Site icon InMarathi

सॅलरीमधून सेव्हिंग करताना तारांबळ उडतीये : मग हे १० खास पर्याय तुमच्यासाठीच!

akshay kumar rajpal yadav inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही पाहिले असेल की बर्‍याच गृहिणी आपली वैयक्तिक बचत करताना दर महिन्याची भिशी, किटी पार्टी या मार्गानी बचत करतात किंवा अगदी धान्याचे डबे, घडी करून ठेवलेल्या साड्या, चहा साखरेचे डबे यांमधून पैसे साठवून ठेवणे अशा या गृहीणींच्या बचत करून ठेवण्याच्या पारंपरिक जागा आहेत.

‘थेंबे थेंबे तळे साचे ‘ ही म्हण त्यांना चांगली परिचयाची आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की सर्वसाधारण बचतीचेही असे काही स्मार्ट मार्ग आहेत. ज्यामधे कमी जोखीम आहे पण मिळणारे रिटर्न्स मात्र फायदेशीर आहेत.

 

timesofindia.com

 

मार्केट मधील अनिश्चितता आणि कमी होणारे व्याजदर यांच्या रस्सीखेचमध्ये सामान्य लोक आपल्या भविष्यासाठी बचत करण्याचा प्रयत्न करत असतात.

संपत्ती वाढवण्याचा आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा स्मार्ट मार्ग म्हणजे योग्य ठिकाणी केलेली आपल्या पैशांची गुंतवणूक. सरकार, बँक, आणि इतर वित्तीय कंपन्यांकडून दिल्या जाणार्‍या गुंतवणुकीच्या पर्यायांची आणि बचत योजनांची कमी नसताना, गुंतवणूक करण्यापूर्वी पुरवलेली सुरक्षा आणि त्यातून मिळणारा परतावा याची माहिती घेवूनच गुंतवणूक निश्चित करावी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जर बचत किंवा गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर आम्ही सांगत आहोत काही सर्वोत्तम पर्याय जे तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतील आणि तुमच्या गुंतवणुकीला सुरक्षित परतावा मिळण्यास मदत होईल.

१. गोल्ड बॉन्ड :

 

 

सोने खरेदी मग ती दागिन्यांच्या रूपात असो किंवा कॉइनच्या रूपात, गुंतवणुकीचा पारंपरिक आणि सुरक्षित समजला जाणारा मार्ग आहे. पण त्यातील दागिन्यांच्या घडणावळीचे दर मात्र अगदी ६-१४ टक्क्यांपर्यंत असतात जे आपल्यालाच भरावे लागतात.

मात्र हा गुंतवणुकीचा सोपा पर्याय असल्याने जास्त प्रमाणात अवलंबला जातो. आजकाल बाजारात गोल्ड कॉईन्स, शेअर्स, तसेच पेपर गोल्ड आणि गोल्ड बॉन्ड हे सुदधा सोन्याच्या गुंतवणुकीचे नवीन पर्याय उपलब्ध आहेत.

२. रियल इस्टेट :

 

 

घर आपण आपल्या राहण्यासाठी बांधतो किंवा खरेदी करतो. पण आजकाल आपले राहते घर सोडून गुंतवणुकीसाठी सेकंड होमच्या खरेदीचा ट्रेंड आहे.

यात घर खरेदी बरोबरच जमिनीची खरेदी देखील आपण गुंतवणूक म्हणून करू शकतो. हा देखील गुंतवणुकीसाठी स्मार्ट आणि सुरक्षित पर्याय आहे.

३. मुदत ठेव किंवा फिक्स डिपोझिट्स :

 

flickonclick.com

 

हमी परताव्यासह जोखीम भरून काढू पाहणार्‍यांसाठी मुदत ठेव हा सर्वोत्तम पर्याय आहे. याबरोबरच वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांमार्फत ऑनलाइन एफ.डि.च्या विविध योजना बाजारात उपलब्ध आहेत.

ही एक पेपरलेस प्रक्रिया असून वापरण्यास देखील सोपी आहे. यामध्ये मिळणार्‍या परताव्याचा दर देखील चांगला असतो.

