Site icon InMarathi

रॉयल इनफील्ड बुलेट खरेदी का करावी? ही आहेत १० कारणं

enfield inmarathi

rideapart

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सैराट मधली आर्ची ठाऊक असेलच तुम्हाला, जर एक मुलगी बुलेट चालवू शकते तर मग तुला काय झाल असं बाळबोध स्टेटमेंट बऱ्याच लोकानी सैराट बघून झाल्यावर केले होते, पण त्यात तथ्य अजिबात नाही!

बुलेट ही फक्त मुलांनीच चालवली पाहिजे असा कुठे अलिखित नाही बुलेट कुणीही चालवू शकत, त्यात अशक्य असं काहीच नाही!

बुलेट असो किंवा आणखीन कोणतीही बाइक असो,  योग्य ती सुरक्षा बाळगून कोणीही कोणतीही बाइक चालवू शकत, फक्त ट्राफिकचे नियम आणि सिग्नल पाळण अनिवार्य असत, हातात बुलेट आहे म्हणून इतरांना कसपटासमान समजून चालत नाही!

 

zee news

 

रॉयल इनफिल्ड बुलेट का खरेदी करू नये?- १० कारणे! या लेखात आम्ही रॉयल इनफिल्ड बुलेटच्या कमतरतेवर भाष्य केलं होतं. पण आम्ही तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की रॉयल इनफिल्ड बुलेट का खरेदी करावी? याची देखील काही कारणे आहेत आणि ती देखील आम्ही तुमच्या पुढे मांडू.

ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे रॉयल इनफिल्ड बुलेटच्या देखील वाईट तसंचं चांगल्या बाजू देखील आहेत.

चला तर मग जाणून घेऊया का करावी रॉयल इनफिल्ड बुलेट खरेदी? अशी काय कारणे आहेत की रॉयल इनफिल्ड बुलेट एवढी लोकप्रिय आहे?

चांगल्या बाजू आपण जाणून घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या की रॉयल इनफिल्ड बुलेटमधील या सर्व चांगल्या गोष्टी टेक्निकल नाहीत. जसं जसं तुम्ही वाचत जाल तसंतसं ते तुमच्या लक्षात येईलच.

 

rideapart.com

 

१) सिम्बॉल ऑफ प्राईड:

 

road thrill blog

 

जर गरज म्हणून तुम्ही रॉयल इनफिल्ड बुलेट घेणार असाल तर आताचा ही बाईक घेण्याचा विचार टाळा. कारण रॉयल इनफिल्ड बुलेट ही बाईक गरज आहे म्हणून खरेदी करण्यासारखी नाही, ती एक सिम्बॉल ऑफ प्राईड म्हणजे अभिमान दर्शवणारे रूप आहे.

 

२) लोकांचे लक्ष वेधून घेते

रॉयल इनफिल्ड बुलेट चालवताना ती एक फिलिंग जबरदस्त असते जेव्हा लोक सारखे वळून वळून तुमच्या बुलेटकडे पाहत असतात. तेव्हा एक चेव चढतो, आपण खरंच काहीतरी जबरदस्त राईड करतोय असं वाटत राहतं.

 

३) जिवाभावाची सोबती

रॉयल इनफिल्ड बुलेट वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला विचारा की,

बाबा तू बुलेट का वापरतो रे?

तेव्हा त्याचं हमखास उत्तर असेल की ,

तुला नाही कळणार रे बुलेट ची मजा.

असे म्हणताना त्याच्या आवाजातील इमोशनलपणा लगेच लक्षात येतो. रॉयल इनफिल्ड बुलेट चालवायला सुरुवात केल्यापासून तुमचं दुसऱ्या एखाद्या गोष्टीवर प्रेम जडणे कठीण! इतकी ती जवळची होऊन जाते. कुटुंबातीलचं एक सदस्य म्हणा ना!

 

coolsrini.wordpress.com

 

४) थ्रील आणि एक्साईटमेंट

 

ride apart

 

रॉयल इनफिल्ड बुलेट वर राईड करताना जेव्हा आपण ती एक्सलरेट करतो तेव्हा अंगावर अगदी रोमांच उठतात. ते थ्रील आणि एक्साईटमेंट इतर कोणत्याही बाईकवर अनुभवता येत नाही.

