पत्नी सोनाली खरे हिनेसुद्धा अद्याप लस घेतलेली नाहीये. त्यांच्या १४ वर्षांच्या मुलीला लंडनला एका सिनेमात ऑफर मिळाली आहे, पण तिला तिथे एकटीलाच जावं लागणार आहे याची त्यांच्या मुलीनेही खंत व्यक्त केली आहे.
शिवाय ही लसीकरण मोहीम म्हणजे एक राजकीय कारस्थान आहे, थोतांड आहे…इतिहासातला एक मोठा स्कॅम आहे असंही आनंद यांनी नमूद केलं आहे, आणि म्हणूनच मी लस न घेण्याचा स्टँड घेतला आहे.
शेरशाह या सिनेमात नुकतंच बीजय आनंद यांनी एक महत्वाची भूमिका निभावली जी लोकांनी चांगलीच पसंत केली, बीजय हे एक प्रसिद्ध योगा प्रशिक्षकसुद्धा आहेत, जगभरातून अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे योगा शिकतात.
“कोरोना हा काय कायमचा आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसणार नाहीये त्यामुळे काहीही झालं तरी मी लस टोचून घेणार नाही यावर मी ठाम आहे” या भूमिकेवर ते ठाम आहेत.
आता बीजय यांच्या स्टँडकडे कसं बघायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण सरसकट जगभरात चाललेल्या या मोहिमेला राजकीय स्कॅम किंवा थोतांड म्हणणं हेदेखील योग्य नाही.
देशात कोणतीही महामारी कायम टिकलेली नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं हाच एकमेव पर्याय साऱ्या जगासमोर आहे त्यामुळे बीजय आनंदसारखे सेलिब्रिटी लस घेवो किंवा न घेवो, आपण सगळ्यांनीच लस घेणं अत्यावश्यक आहे तरच आपण या महामारीतून बाहेर पडू शकू.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.