' काकोरी म्हटल्यावर इतिहास आठवतो, पण याच नावाचे कबाब सुद्धा फेमस आहेत… – InMarathi

काकोरी म्हटल्यावर इतिहास आठवतो, पण याच नावाचे कबाब सुद्धा फेमस आहेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपल्या दैनंदिन जीवनातला महत्वाचा भाग म्हणजे आहार, खाद्यपदार्थ.. आता यात सुद्धा काही लोक अतिशय शिस्तबद्ध असतात बरं का!!!वजन नको वाढायला किंवा शुगर मर्यादित राहायला हवी अशा काही कारणांमुळे कमी, मोजक्या प्रमाणात आणि शरीराला पूरक, उपयुक्त असेल आणि घातक नसेल असाच आहार घेतात.

याउलट असे सुद्धा लोक असतात, ज्यांना खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला प्रचंड आवडते. हल्ली आपण एकमेकांशी गप्पा मारताना म्हणतो मी फुडी (खवय्यां) आहे. अशा लोकांना सतत नवीन नवीन पदार्थ टेस्ट करायला आवडतात. आता या खाद्यपदार्थामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकार असतात.

 

indian food inmarathi

 

या दोन्ही प्रकारात सध्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीस असलेला पदार्थ म्हणजे कबाब. अर्थात कबाब हा पदार्थ काही मूळचा भारतीय नाही.

मुळातच पारंपरिक भारत मांसाहार करणारा देश म्हणून कधीच गणला गेला नाहीये. आपल्याकडे भारतात राजपुतांसारख्या जंगली खेळांवर अवलंबून असलेल्या प्रदेशांमध्ये मांसाहार आल्याचा इतिहास आहे.

तुर्की भाषेतील व्युत्पत्तिशास्त्रज्ञ सेवान निसान्यान यांच्या मते, कबाब हा शब्द पर्शियन शब्द ‘कबाप’वरून आला आहे ज्याचा अर्थ “तळणे” आहे. १३७७ मध्ये किस्सा-ए युसुफच्या तुर्की लिपीमध्ये या शब्दाचा प्रथम उल्लेख करण्यात आला होता, जे सर्वात प्राचीन ज्ञात स्त्रोत आहे जिथे कबाबचा उल्लेख अन्न म्हणून केला जातो. तथापि, तो यावर जोर देतो की या शब्दाचा जुना अक्कडियन भाषेत “कबाबू” आणि सिरियाक भाषेत “कब्बा” सह “तळणे/जाळणे” असाच अर्थ आहे.

 

kabab inmarathi
curly tales

शोध कधी लागला…

या डिशचा शोध मध्ययुगीन पर्शियन सैनिकांनी लावला होता, ज्यांनी त्यांच्या तलवारीचा वापर खुल्या मैदानावरील आगीवर मांस जाळण्यासाठी केला होता. विविध इस्लामिक साम्राज्यांच्या काळात शाही घरांमध्ये कबाब दिला जात असे आणि अगदी सामान्य लोक नानसह नाश्त्यासाठी त्याचा आनंद घेत असत.

कबाबसाठी पारंपारिक म्हणून वापरले जाणारे मांस म्हणजे कोकरू आहे. पण त्या-त्या परिसरात उपलब्ध असेल आणि त्या देशाच्या संस्कृतीनुसार, आवडीनुसार आणि धार्मिक प्रतिबंधांवर अवलंबून मांस वापरलं  जाऊ लागलं. इतर मांसामध्ये गोमांस, बकरी, चिकन, डुकराचे मांस किंवा मासे यांचा समावेश केला जातो.

 

kabab inmarathi

 

विविध देशातील प्रवाशांनी आणलेल्या इतर खाद्यपदार्थांप्रमाणेच, कबाब पूर्व भूमध्यसागरीय आणि दक्षिण आशियाच्या बहुतेक भागांमध्ये रोजच्या जेवणाचा एक भाग बनला आहे. पाश्चात्य देशातील तरुणांमध्ये कबाब हा पदार्थ, रात्रीचा किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून देखील लोकप्रिय झाला आहे.

अमेरिकन इंग्रजीमध्ये, ‘कोणतीही पात्रता नसलेले कबाब’ म्हणजे शिश कबाब हा स्केव्हरवर शिजवलेला असतो, तर युरोपमध्ये कबाब म्हणजे, पिठामध्ये घोळलेले, कापलेले मांस यांचा संदर्भ दिलेला आढळतो. मध्य पूर्व भागात, कबाब म्हणजे ज्वालांच्यावर शिजवलेले मांस असा संदर्भ आहे.

जर आपण राजकीय सीमा बघितल्या आणि ऐतिहासिक संदर्भ पाहिले, तर चेंगेझ खानच्या सैन्याने मंगोलिया, मध्य-पूर्व आणि स्पेन आणि आसपासच्या भागात हल्ला केल्यानंतरच्या काळात, कबाबची उत्क्रांती विविध स्वरूपात झाली आहे.

 

changez-khan-statue-marathipizza

 

जपानमध्ये याकिटोरी, इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये साट्ये असे पदार्थ मिळतात. परंतु सॉस आणि मसाल्यांसह त्यांची तुलना कबाबशी केली जाऊ शकत नाही. आपल्याकडे भारतामध्ये अफगाण लुटारू आणि मुघल आक्रमणांच्या आधीच, कबाब स्वयंपाक घरांपर्यंत पोचवले, यात काही आश्चर्य नाही.

भारतातील कबाब…

भारतीय संदर्भ बघता, कबाब हे फक्त मांसाहारापुरते मर्यादित नाहीत. खरं तर हरियाली कबाब, पनीर टिक्का आणि दही के कबाब सारख्या काही चविष्ट आणि भारतीय खासियत असलेले कबाब सुद्धा पाहायला मिळतात.

 

veg hariyali kabab inmarathi

‘जस्ट केबॅब्स : सेलिब्रेशन ऑफ ३६५ डेज’ आणि या पुस्तकात, शेफ दविंदर कुमार यांनी त्यांच्या १२० शाकाहारी कबाबची यादी दिली आहे.

या इतिहासाबद्दल माहिती घेताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या कबाबमध्ये कितीतरी प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मांसाहारातच नाही तर शाकाहारामध्ये सुद्धा विविध प्रकार आपल्याला आढळून येतात. जसे की टुंडे आणि गलावती कबाब, बिहारी कबाब, चपली कबाब, व्हेज शीख, चिकन शीख कबाब आणि काकोरी कबाब (काकोरी हे फक्त १९२५ च्या प्रसिद्ध काकोरी षडयंत्रासाठी ओळखले जात नाही, तर उत्तर प्रदेशातील या छोट्या शहराच्या नावाने जाणारे स्वादिष्ट कबाब देखील आहेत)

 

kakori kabab inmarathi

 

विविधता असणाऱ्या आपल्या भारतात, कबाबचे सुद्धा अगणित प्रकार बनवले जातात. कबाबचा इतिहास असो, की कबाबची व्हरायटी, ‘कबाब हैं, लाजवाब हैं’  असं अनेकजण म्हणत असतील. हा खास इतिहास तुमच्या ओळखीतील कबाब लव्हर्सपर्यंत नक्की पोचवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?