४. बचत खाते :

 

 

वेगवेगळ्या बँका किंवा वित्तीय संस्थांमध्ये बचत खाते सुरू करूदेखील तुम्ही बचत करू शकता. हा सर्वात कमी रिस्क असलेला आणि सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये तुम्ही कमीत कमी आणि जास्तीत जास्त रक्कम भरू शकता आणि बचत करू शकता.

५. सार्वजनिक भविष्य निधि (ppf) :

 

 

भारतातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणजे ‘पब्लिक प्रोव्हीडंट फंड’. पीपीएफ ही सरकार समर्थीत दीर्घकालीन बचत योजना आहे जी करमुक्त आहे.

पिपीएफमध्ये जमा केलेली रक्कम आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत वजावट म्हणून उपलब्ध आहे. किमान ५००/- पासून आपण यात वार्षिक गुंतवणूक करू शकतो.

६. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र :

 

 

एनएससी हा देखील अजून एक सरकार समर्थित गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय आहे. जो कर बचतीसह तुमचा परतावा प्रदान करतो. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता.

या योजनेचे व्याजदर सरकार ठरवते आणि प्रत्येक तिमाहीत याचा आढावा घेतला जातो. सध्या या योजनेमध्ये ६.८० % परतावा मिळतो.

७. म्युच्युअल फंड :

 

 

शेअर बाजारात डायरेक्ट गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. ते जास्त सुरक्षित आहे.

यात तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार जोखीम आणि परताव्याचा समतोल साधता येतो. सिस्टिमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान तुम्ही सुरू करू शकता. नियमित पण लहान प्रमाणात गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम उपाय आहे.

८. बिट कौईन :

 

 

हे आभासी चलन आहे. त्याची सुरुवात २००९ मध्ये झाली, जी आता हळूहळू इतकी लोकप्रिय झाली आहे की एका बिटकॉइनची किंमत लाखो रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

याला क्रिप्टोकरन्सी असेही म्हणतात कारण ते पेमेंटसाठी क्रिप्टोग्राफी वापरते. म्हणजेच आता या चलनाला भविष्यातील चलन असेही म्हणता येईल. पण याला मध्यवर्ती बँकेचा पाठिंबा नसल्याने ते खाजगी संस्थांमार्फत वितरित केले जाते.

९. इक्विटी लिंक्ड बचत योजना :

 

 

ही योजना देखील म्युचूअल फंडासारखेच काम करते. हे कर बचत करणारे म्युच्युअल फंड आहेत. तुम्ही यात गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा मिळवू शकता.

सर्व गुंतवणूक ही इक्विटी मार्केट मध्ये केली जाते. जी तुम्हाला महागाईवर मात करण्यास मदत करते. पण यात रिस्क भरपूर आहे. कारण बाजारातली अनिश्चितता. तरीही हा एक चांगला पर्याय आहे.

१०. डायरेक्ट इक्विटी इन्वेस्टमेंट :

 

 

यालाच बोलीभाषेत शेअर मार्केट असे म्हणतात. यात गुंतवणुकीची रिस्क आणि गुंतवणुकीपूर्वी करावा लागणारा अभ्यास या गोष्टी असल्या तरी मिळणारा परतावा देखील जास्त आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये हा पर्याय आजकाल लोकप्रिय होत आहे.

हा पर्याय प्रत्येकाचा ‘कप ऑफ टी’ नसला तरी गुंतवणुकीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात परतावा देणारा हा बचतीचा थोडा जोखीमपूर्ण पण लोकप्रिय प्रकार आहे.

याशिवाय डेट म्युच्युअल फण्ड्स, सीनियर सिटीजन्स सेव्हींगज्स स्कीम, RBI TAXABLE BONDS, प्रधानमंत्री वय वंदन योजना यादेखील नाविन्यपूर्ण गुंतवणूक योजना असून या पर्यायांमध्ये तुमच्या बचतीची गुंतवणूक करून तुम्ही तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकता.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version