 

५) रांगड स्वरूप

रॉयल इनफिल्ड बुलेट म्हणजे शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतिक होय. रॉयल इनफिल्ड बुलेट चालवणाऱ्यांना त्याचं रांगड स्वरूप सगळ्यात जास्त भुरळ घालतं. हेच कारण आहे की रॉयल इनफिल्ड बुलेट चालवणारा दुसरी कोणतीही बाईक चालवायला बघत नाही.

 

६) बेस्ट बाईक फॉर रोडट्रीप्स

रोड ट्रिप्ससाठी निघताय मग तुम्ही रॉयल इनफिल्ड बुलेट घेऊनच गेलं पाहिजे असं जणू समीकरण आहे. त्याला कारण म्हणजे रॉयल इनफिल्ड बुलेटचा कम्फर्ट आणि स्टील बॉडी! लडाख ट्रीपचं उदाहरण घ्या, लडाखला जाताना देखील बरेच जण केवळ रॉयल इनफिल्ड बुलेट घेऊन जायचाच सल्ला देतात.

या आणि अश्या एक कारणांमुळेच गेल्या काही काळात रॉयल इनफिल्ड बुलेट ही केवळ रोड ट्रिप्ससाठी असणारी बाईक म्हणून पुढे आली आहे.

 

deyour camps

 

७) कस्टमाईज्ड करायला सोपी!

 

trip machine

 

रॉयल इनफिल्ड बुलेट मध्ये अनेक बदल करून आपल्याला हवे तसे तिचे रूप घडवणे सोपे आहे. इतर बाईक प्रमाणे तिचा साचा जास्त गुंतागुंतीचा नाही. यामुळेच अनेक जण रॉयल इनफिल्ड बुलेट आवडीप्रमाणे कस्टमाईज्ड करून तिचे सौंदर्य अधिक खुलवतात, परिणामी राईड करताना ती अधिक लोकांचे लक्ष आकर्षित करून घेते.

 

८) पर्सनॅलिटी आणि स्टेट्सला साजेशी

रॉयल इनफिल्ड बुलेट खरेदी करण्याचं अजून एक महत्त्वाच कारण म्हणजे ती पर्सनॅलिटी खुलवते. जेव्हा शरीर कमावलेला एखादा व्यक्ती रॉयल इनफिल्ड बुलेट वरून राईड करतो तेव्हा त्याच्याबद्दल लोकांच्या मनाट आकर्षण निर्माण होते.

स्टाईल आयकॉन म्हणून देखील बरेच जण रॉयल इनफिल्ड बुलेट खरेदी करतात, त्यामुळे समाजात एक प्रतिष्ठा मिळते असे मानले जाते.

 

९) डुग-डुग आवाज

हे कारण तर कोणताच रॉयल इनफिल्ड बुलेट लव्हर नाकारू शकत नाही. रॉयल इनफिल्ड बुलेटचा आवाज म्हणजे त्याची शान मानली जाते. या आवाजाने राईड करता एक चेव चढतो. तसेच अटेन्शन ग्रॅबर म्हणून देखील या डुग-डुग आवाजाकडे पाहिले जाते. हा आवाज म्हणजे रॉयल इनफिल्ड बुलेट चालवणाऱ्यासाठी एखाद्या श्रवणीय संगीतापेक्षा कमी नसतो.

youtube.com

 

१०) जेव्हा बुलेट येते, तेव्हा संपूर्ण जग तिला रस्ता मोकळा करून देते

रॉयल इनफिल्डची ही टॅगलाईन हिंदी मध्ये होती (Jab Bullet Chale to Duniya Rasta De) जी हळूहळू खरी ठरू लागली आणि आज खरंच अनेकदा रस्त्यावर देखील पाहायला मिळतं की जेव्हा एखादा अतिशय अभिमानाने रॉयल इनफिल्ड बुलेट चालवत येतो.

तेव्हा पुढच्या गाड्या आपसूकच बाजूला होतात आणि त्याला पुढे जाऊ देतात. हा आहे बुलेटला मिळणारा मान, जो भारतातील इतर कोणत्याही बाईकला आजवर प्राप्त झालेला नाही.

आता आम्ही तुमच्यासमोर दोन्ही बाजू ठेवल्या आहेत. बुलेट का खरेदी करावी आणि का खरेदी करू नये? आणि तुम्ही तेवढे सुज्ञ आहातच की तुम्ही तुमचा निर्णय स्वत: घेऊ शकता, चला तर मग विचार करा आणि ठरवा रॉयल इनफिल्ड बुलेट राईड करायची की नाही!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version