Site icon InMarathi

गरबा आयोजक ते मुख्यमंत्र्यांशी नडणारा नेता, वाचा किरीट सोमय्यांचा वादळी प्रवास

kirit 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उच्चशिक्षीत नाव म्हणजे किरीट सोमय्या! मध्यमवर्गीय अभ्यासू, हुशार मुलगा ते वादळी राजकीय व्यक्तिमत्व हा त्यांचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जयप्रकाश यांच्या आंदोलनातून राजकारणात प्रवेश केलेल्या किरीट यांचा विद्यार्थी चळवळीतून भाजप मधे प्रवेश झाला असला तरिही त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते मुंबईतील गरबा कार्यक्रमाच्या आयोजनामुळे!

पुन्हा एकदा बातम्यांचा विषय बनलेले किरीट सोमैय्या हे महाराष्ट्राच्या राजकारणाती उच्चशिक्षित, वादळी आणि तडफदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. कालपासूनच्या राजकीय घडामोडी आणि बातम्यांमधून पुन्हा एकदा चर्चेत आलेले किरीट सोमय्या आहेत तरी कोण? एकेकाळी राजकारणात येऊ पाहणारे किरीट आज मात्र चक्क मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भांडाफोड करण्याच्या तयारीत आहेत. भ्रष्टाचारमुक्त भारत म्हणणारे किरीट आता कुणाचं नाव घेणार? याची अनेकांना धडकीही भरत आहे.

 

मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगा राजकारणात येतो काय आणि राजकीय पटावरचा मुख्य नेता बनतो काय. सगळा प्रवासच वादळी असणारे किरीट सोमैय्या खर्‍या अर्थानं मुंबईचे नेते आहेत. मुंबापुरीतल्या समस्या, इथले प्रश्न तर त्यांनी सातत्यानं ऐरणीवर आणलेच मात्र मुंबईच्या गरब्याला ग्लॅमर प्राप्त करून देण्यातही त्यांचा मोठा सहभाग आहे. अहमदाबाद, सुरत यांच्या तोडीचा हा नवरात्रीचा गरबा मुंबईचा झाला तो किरीट सोमैय्या यांच्या प्रयत्नांमुळेच!

१९५४ साली मुंबईतील मुलुंड या उपनगरात रहाणार्‍या एका सामान्य मध्यमवर्गिय कुटुंबात किरिट जन्माला आले. पहिल्यापासूनच हुशार असणारे किरीट चार्टर्ड अकाउंटटच्या परिक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणारे विद्यार्थी होते, इतकंच नव्हे तर २००५ मुंबई विद्यापीठातून त्यांनी फायनान्समधे डॉक्टरेट करत असताना सर्वात मोठा म्हणजे तब्बल १२०२ पानांचा प्रबंध सादर करणारे विद्यार्थ्या आहेत. फार कमी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे मोठे प्रबंध सादर केले आहेत. किरिट यांचा प्रबंध दोन खंडात सादर करावा लागला होता इतकी त्याची व्याप्ती होती.

विषयाचं सखोल ज्ञान मिळविणं हा त्यांचा पहिल्यापासूनचा उपजत गूण त्यांनी राजकारणात आल्यावरही सोडला नाही. आपल्या या विद्वत्तेच्या जोरावर त्यांनी आजवर अनेक घोटाळे उजेडात आणत सत्ताधार्‍यांच्या तोंडचं पाणी पळविलं आहे.

 

 

आमदारकीच्या टर्ममधे गुंतवणूकदार संरक्षण कायदा आणि शविच्छेदन कायदा हे दोन अत्यंत महत्वाचे असे कायदे मंजूर करून घेतले आहेत. त्याचप्रमाणे केवळ मुंबई नाही तर संपूर्ण राज्यासाठी महत्वाचं असं हाउसिंग सोसायटी कन्व्हेयन्स विधेयकही त्यांनीच प्रथम सादर केलं होतं.

