आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
‘चहा’… काहींसाठी पेय, काहींसाठी गरज, काहींसाठी केवळ एक शब्द, मात्र चहाबाज लोकांसाठी सर्वस्व!
थांबा, अतिशयोक्ती वाटतीय? मग जरा आसपास नजर फिरवा, घराजवळील किंवा ऑफिसच्या शेजारील टपरीवर वाफाळत्या चहाचा घोट घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसेल त्यावरून हे सिद्ध होईल की चहाची तुलना जगात कशाशीही होऊ शकणार नाही.
तर अशा या चहाप्रेमी, चहाबाज, चहाटळ लोकांसाठी आजचा दिवस म्हणजे रोजच्यापेक्षा आणखी एक चहा जास्त पिण्याचं निमित्त! अहो, कारण आजचा दिवस हा राष्ट्रीय ‘चाय दिन’ म्हणून साजरा केला जातो.
याच दिनाच्या निमित्ताने तुमच्या-आमच्या मनात आणि जीभेवर अधिराज्य गाजवणारा चहा म्हणजे नेमकं काय? हे फोटोस्वरुपात दाखवण्याचा हा प्रयत्न! तुमच्यापैकी प्रत्येकाने हा अनुभव घेतला असेलच, मात्र पुन्हा त्याला उजाळणी द्या.
१. चहा म्हणजे…
थंडी असो वा पाऊस, हाती चहा मिळाल्यानंतर मनात ज्या भावना दाटतात, त्या स्वर्गसुखापेक्षा काही कमी नाहीत, हो ना?
२. चहा घेतान ना, घेतलाच पाहिजे…
रेस्टोरन्टमध्ये गेल्यावर कॉफी, कोल्ड्रींक, कॉकटेल्स ‘पिणार का?’, हे विचारणारी व्यक्ती जेंव्हा चहा घेणार ना? असं हक्कानी विचारते तेंव्हा क्षणात निर्माण होणारी आपुलकी एकदा अनुभवून बघाचस कारण ती शब्दात सांगणं कठीण आहे.
३. ३६५ दिवसांचा सोबती
दरवर्षी कॅलेंंडरमध्ये ‘ड्राय डे’ शोधून होणारा मनस्ताप, चहाप्रेमींना कधीही त्रास देत नाही. कारण चहा आणि ड्राय डे यांचा ३६ चा आकडा आहे. ३६५ दिवस हा सोबती असताना एकटं वाटायची गरजच काय?
४. पाऊस, ती आणि तो….
थांबा, तुम्हाला वाटेल, ती आणि तो म्हणजे पावसात चींब भिजणा-या प्रेमीयुगुल, मात्र इथे पाऊसातले ते दोघं म्हणजे ती कुरकुरीत भजी आणि तो वाफाळता चहा. पाऊस अनुभवावा तो या या दोघांच्याच साथीने!
–
चहाप्रेमींनो – चहात करायचे हे २ छोटे बदल तुम्हाला आरोग्यपूर्ण करतील!
वेळेला चहा लागतो हे मान्यच पण ही गोष्ट देखील त्यासोबत करत जा….
–
५. चहाची वेळ
खरंतर चहाला वेगळी अशी वेळ नाही कारण चहाबाज लोकांना कोणत्याही वेळी चालतो. पण योग्य वेळेला, गरज असताना चहा हवाच!
६. चहा करण्याची गंमत
चहा पिताना जितकी गंमत वाटते, तितकीच मजा चहा करण्याच्या पद्धतीत आहे. चहा करतानाच्या प्रत्येक पायरीत आयुष्याचं सारं उलगडतं.
७. सकाळ म्हणजे चहा
सकाळ म्हणजे काय? असं विचारल्यानंतर जे पहाट, प्रकाश, सुर्य अशी उत्तरं न आठवता जे एका शब्दात ‘चहा’ असं उत्तर देतात तेच खरे चहाप्रेमी!
८. चहाने तयार होणारा बॉन्ड
कडाक्याचं भांडण असो वा नात्यातील अबोला, चहा घेणार का? या एका वाक्याने सारं काही सुरळीत होतं.
९. कॉफी की चहा?
चहा की कॉफी या वादात पडणा-यांनो, आधी वरील चित्र वाचा आणि मग निर्णय घ्या,
१०. चहा म्हणजे…
चहा म्हणजे काय? किंवा तुम्ही चहाबाज का? असा प्रश्न कुणी विचारला तर या दोन ओळीच पुरेशा ठरतील, नाही का?
११. तुमचं नातं चहासारखं आहे का?
एकाने परवलं, तर दुसऱ्याने सावरायचं, ही मोठी शिकवणं देणारा चहा मित्रासह कधी मार्गदर्शक, गुरु ठरतो हे कळतही नाही.
तर चहाप्रेमींनो, तुमच्या भावना थोडक्यात सांगणारा हा प्रयत्न कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.
अर्थात आजचा चाय दिन हा केवळ आजच नाही तर वर्षभर दररोज साजरा करा, मात्र चहा पिताना आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.