' राखी आणि महात्मा गांधींच्या कमी कपड्यांची तुलना करणारे ‘विद्वान’ विधानसभा अध्यक्ष! – InMarathi

राखी आणि महात्मा गांधींच्या कमी कपड्यांची तुलना करणारे ‘विद्वान’ विधानसभा अध्यक्ष!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

राजकीय व्यक्तिमत्व आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही, महाराष्ट्र असो किंवा आणखीन कोणतं राज्य आपल्याइथे राजकीय लोकांच्या वक्तव्याला मसाला लावून छापलं जातं, दोनाचे चार करून सांगितलं जातं.

असाच काहीसा किस्सा घडलाय उत्तर प्रदेशच्या विधानसभा अध्यक्ष हृदयनारायण दीक्षित यांच्या बाबतीत. एका कार्यक्रमात माननीय अध्यक्ष महोदय यांनी महात्मा गांधींची तुलना थेट राखी सावंतशी केल्याची एक क्लिप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

 

hriday narayan inmarathi

 

याच क्लिपवरुन त्यांच्याविरुद्ध उलट सुलट चर्चा होत आहेत, याबद्दल खरंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे पण तरी त्यांची ही क्लिप सतत व्हायरल करून भाजपा पक्षावर उलट सुलट आरोप केले जात आहेत.

अध्यक्ष असूनही अशी तुलना करायचं त्यांच्या मनात तरी कसं येऊ शकतं असा सवालही सोशल मीडियावर विचारला जातोय.

नेमकी भानगड आहे तरी काय?

शनिवारी १८ सप्टेंबेर रोजी अध्यक्ष हृदयनारायण दीक्षित एका संमेलनासाठी गेले होते, त्या कार्यक्रमात कित्येक वक्ते हजर होते त्यांनी अध्यक्ष यांच्या अभ्यासाविषयी आणि विद्वत्तेविषयी कौतुक केले, तेव्हा हृदयनारायण यांनी महात्मा गांधीचे उदाहरण देत त्यांचे म्हणणे खोडून काढले!

 

gandhi khadi inmarathi

 

त्यांच्या म्हणण्यानुसार –

“जास्त शिकल्याने किंवा विद्वत्तेमुळे कुणीच महान होत नसतं, त्या व्यक्तिमध्ये आणखीनही बरेच गुण असतात. महात्मा गांधीसुद्धा वृत्तपत्र वाचायचे, कमी कपडे घालायचे, धोतर परिधान करायचे, त्यांना लोकं बापू म्हणायचे, जर अंगावरचे कपडे काढणारा महात्मा बनू शकतो तर राखी सावंतलाही महात्माच म्हंटले पाहिजे!”

विधानसभेचे अध्यक्ष असूनसुद्धा एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात हजेरी लावण्यावरुनसुद्धा हृदयनारायण यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतंय, एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले होते की “या कार्यक्रमात हजेरी लावली तरी ते कोणतीही राजकीय टिप्पणी करणार नाहीत!”

 

up vidhansabha inmarathi

 

या वक्तव्यानंतर सगळीकडेच टीकेचे सुर दिसू लागले आणि हृदयनारायण यांनी एक ट्विट करून या सगळ्या प्रकाराबाबत स्पष्टीकरण दिलं –

“सोशल मीडियावर व्हायरल होणारं माझं वक्तव्य हे अर्धवट फिरवण्यात आलं आहे, उन्नओ इथे भरलेल्या संमेलनात माझी ओळख करून देताना एक प्रसिद्ध आणि विद्वान लेखक अशी करून दिली, याच गोष्टीवर स्पष्टीकरण देताना मी सांगितले की एखादं पुस्तक किंवा लेख लिहिल्याने कुणी विद्वान किंवा महात्मा होत नसतं, महात्मा गांधीसुद्धा कमी कपडे परिधान करायचे, देश त्यांना बापू या नावाने ओळखतो, याचा अर्थ असा नाही की राखी सावंत पण महान आहे!”

राखी सावंत आणि राजकारण हे समीकरणही नवीन नाहीये. हृदयनारायण यांच्या वक्तव्याआधीच काही दिवसांपूर्वी १७ तारखेला पंजाबच्या राजकीय वर्तुळात राखी सावंतचा उल्लेख निघाला होता.

पंजाबमधील आम आदमी पार्टीचे आमदार राघव चड्ढा यांनी कॉँग्रेसचे अध्यक्ष नावजोत सिंग सिद्धू यांना “पंजाब राजकारणातली राखी सावंत” म्हणून हेटाळणी केली होती.

 

congress inmarathi

यानंतर राखी सावंतने टेलिव्हिजनवर येऊन याबाबत खेद व्यक्त केला होता, शिवाय राजीव यांना अर्वाच्य शब्दांत खडेबोलसुद्धा सुनावले होते!

आता उत्तरप्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांवरसुद्धा राखी सावंतने अशीच काही खरमरीत टिप्पणी दिली तर त्यात नवल काही नसावे कारण पंजाब असो किंवा उत्तर प्रदेश दोन्ही ठिकाणी केला गेलेला राखी सावंत हा उल्लेख हा असंबद्धच होता!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?