सोमय्या यांच्यावर त्यांच्या आईच्या मतांचा खूप प्रभाव होता. त्यांच्या प्रेरणेमुळेच देशासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे हा विचार सतत त्यांच्या मनात घोळत असे. देशासाठी काही भरीव करायचं तर राजकारणासारख्या एकाचवेळेस पॉवरफूल तरिही बदनाम क्षेत्रात उतरण्यावाचून पर्याय नाही हे त्यांना कळलं होतं. जर सिस्टीम समंजस बनवायची असेल तर शिक्षित लोकांनी राजकारणापासून दूर न जाता त्यात सक्रिय होणं महत्वाचं आहे हे त्यांनी जाणलं.

राजकारणात एन्ट्री

महाविद्यालयात असतानाच त्यांनी जयप्रकाश यांच्या चळवळीत सहभाग घेतला. हे वर्ष होतं १९७५ चं! आणीबाणीनंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि मुलूंड विधानसभा मतदार संघातून राजकारणात प्रवेश केला.

मात्र यावेळी त्यांची पहिली स्ट्रॅटर्जी अर्थात गरब्याचं आयोजन ही सुपरडूपर हिट ठरली. मुलुंज, भांडूप या भागात राहणाऱ्या गुजराथी रहिवाशांना या त्यांच्या कल्पनेनं आकर्षित केलं. त्यानंतर दरवर्षी गरबा आयोजन म्हणजे सोमय्या हे समीकरण बनलं होतं. याचा परिणाम असा की, किरीट सोमय्या हे नाव घराघरात पोहोचायला मदत झाली.

 

 

१९९१ साली ते मुलुंड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विधानसभेवर निवडून आले. या निवडणुकात भाजपमधे अंतर्गत नाराजी नाट्यही रंगलं होतं. या निवडणूकी दरम्यान किरीट तरूण होते आणि राजकारणात तुलनेनं नवखेही मात्र त्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते मुलुंडचे आमदार वामनराव परब यांना डावलून तिकिट देण्यात आलं होतं. मात्र निवडून आल्यावर उत्तम कामगिरी करत त्यांनी आपली निवड सार्थ असल्याचं सिध्द केलं.

यावेळी मात्र पक्षाने ज्येष्ठ नेत्याला डावलल्याने किरीट चर्चेतही आले होते.

१९९९ साली ईशान्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट मिळवत त्यांनी कॉन्ग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांचा पराभव करत विजय संपादन केला. खासदारकी मिळाल्यावरही त्यांनी दखलपात्र कामगिरी करत राज्याच्या राजकारणात पक्कं स्थान निर्माण केलं.

विरोधकांची भांडाफोड

आजवर किरीट सोमय्या यांनी अनेक घोटाळे खणून काढत जनतेसमोर आणले आले आहेत. यामध्ये २००७ सालचा खाण्यास अयोग्य असा लाल गहू घोटाळा, अजित पवार आणि सुनिल तटकरे यांना अडचणीत आणलेला सिंचन घोटाळा, अशोक चव्हाण यांना अडकविलेला आदर्श सदनिका घोटाळा, छगन भुजबळ यांच्यावर सदनिका हडपण्याचा आरोप घोटाळा बाहेर काढणार्‍या किरीट यांचं सत्ताधारी शिवसेनेशी विशेष वितुष्ट आहे.

 

 

२०१४ च्या निवडणुकांनंतर त्यांनी ठाकरे कुटुंबियांचे पैशाचे व्यवहार शोधून काढत खळबळ माजवली होती. ते इतकंच करून थांबले नाहीत तर दहशतीचं वातावरण असणार्‍या, आजच्या काळात विरोधात ब्र काढू न शकत नाही अशांसाठी बांद्रा का माफिया असं जाहिरपणे म्हणण्याचं धाडस करणारे ते निडर नेते ठरले.

 

 

मुंबईची नस ओळखलेले आणि इथल्या राजकारणात मुरलेले  स्थानिक नेते अशीही त्यांची ओळख आहे.

काही वर्षापुर्वीपासून विरोधकांच्या मागे लागलेल्या किरीट यांनी आतामात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याच नावाने बोटं मोडायला सुरुवात केली आहे. याचेच प्रतिक म्हणजे कालपासून बातम्या, सोशल मिडीया यांच्यात धुमाकूळ घालणा-या किरीट यांचं नवं अस्त्र कोणतं असेल याची उत्सुकता आहेच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version