Site icon InMarathi

३ बालकांना वाचवण्यासाठी, अवघ्या २२व्या वर्षी प्राणांची आहुति देणारी शूर कन्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

काही लोकांच्या साध्या सरळ जीवनात काही प्रसंग असे उभे रहातात की ज्यामुळे त्यांच्या धैर्य, प्रसंगावधान आणि चातुर्याचा कस लागतो.

काही मोजकेच लोक अश्यावेळी अतुलनीय शौर्य गाजवतात. नीरजा – अशीच एक शूर वीर होती.

५ सप्टेंबर १९८६ रोजी अबू निदाल ह्या दहशतवादी संघटनेने Pan Am Flight 73 चं अपहरण केलं. विमान कराची एअरपोर्टवर असतानाच हे अपहरण झालं.

अपहरण घडताच फ्लाईटचा पायलट, को-पायलट आणि फ्लाईट इंजिनिअर हे तिघेही अमेरिकन cabin crew मेंबर्स पळून गेले.

मग, फ्लाईटची सर्वात सिनीअर cabin crew म्हणून chief flight purser असलेल्या नीरजा भानोतने जबाबदारी घेतली.

 

 

हे ही वाचा –

===

 

फ्लाईट वरील सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करण्याचा आदेश दहशतवाद्यांनी दिला. त्यांचा हेतू प्रवाश्यांमधील अमेरिकन लोक मारण्याचा होता.

नीरजाने, तिच्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने ४१ अमेरिकन लोकांचे पासपोर्ट लपवून ठेवले आणि त्यांचा जीव वाचवला.

१७ तासांनंतर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. तेव्हा नीरजाने तत्परतेने emergency door उघडून अनेक प्रवाश्यांना पळून जाण्यास मदत करून वाचवलं.

लक्षणीय गोष्ट ही की दरवाजा उघडून नीरजा स्वतः सर्वप्रथम पळून जाऊ शकत होती. पण तिने तसं नं करता इतरांना जाऊ दिलं.

शेवटी – ३ लहान मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात नीरजा दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडली.

नीरजाच्या ह्या शौर्यासाठी भारत, पाकिस्तान आणि अमेरिका ह्या तिन्ही देशांनी तिला मरणोत्तर शौर्य पदकं बहाल केली.

नीरजाने Miami हुन flight attendant ची ट्रेनिंग घेतली होती. त्या आधी, सासरहुन हुंड्याची मागणी होत असल्याने ती मुंबईला रहायला आली होती. तिने एक यशस्वी model म्हणून सुद्धा स्वतःची ओळख निर्माण केली होती.

 

 

२००४ मध्ये, सरकारने नीरजाच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित केलं. शिवाय घाटकोपरला एका चौरस्ताला नीरजाचं नाव दिलं गेलं, ज्याचं अनावरण अमिताभ बच्चन हस्ते करण्यात आलं.

 

१९ फेब्रुवारी, २०१६ ला प्रदर्शित झालेला आणि सोनम कपूर प्रमुख भूमिकेत असलेला ‘नीरजा’ हा हिंदी चित्रपट देखील याच कथेवर आधारित आहे.

चित्रपटाची झलक इथे बघू शकता.

 

हे ही वाचा –

===

 

हा चित्रपट सुद्धा त्या निरजा सारखाच धाडसी, सिनेमा तर उत्तम आहेच, शिवाय यात सोनम कपूर हिने निभावलेली नीरजा ची भूमिका खूप उत्तम रीत्या साकारली आहे!

तीने ज्या प्रकारे कसलीही भीड न बाळगता त्या दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देत फ्लाईट मधल्या लोकांचे प्राण वाचवले ते बघताना आजही अंगावर काटा येतो!

या सिनेमाला उत्तम सिनेमासाठी बरेच अवॉर्ड मिळाले त्यात उत्तम सिनेमाचं राष्ट्रीय पुरस्काराचं पारितोषिक सुद्धा असून फिल्मफेअर चे सुद्धा बरेच पुरस्कार मिळाले! 

 

india today

 

हा सिनेमा म्हणून उत्तम आहेच शिवाय एक वेगळीच प्रेरणा सुद्धा देणारा आहे!

देशाची सेवा करण्यासाठी तुम्हाला आर्मी मध्येच जायची आवश्यकता नाही, सिव्हीलियन म्हणून सुद्धा तुम्ही तुमची कर्तव्ये चोख बजावून देशाची सेवा करू शकता!

हीच शिकवण हा सिनेमा आणि नीरजा च्या बलिदानातून आपल्याला मिळते!

भारताच्या ह्या शूर सुपुत्रीला त्रिवार वंदन!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version