आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आजच्या युगात मोबाईल सगळ्यात उपयुक्त गोष्ट घोषित करायला हरकत नाही. गरज पडली की हा मोबाईल कामाला येतो. इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल वरून सर्व गोष्टी चुटकीसरश्या पूर्ण होतात. मोबाईलच्या उपयुक्ततेची अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण ज्या प्रमाणे प्रत्येक गोष्ट परिपूर्ण नसते त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये देखील सर्वात मोठी कमतरता आहे, ती म्हणजे दीर्घकाळ न टिकणारी बॅटरी लाईफ. तुम्ही जेवढा जास्त मोबाईलचा वापर कराल तेवढ्या जलद मोबाईलची बॅटरी संपते. मग काय सारखी चार्जिंग करावी लागते आणि चार्जिंग पूर्ण होईपर्यंत तास-दोन तास वाट पहावी लागते. यावर उपाय म्हणून बॅटरी पावर बँकही बाजारात आल्या आहेत. आज बॅटरी संपण्याची समस्या भेडसावू नये म्हणून प्रत्येक स्मार्टफोनधारक हल्ली आपल्या फोनसोबतच बॅटरी पावर बँक घेऊनच घराबाहेर पडतो.
पण या बॅटरी पावर बँक पेक्षाही रामबाण इलाज आता मोबाईल कंपन्या शोधून काढलाय. त्यांनी झटकन चार्ज होणाऱ्या बॅटऱ्यांची निर्मिती सुरू केलीय. या टब्रो चार्जिंग तंत्रज्ञानामुळे बॅटरी चार्ज होण्याच्या वेळात कमालीची घट झालीय. अनेक मोबाईल कंपन्यांनी स्मार्ट चार्जिंगसाठी आपापला स्मार्टफोन सज्ज केल्यानंतर आता ओप्पो या चीनी मोबाईल कंपनीनेही नवं तंत्रज्ञान विकसित केलंय. ओप्पोच्या दाव्यानुसार, त्यांनी फक्त १५ मिनिटात पूर्ण चार्ज होणारी बॅटरी विकसित केलीय.
तसंच ओप्पो दावा असाही दावा करतंय की,
फक्त पाच मिनिटाचं चार्जिंग तुमच्या स्मार्टफोनला १० तासांपर्यंतचा टॉकटाईम उपलब्ध करून देऊ शकेल.
बार्सिलोनामध्ये भरलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये ओप्पोने शून्य ते १०० टक्क्यांपर्यंत पूर्ण बॅटरी चार्ज करण्यासाठी फक्त १५ मिनिटांचा अवधी लागणारं तंत्रज्ञान जगजाहीर केलंय. ओप्पोने या तंत्रज्ञानाचं ‘SuperVOOC’ असं नाव ठेवलंय. या क्विक चार्जिंग टेक्नॉलॉजीने 2500 mAh क्षमतेची बॅटरी फक्त 15 मिनिटांत पूर्ण चार्ज झाली, तसंच हे तंत्रज्ञान परंपरागत मायक्रो यूएसबी आणि सीटाईप यूएसबीमधून वापरता येणार आहे.
ओप्पोने विकसित केलेलं हे तंत्रज्ञान लो व्होल्टेज अल्गोरिदम वापरतं असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे अतिशय कमीतकमी उर्जा वापरूनही बॅटरी पूर्ण चार्ज होते, तीही कमीतकमी वेळात. अवघ्या पाच मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १० तासांपर्यंतचा टॉकटाईम या तंत्रज्ञानामुळे शक्य असल्याचा ओप्पोचा दावा आहे.
यापूर्वी क्लॉलकॉम स्नॅपट्रॅगन या मोबाईल प्रोसेसरची निर्मिती करणाऱ्या कंपनीने विकसित केलेल्या ‘क्विक चार्ज 3.0’ या तंत्रज्ञानामुळे शून्य ते ८० टक्के चार्जिंगसाठी फक्त ३५ मिनिटे पुरेशी असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी हे जगातील सर्वात वेगवान चार्जिंग तंत्रज्ञान समजण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी संबंधित स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगनचाच प्रोसेसर हवा किंवा टर्बो चार्जर स्नॅपड्रॅगनशी प्रोसेसरशी कॉम्पॅटिबल हवा अशी अट होती.
ओप्पो ने विकसित केलेली स्मार्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीही सध्या फक्त ओप्पो स्मार्टफोनपुरतीच मर्यादित असणार आहे. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी येणाऱ्या काळात ओप्पोसाठी टर्निंग पॉइंट ठरण्याची शक्यता आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.