या शहरात तब्बल २८ वर्षानंतर मुलाचा जन्म झाला
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखाचं शीर्षक वाचून बरेच जण बुचकळ्यात पडले असतील. तुमचं देखील बरोबर आहे, कारण २८ वर्षे एखाद्या ठिकाणी मुलं जन्मलच नाही या गोष्टीवर विश्वास बसणे कठीण!
एखाद्या गवात वर्षानुवर्ष मुल जन्माला न येणं ही बाब अनेकांना हास्यास्पद वाटेल, त्याची थट्टा केली जाईल किंवा सांगणा-यावर अविश्वास दाखविला जाईल.
सध्या तर लोकसंख्या इतकी झपाट्याने वाढत असताना एखाद्या गावाता एकही मुल जन्माला न येण्यामागे काय कारण, हे खरं की खोटं, खरं असल्यास याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न पडतील.
अहो पण विश्वास ठेवा ही गोष्ट खरी आहे आणि तुम्ही हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेतलंच पाहिजे.
ओसटाना हे उत्तर इटलीमधील एक छोटंसं शहर.
या शहरातील तुरिन हॉस्पिटलमध्ये एक मूल जन्माला आलं आणि जणू चमत्कारचं झाला, कारण या शहरासाठी ही साधी घटना नव्हती.
इथे तब्बल २८ वर्षांनी म्हणजे १९८७ सालानंतर पहिल्यांदाच मूल जन्माला आलं आहे.
पाब्लो असं या मुलाचं नाव आहे.
याच्या जन्मानंतर अख्ख्या ओसटाना शहरात जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. एखाद्या सण-उत्सवासारखं या मुलाचा जन्म साजरा केला गेला.
शहराच्या प्रवेशद्वारावर करकोचा पक्षाची प्रतिकृती तयार करुन लावण्यात आली होती.
पाईडमांटच्या डोंगररांगांमध्ये ओसटाना शहर वसलं आहे. या शहराचे महापौर गियाकॉमा लॉमबारडोही पाब्लोच्या जन्मानंतर प्रचंड आनंदी झाले होते.
डोंगररांगांमधील या छोट्याशा शहरात या मुलाचा जन्म म्हणजे एखाद्या स्वप्नासारखं आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.
गेल्या शतकभरापासून ओसटाना शहराची लोकसंख्या कमालीची घटत चालली होती.
पाब्लोच्या जन्मानंतर या शहराची संख्या ८५ वर पोहोचली आहे. या लोकसंख्येतीलही अर्धीच लोकसंख्या कायमस्वरुपी ओसटानामध्ये राहते.
१९ व्या शतकच्या सुरुवातीला ओसटाना शहर एकूण एक हजार लोकसंख्येची वस्ती होती.
दुसऱ्या महायुद्धानंतर ओसटानामधील जन्मदर कमी होत गेला. १९७५ नतंर ओसटानातील जन्मदर कमालीचा कमी झाला.
१९७६ ते १९८७ या वर्षांदरम्यान १७ मुलांचा जन्म झाला. त्यानंतर तब्बल २८ वर्षांनी म्हणजे २०१६ साली पाब्लोचा जन्म झाला आहे.
लोकसंख्येशी लढण्यासाठी ओसटानाने नव-नव्या योजना आणल्या. मात्र, त्यांचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही.
पाब्लो ज्यांच्या घरी जन्माला आला, तेही पाच वर्षांपूर्वी परदेशात जाण्याच्या विचारात होते. मात्र, जवळच्या डोंगरांमध्ये राहण्याची सुविधा मिळाली आणि ते तिथेच थांबले. द नेशनल यूनियन ऑफ माऊंटेन टॉउन्स अँड कॉम्युनिटिजचे मारको बसॉने यांनी सांगितले,
पाब्लो ज्यांच्या घरात जन्माला आला, त्या घराचं भविष्य उज्ज्वल आहे. त्याचा जन्म हे याच गोष्टीचे संकेत आहेत.
ओसटाना हे एकमेव शहर नाही, इटलीमध्ये अशी अनेक शहरं आहेत, जिथे कमी लोकसंख्या आहे.
येथील अधिकाधिक तरुणवर्ग नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होऊ लागला आहे. स्थलांतर रोखण्यासाठी मोफत घरं देण्यासही येथील अनेक लोक तयार आहेत. मात्र, स्थलांतर थांबता थांबत नाही आणि पर्यायाने कमी लोकसंख्येचा मुद्दा भेडसावत आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.